गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात पोटात कळा येणे हे सामान्य आहे आणि ही एक मोठी समस्या नाही. परंतु हे दुखणे जर तीव्र असेल तर मात्र एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाकडून त्याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला पोटात कळा येतात का? हे सामान्य आहे का? या प्रश्नांबाबत या लेखाच्या माध्यमातून सर्व शंका दूर करण्यासाठी विशेष माहिती आम्ही डॉ. राजेश्वरी पवार, सल्लागार प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खराडी, पुणे यांच्याकडून घेतली आहे. गर्भाशयात नऊ महिने बाळ वाढीदरम्यान गर्भवती महिलेच्या शरीरात विविध बदल होत असतात. त्यामुळे याची नक्की कारणे काय आहेत हे प्रत्येक महिलेला माहीत असणे आवश्यक आहे. हे सामान्य असले तरीही याची अर्धवट माहिती न घेता त्याची कारणे जाणून घेऊया.
अधिक वाचा – प्रेगनन्सी टेस्ट किटबाबत माहिती मराठी (Information About Pregnancy Test Kit In Marathi)
गर्भधारणेदरम्यान पोटात कळ येण्यामागची कारणे कोणती?
– गर्भधारणेनंतर एक किंवा दोन आठवडे पोटात कळ येऊ शकतात. एखाद्याच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये अंडी फलित झाल्यानंतर, ते गर्भाशयात प्रवेश करते. यादरम्यान सुरुवातीच्या काळात थोडेसे क्रॅम्पिंग होऊ शकते. गर्भाशयात बदल झाल्यामुळे क्रॅम्पिंग देखील होऊ शकते. पहिल्या तिमाहीत आपल्या शरीरात वेगाने बदलत होतात.
– गर्भाची वाढ होताना गर्भाशयावर ताण आल्यास पोटात कळ येऊ शकते.
– गर्भधारणेदरम्यान झालेल्या डिहायड्रेशनमुळे देखील क्रॅम्पिंग होऊ शकते. गर्भवती महिला खूप लवकर डिहायड्रेट होऊ शकतात.
– ओटीपोटात दुखणे देखील क्रॅम्पिंगला आमंत्रित करू शकते. होय, आपण ते बरोबर ऐकले आहे! गॅस, सूज येणे, बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्यांमुळे देखी पोटात कळ येऊ शकते. शिवाय बद्धकोष्ठतेसारखी समस्या देखील जाणवेल.
अधिक वाचा – तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत आहेत, मग या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या
गंभीर कारणे कोणती
– एक्टोपिक गर्भधारणा तेव्हा होते जेव्हा अंडी फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा इतर कुठेतरी प्रत्यारोपित होते अशावेळी गर्भाशयाचे अस्तर वेदनेस कारणीभूत ठरत नाही. यामुळे क्रॅम्पिंगचा धोका वाढू शकतो.
– गर्भपात झाल्यामुळे देखील पोटात कळ येऊ शकते. सहसा, गर्भपात झाल्यास पोटात कळ येण्याबरोबरच रक्तस्राव देखील होऊ शकतो.
– मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय) हे देखील पोटात कळ येण्याचे कारण असू शकते.
जेव्हा तुम्हाला गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात पोटात कळा येणे म्हणजे नक्की काय?
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या पोटात कळ येणे ओटीपोटात दुखणे किंवा स्नायुंवर ताण आल्यासारखे वाटू शकते. काही वेळेस मासिक पाळीसारखेच वाटू शकते. जेव्हा तुम्ही हालचाल करता किंवा शिंकता किंवा खोकताना तुम्हाला पोटात वेदना झाल्याचे जाणवू शकते. या वेदना सौम्य प्रकारच्या असतील आणि तुम्हाला त्याव्यतिरिक्त इतर कोणती लक्षणे नसतील तर कदाचित ते चिंतेचे कारण नाही. परंतु, जर पोटात तीव्र कळ येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही महत्त्वाच्या टिप्स:
- बसण्याची, झोपण्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा, गरम पाण्याने अंघोळ करा.
- पुरेशी विश्रांती तसेच व्यायाम करायला विसरू दुखणा-या भागावर गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल किंवा गरम पाण्याची पिशवी ठेवा
- हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे द्रव पदार्थांचे सेवन करा
- तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही याबाबत तुमचे अधिक प्रश्न नक्की तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि त्याचं शंकानिरसन करून घ्या.
अधिक वाचा – योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुत होण्याची शक्यता कमी, तज्ज्ञांचे मत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक