आपण बारीक, सुडौल आणि फिट दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र त्यासाठी काय करावं हेच अनेकांना माहीत नसतं. डाएट, व्यायाम आणि उपवास करून तुमचं वजन तात्पुरतं कमी होतं. मात्र जर कायमस्वरूपी वजनात बदल करायचे असतील तर तुमच्या जेवणाच्या वेळेत बदल करणं गरजेचं आहे. जेवणाची वेळ बदलणं अथवा अचूक पाळणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. वास्तविक जेवणाची वेळ न पाळल्यामुळे, उपाशी राहण्यामुळे तुमच्या शरीरात विशिष्ठ ठिकाणी फॅट्स जमा होतात. जेवणाच्या चुकीच्या वेळा यासाठी कारणीभूत असतात. यासाठीच जेवणाच्या वेळा पाळून तुमचं वजन कमी करा. फक्त जेवणाच्या वेळा अचूक पाळून तुमच्या वजनात प्रचंड फरक पडू शकतो.
Shutterstock
नास्ता कोणत्या वेळी आणि काय करावा –
सकाळचा नास्ता हा आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण नास्ता जर वेळेवर आणि योग्य प्रकारचा केला तर तुम्ही दिवसभर टवटवीत राहू शकता. यासाठी नास्ता करायला मुळीच विसरू नका. सकाळी सहा ते दहा या दरम्यान तुमच्या सोयीने एक वेळ ठरवा आणि दररोज त्यावेळी नास्ता करा. नास्त्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त कॅलरिज मिळतील याची काळजी घ्या. रात्रीच्या जेवणापासून सकाळी उठेपर्यंत तुमचं पोट रिकामं असतं. अशावेळी चांगला आणि पौष्टिक नास्ता केल्यामुळे दिवसभर तुम्हाला अपत्थकारक पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही.
दुपारी कधी आणि काय खावे –
सकाळचा वेळेवर नास्ता झाल्यामुळे तुमच्या शरीरात चांगली ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे काम करण्यासाठी तुम्ही उत्साही असता. सकाळ ते दुपार कामात व्यस्त असल्यामुळे कधी कधी दुपारच्या जेवणाची वेळ पुढे ठकलली जाते. कधी कधी दुपारी लंच टाळण्यावरच अधिक भर दिला जातो. मात्र असं मुळीच करू नका. साडेबारा ते दोन या वेळेत जेवण्याचा प्रयत्न करा. जेवणाची वेळ शक्य असल्यास एकच ठेवा. शिवाय दुपारच्या जेवणात पोळी, भाजी, भात, डाळ, सलाड, पालेभाज्या अशा फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुमचे चांगले पोषण होईल आणि रात्रीच्या जेवणाआधी तुम्ही कोणतेही अयोग्य पदार्थ खाणार नाही. या गोष्टीमुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास नक्कीच मदत होईल.
Shutterstock
रात्रीचे जेवण कधी आणि काय करावे –
रात्रीच्या जेवणाबाबत सर्वजण अनेक चुका करतात. रात्री उशीरा घरी गेल्यावर भरपेट जेवणं अथवा जेवण घेणं टाळणं या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या वजनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. जेवणानंतर लगेचच झोपण्याचाही आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. यासाठी जरी तुम्ही कितीही बिझी असला तरी झोपण्याआधी कमीत कमी दोन तास आधी जेवा. रात्रीच्या वेळी शक्य असल्यास हलका आणि पोषक आहार घेण्याचा प्रयत्न करा. वरणभात, मुगडाळीची खिचडी, सूप असे पदार्थ खाणे फायद्याचे ठरू शकते. शिवाय जर तुम्हाला रात्री खूप भूक लागत असेल तर सात ते आठ या वेळेत जेवणाचा प्रयत्न करा. ज्यामुळे रात्री झोपेपर्यंत तुमचे जेवण नक्कीच पचेल.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
फायबरयुक्त पदार्थांचं सेवन न केल्यास होतील ‘हे’ गंभीर परिणाम
यासाठी आहारात असाव्यात या सुपरसीड्स
दहीभात खाण्याचे फायदे आणि झटपट रेसिपी