ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सुपरस्टार होण्यासाठी ‘या’ कलाकारांनी बदललं स्वतःचं नाव

सुपरस्टार होण्यासाठी ‘या’ कलाकारांनी बदललं स्वतःचं नाव

‘नाव’ ही ओळख निर्माण होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. जन्मल्याबरोबर प्रत्येकाला नाव दिलं जातं. ज्या नावातून जग त्या व्यक्तीला ओळखू लागतं. मात्र जन्मापासून स्वतःची ओळख निर्माण करणारं नाव अचानक बदललं तर… बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटीज आहेत त्यांनी चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी चक्क स्वतःच्या जन्मनावातच बदल केले आहेत. कधी नाव उच्चारण्यासाठी कठीण असल्यामुळे तर कधी ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्यामुळे या सेलिब्रेटीजनी आपलं नाव बदललं होतं. प्रत्येकाचं नाव बदलण्याचं कारण निरनिराळं असलं तरी नावात बदल केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात भाग्योदय झाला हे खरं आहे. नाव बदलणाऱ्या या सेलिब्रेटीजच्या लिस्टमध्ये बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन पासून ते अगदी काही जुन्या कलाकारांचाही समावेश आहे. यासाठी जाणून घ्या कोणकोणत्या कलाकारांनी प्रसिद्ध होण्यासाठी आपलं जन्मनावच बदलून टाकलं.

अमिताभ बच्चन –

अमिताभ बच्चन यांना आज सारी दुनिया महानायक, बिग बी, शहेनशाह अशा विविध नावांनी ओळखते. मात्र अमिताभ बच्चन यांचं खरं नाव तुम्हाला माहीत आहे का?  बॉलीवूडच्या या महानायकाचे जन्मनाव ‘इन्कलाब श्रीवास्तव’ असं आहे. अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये यश मिळावं यासाठी स्वतःचं नाव नक्कीच बदलेलं नाही. त्यांचे नाव लहानपणीच बदलण्यात आलं होतं. मात्र अमिताभ बच्चन या नावानेच त्यांना बॉलीवूडचा महानायक केलं हे मात्र खरं.

Instagram

ADVERTISEMENT

अजय देनगण –

अजय देवगण ने चित्रपटसृष्टीत चांगलं नाव कमावलं आहे. काजोल आणि अजय ही जोडीदेखील चाहत्यांची एक आवडती जोडी आहे. मात्र अजयचं खरं नाव अजय नसून विशाल होतं हे तुम्हाला माहीत आहे का? ‘विशाल देवगण’ने नावात बदल करून अजय केलं आणि त्याला बॉलीवूडमध्ये भरभरून यश मिळालं. 

Instagram

सलमान खान –

बॉलीवूडचा भाईजान या नावाने सलमान खानने एक विशेष ओळख चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे. मात्र त्याचं  खरं नाव सलमान नसून ‘अब्दुल सलीम सलमान खान’ असं आहे. मात्र बॉलीवूडमध्ये आल्यावर त्याला सर्वजण प्रेमाने सलमान खानच बोलू लागले. काही लोक तर त्याला अगदी सल्लू असंही म्हणतात. मात्र याच नावांनी त्याला बॉलीवूडमध्ये खरी ओळख मिळाली आहे.

ADVERTISEMENT

Instagram

रजनीकांत –

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये रजनीकांतची एखाद्या देवाप्रमाणे पूजा केली जाते. मात्र रजनीकांत मुळचा मराठी आहे. त्याचं खरं नाव ‘शिवाजी गायकवाड’ आहे. दाक्षिणात्य चित्रपटाने त्याला रजनीकांत अशी ओळख दिली पुढे बॉलीवूडमध्येही त्याला याच नावाने ओळखलं जाऊ लागलं. 

ADVERTISEMENT

Instagram

अक्षय कुमार –

बॉलीवूडचा अक्की या नावाने अक्षय कुमार ओळखला जातो. दरवर्षी एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देण्यात  अक्षयचा हात कुणीच धरू शकत नाही. मात्र अक्कीच खंर नाव अक्षय नसून ‘राजीव भाटिया’ असं होतं. त्याने बॉलीवूडमध्ये यश मिळावं म्हणूनच चित्रपटात काम करू लागल्यावर स्वतःच्या नावात असा बदल केला. 

 

ADVERTISEMENT

Instagram

रेखा –

अभिनेत्री रेखाची बॉलीवूडमध्ये खरी ओळख ही एक एव्हरग्रीन अभिनेत्री अशी आहे. मात्र सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आजही करोडोंच्या ह्रदयावर वर्चस्व मिळवणाऱ्या या दिग्गज अभिनेत्रीचे खरे नाव फक्त रेखा नसून ‘भानुरेखा गणेशन’ असे होते. बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यावर ती रेखा यानावाने ओळखू लागली.

Instagram

ADVERTISEMENT

श्रीदेवी –

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आज जरी आपल्यात नसली तरी तिच्या सौंदर्य आणि अभिनयातून ती चाहत्यांच्या स्मरणात कायम असेल. श्रीदेवीचे नावही श्री ‘अम्मा येंगर अय्यपन’ असे होते. मात्र चित्रपटात करिअर करण्यासाठी हे कठीण नाव बदलून तिने ते श्रीदेवी असं केलं होतं.

Instagram

कतरिना कैफ –

कतरिना कैफ बॉलीवूडची एक हॉट आणि  गोड अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयापेक्षा सौंदर्याचेच दिवाने जास्त आहेत. कतरिनाचे खरे नाव ‘केट टर्कोट’ असं होतं. मात्र उच्चारण्यासाठी  कठीण असल्याने तिने बॉलीवूडमध्ये आल्यावर आपल्या नावात बदल केला. 

ADVERTISEMENT

Instagram

प्रिती झिंटा –

हिमाचल मधील एका छोट्याशा गावातून आलेल्या प्रितीने बॉलीवूडमध्ये चांगलंच नाव कमावलं. तिच्या कूल, बिनधास्त अॅटिट्यूडमुळे ती नेहमीच एक बबली हिरॉईन म्हणून ओळखली गेली. प्रितीने तिच्या नावातच नाहीतर ज्योतिषशास्त्रानुसार तिच्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये काही बदल केले होते. प्रितीचे खरे नाव ‘प्रितम’ होते मात्र तिने ते प्रिती (Preity) असे केले.

ADVERTISEMENT

Instagram

महिमा चौधरी –

महिमा चोधरी बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग करायची. मुळची नेपाळी असलेल्या महिमाने परदेस या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचं खरं नाव ‘रितू’ होतं मात्र तिने  चित्रपटात यश मिळावं यासाठी स्वतःचं नाव महिमा चौधरी असं केलं. कारण त्या काळात म वरून नाव असलेल्या अभिनेत्री सुपरहिट होत्या. माधुरी आणि मनिषा कोईरालाप्रमाणे यश मिळवण्यासाठी रितूने स्वतःच्या नावात असे बदल केले होते. असं  म्हणतात की परदेश चित्रपटासाठी दिग्दर्शक सुभाष घईंनी तिला नाव बदलण्यास सांगितलं होतं. 

 

ADVERTISEMENT

Instagram

असे आणखी अनेक बॉलीवूड कलाकार आहेत ज्यांची नावे बदलून त्यांनी स्वतःला यशाच्या शिखरावर नेलं आहे. त्यापैकी काही आम्ही तुमच्यासोबत शेअर केले आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

लग्नाआधीच आई झाल्या या बॉलीवूड अभिनेत्री

या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या

बॉलीवूड कलाकार जे आहेत उत्तम लेखक

23 Jul 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT