ADVERTISEMENT
home / Periods
मासिक पाळी वेळेवर न येणे याची कारणे

मासिक पाळी वेळेवर न येणे याची कारणे

आजकाल धकधकीच्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस निरनिराळ्या आरोग्य समस्या डोकं वर काढत आहेत. अनियमित मासिकपाळी ही आजकाल अनेक महिलांमध्ये आढळून येणारी एक आरोग्य समस्या आहे. वास्तविक गरोदरपणाच्या काळात महिलांमध्ये मासिक पाळी येणं त्या काळापुरतं बंद होतं. मात्र या व्यतिरिक्तदेखील अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. महिलांमधील मासिक पाळीचे चक्र हे साधारणपणे अठ्ठावीस दिवसांचे असते. म्हणजेच दर महिन्याला अठ्ठावीस दिवसांनी मासिक पाळी येते. मात्र आजकाल प्रत्येक महिलेमध्ये हा काळ निरनिराळा असतो. काहींना तीस ते चाळीस दिवसांनी मासिक पाळी येते. अनेकजणींना तर दोन ते तीन महिन्यांनी मासिक पाळी येते. जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत नसाल आणि तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर याबाबत वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. मासिक पाळी अनियमित असण्यामागची कारणं जाणून घेऊन त्यावर योग्य ते उपचार केले पाहिजेत. यासाठी अशी लक्षणे दिसू लागताच गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणे योग्य ठरेल. यासोबतच जीवनशैलीत योग्य बदल करून तुम्ही या समस्येला दूर ठेऊ शकता. 

जाणून घ्या अनियमित मासिक पाळी असण्याची काही कारणे

ताण-तणाव

कामाचा अती ताण अथवा नातेसंबंधांमुळे निर्माण होणारा ताण-तणाव मासिक पाळी वेळेवर न येण्यामागचे कारण असू शकतं. कारण या ताणतणावामुळे तुमच्या मनावर परिणाम होतो. शरीर आणि मनाचा संबंध  अगदी  जवळचा असतो. मानसिक ताणाचा शारीरिक क्रियांवर विपरित परिणाम होत असतो. नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या बऱ्याचदा दिसून येते. कारण ऑफिसमधील अती कामाचा ताण आणि घरात नातेसंबधांमुळे होणारा तणाव याचा परिणाम त्यांच्या मासिक चक्रावर पडू शकतो.

अपुरी झोप अथवा दगदग

जर एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन अथवा कामाच्या चिंतेने तुमची दगदग झाली असेल तर याचाही परिणाम तुमच्या मासिक पाळीच्या चक्रावर होऊ शकतो. कधी कधी घरात एखादे कार्य असेल तर त्या कार्यक्रमाचे नियोजन करताना तुमच्या मनावर एकप्रकारचे दडपण येते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल का? ही चिंता तुम्हाला सतत सतावत राहते. बऱ्याचदा लग्नसोहळ्यात घरातील महिला अथवा नववधूंची मासिक पाळी या कारणांमुळे अनियमित होऊ शकते.

ADVERTISEMENT

अनियमित मासिक पाळी

अती वजन

जर तुमचे वजन अनियंत्रित असेल तर याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीवर नक्कीच होऊ शकतो. अती वजनामुळे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्समध्ये परिणाम होत असतो. जेव्हा तुम्ही वाढणाऱ्या वजनाला नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम अथवा संतुलित आहार घेत नाही तेव्हा शरीरातील हॉर्मोन्स असंतुलित होतात. हॉर्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे तुमची मासिक पाळी अनियंत्रित होऊ शकते.

हॉर्मोन्सचे असंतुलन

बदललेली जीवनशैली आणि अयोग्य आहार याचा परिणाम तुमच्या ह़ॉर्मोन्सवर होत असतो. आजकाल अनेक महिलांना हॉर्मोन्सच्या असंतुलनाला सामोरे जावे लागतं. जर तुमच्या शरीररातील हॉर्मोन्स असंतुलित झाले तर मासिक पाळी अनियमित होणे हे यामागचे एक प्रमुख लक्षण असू शकते.

अचानक वजन कमी होणे

सुंदर दिसण्यासाठी आजकाल अनेक मुली आणि महिला चुकीच्या पद्धतीने डाएट करतात,पाळी लवकर येण्यासाठी उपाय करतात. झिरो फिगर अथवा स्लीम दिसण्यासाठी केलेल्या या डाएटमुळे त्यांचे वजन भराभर कमी होते. मात्र या डाएटमुळे त्यांच्या शरीराचे पोषण व्यवस्थित होत नाही. या सर्वाचा परिणाम त्यांच्या शरीरातील हॉर्मोन्सवर होतो. अती व्यायाम अथवा अती डाएट केल्यामुळे तुमच्या मासिक पाळीत अनियमिता येऊ शकते.

ADVERTISEMENT

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेणे

नोकरी आणि करिअरमुळे अनेकींना आजकाल मातृत्वाचा निर्णय पुढे ढकलावा लागतो. गर्भनिरोधन करण्याची अनेक साधने उपलब्ध असतानादेखील महिला केवळ गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचाच मार्ग स्वीकारतात.  अतीप्रमाणात गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे तुमच्या मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. कधीकधी काही तरूण मुलीदेखील अजाणत्या वयात गर्भनिरोधक गोळ्या घेतात. ज्याचा परिणाम पुढे त्यांच्या मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यावर त्यांच्या लक्षात येतो. यासाठी डॉक्टरांच्या सल्लाशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नका.

धुम्रपान अथवा मद्यपान करणे

महिला असो वा पुरूष मद्यपान आणि धुम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे. मात्र हे माहीत असूनही अनेकजण व्यसनांच्या आहारी जातात. महिलांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. धुम्रपान आणि मद्यपानाचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होत असतो. व्यसनांच्या अधीन गेल्यामुळे महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. याशिवाय या व्यसनांचा प्रजननक्षमतेवर देखील चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे अनेक महिलांना वंधत्वाचा सामना करावा लागत आहे.

अती प्रमाणात जंक फूड खाणे

आजकाल जंकफूड आणि पॅकफूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरावर विचित्र परिणाम होत असतो. जंकफूड आणि इतर प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधून शरीराला कोणतेच पोषण मिळत नाही. शिवाय अशा पदार्थांवर प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सवर होत असतो. जर तुम्ही दररोज असे पदार्थ खात असाल तर तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते.

थोडक्यात मासिक पाळी अनियमित होण्यामागे अनेक कारणे आहेत तेव्हा यापैकी कोणत्या कारणामुळे तुमच्या मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम झाला आहे हे ओळखा. त्याचप्रमाणे जीवनशैलीत चांगले बदल आणि संतुलित आहार, व्यायाम करून तुम्ही मासिक पाळीचे चक्र पुन्हा नियमित करू शकता. जर तुम्हाला दीड ते दोन महिने मासिक पाळी येत नसेल तर कृपया एखाद्या स्त्री रोग तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

ADVERTISEMENT

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला

मासिक पाळीच्या समस्या आणि त्यावरील उपाय

Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का

ADVERTISEMENT

Effect Of PCOD Problem On Pregnancy 

21 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT