लग्नात नवरीची साडी, लेंगा हे आऊटफिट सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. कारण ब्रायडल आऊटफिटमुळे नवरीचा लुक खुलून दिसत असतो. मग तिच्या साडी अथवा लेंग्याचा रंग कोणतता आहे, डिझाईन काय आहे, साडीचा कोणता प्रकार आहे, तिने ब्लाऊज कसं शिवलं आहे याची चर्चा तिच्या मैत्रिणी आणि इतर महिलांमध्ये नक्कीच होते. यासाठी बऱ्याचदा लग्नाच्या थीमनुसार नवरा नवरीच्या कपड्यांचे रंग निवडले जातात. जर तुमचं लग्न ठरलं असेल तर ब्रायडल आऊटफिटच्या रंगाचा ट्रेंड तुम्हालाही माहीत असायला हवा.
ऑफव्हाईट आणि स्काय ब्लू
लग्नाच्या गप्पा सुरू आहेत तर सेलिब्रेटीजच्या लग्नाला विसरून कसं चालेल. नुकतंच वरूण धवन आणि नताशा दलाल विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नात वरूण आणि नताशाने घातलेल्या वेडिंग आऊटफिटवरून यंदाच्या ब्रायडल आऊटफिटचा ट्रेंड ठरवता येऊ शकतो. वरूण आणि नताशाने लग्नासाठी पारंपरिक गडद रंगाची निवड न करता ऑफव्हाईट आणि ब्लू शेड निवडले होते. वरूण आणि नताशाचं लग्न कोरोनामुळे अलिबागमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कमी लोकांच्या उपस्थितीत मात्र अगदी धुनधडाक्यात पार पडलं. वरूण आणि नताशा या लग्नात त्यांच्या वेडिंग आऊटफिटमध्ये खूपच छान दिसत होते.
रेड अथवा मरून
लग्नात पारंपरिक लाल रंगाची फॅशन नेहमीच शोभून दिसते. त्यामुळे तुम्ही रंगाबाबत फार कन्फुज असाल तर सरळ लाल अथवा मरून रंगाची निवड करा. प्रियांका चोप्राच्या लग्नापासून लाल रंगाच्या ब्रायडल आऊटफिटचा ट्रेंड आजही कायम आहे. बबिता फोगाटनेही तिच्या लग्नात लाल रंगाचा ट्रेंड फॉलो केला होता. यंदा नुकतंच लग्न झालेली मराठी अभिनेत्री मानसी नाईकने लाल रंगाचा लेंगा लग्नात घातला होता. मानसीने लग्नासाठी जोधा अकबर स्टाईल लेंगा घातला होता. ज्यामुळे तिचा लुक अगदी ऐश्वर्याप्रमाणे दिलखेचक दिसत होता.
गुलाबी रंग
लालप्रमाणेच गुलाबी रंगही लग्नात पवित्र मानला जातो. बऱ्याचदा पंजाबी लग्नात वधूचा लेंगा आणि वराचे उपरणे हे गुलाबी रंगाचेच असते. काही महिन्यापूर्वीच लॉकडाऊननंतर गाजत वाजत पार पडलेलं लग्न म्हणजे लोकप्रिय गायिका नेहा कक्करचं लग्न. नेहाने तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा लेंगा घातला होता. नेहाने तिच्या लग्नातील फेऱ्यांच्या वेळी पिंक आणि आयव्हरी रंगाचा लेंगा घातला होता. तर रिसेप्शनला तिने चक्क पांढऱ्या शुभ्र रंगाचा लेंगा परिधान केला होता.
पिंक आणि रेड कॉम्बिनेशन –
जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल आणि गुलाबी रंगाचा लेंगा लग्नात परिधान करू शकता. लॉकडाऊननंतर काजल अग्रवालच्या लग्नाने सेलिब्रेटजच्या लग्नसोहळ्याला सुरूवात झाली. काजलने लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत लग्न केलं होतं. काजलने लग्नासाठी गुलाबी आणि लाल रंगाच्या कॉम्बिनेशन असलेल्या लेंग्याची निवड केली होती. हे थोडं वेगळं कॉम्बिनशेन यंदा लग्नात यामुळे पाहायला मिळालं. तुम्हीही या रंगाचा ट्रेंड तुमच्या लग्नात फॉलो करू शकता.
हिरवी, पिवळी आणि लाल साडी –
महाराष्ट्रीयन लग्नात काही विधींसाठी हिरवा, पिवळा आणि लाल रंगाची साडी नववधूला परिधान करावी लागते. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या जोडीने लग्नात या रंगाचे ट्रेंडच फॉलो केले होते. मात्र या रंगासोबत परिधान केलेल्या शेल्यांमुळे मितालीचा लुक इतरांपेक्षा वेगळा ठरला होतो. मितालीने लग्नात हिरव्या शालूवर निळ्या रंगाचा शेला आणि पिवळ्या साडीसोबत मोरपिशी रंगाचा शेला अंगावर घेतला होता. विशेष म्हणजे रिसेप्शनला मितालीने नेसलेला लाल रंगाचा शालू सर्वात जास्त व्हायरल झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रीय लग्नाच्या थीममध्ये हे रंग अशा पद्धतीने कॅरी करायला काहीच हरकत नाही.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
साडी पेटीकोट विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का
उर्वशी रौतेलाने मित्राच्या लग्नात नेसली लाखोंची साडी, किंमत ऐकून व्हाल थक्क
लग्नसराईसाठी असा करा वापर वेलवेटच्या ड्रेसचा, दिसाल स्टायलिश