मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड याविषयी मोकळेपणे बोलण्याची अनेकींना लाज वाटते. त्यामुळे सॅनिटरी पॅड कसं निवडावं हेच काहीजणींना माहीत नसतं. जाहीरात पाहून अथवा दिसेल ते सॅनिटरी पॅड त्या निवडतात. जर सॅनिटरी पॅड तुमच्या त्वचेला सूट झालं नाही तर त्यामुळे तुमच्या मांड्यांना रॅशेस येतात. वर्षानूवर्ष चुकीचं पॅड वापरल्यामुळे मांड्या दर महिन्याला होणाऱ्या रॅशेसमुळे अक्षरशः काळ्या पडतात. यासाठीच तुम्हाला तुमच्या त्वचेला सूट होईल असं सॅनिटरी पॅड कसं निवडायचं हे माहीत असायला हवं. आम्ही तुमच्यासोबत यासाठी काही सोप्या टिप्स शेअर करत आहोत. ज्या तुमच्या मासिक पाळीला अधिक सुखकर करू शकतात.
सॅनिटरी पॅडचं मटेरिअल आहे महत्त्वाचं –
जर तुम्हाला मासिक पाळीत मांडीला रॅशेस येत असतील अथवा व्हजायनल इनफेक्शन होत असेल तर तुम्ही वापरत असलेल्या सॅनिटरी पॅडचं मटेरिअल चेक करा. याबाबत तुम्ही तुमच्या गायनॅकॉलिजिस्टची मदतही घेऊ शकता. त्यांच्या सल्लानुसार मासिक पाळीसाठी पॅड निवडताना त्याचे मटेरिअल जास्तीत जास्त मऊ आणि तलम असेल याची काळजी घ्या. सॅनिटरी पॅडचं कापड मऊ असण्यासोबतच तुमच्या स्किनला सूट होणारंही असायला हवं. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर चुकीच्या मटेरिअलचं सॅनिटरी पॅड वापरण्यामुळे तु्म्हाला इनफेक्शन होऊ शकतं.
सॅनिटरी पॅड निवडताना या गोष्टी ठेवा लक्षात –
योग्य सॅनिटरी पॅडची खासियत ही असते की त्यामध्ये जास्तीत जास्त ओलावा शोषून घेण्याची क्षमता असते. शिवाय असंच सॅनिटरी पॅड निवडा ज्यामध्ये सेंट्रल लॉकची व्यवस्था असेल. ज्यामुळे हेव्ही फ्लोच्या काळातही तुमचं सॅनिटरी पॅड लिक होणार नाही. शिवाय तुमच्या व्हजायनल भागाला आरामदायक वाटेल अशाच सॅनिटरी पॅडची निवड करा. याशिवाय जर तुमची त्वचा ड्राय असेल तर योग्य सॅनिटरी पॅड वापरणं खूप गरजेचं आहे नाहीतर सॅनिटरी पॅडमुळे तुमची त्वचा अती प्रमाणात कोरडी होऊ शकते.
सुंगधित सॅनिटरी पॅड वापरू नका –
सुंगधित सॅनिटरी पॅड विकत घेणं टाळा. कारण अशा सॅनिटरी पॅडमध्ये सुंगधासाठी केमिकल्सचा वापर केलेला असतो. अशा सॅनिटरी पॅडमुळे तुम्हाला चांगला सुगंध नक्कीच येतो पण त्वचेचं मात्र यामुळे चांगलंच नुकसान होतं. यासाठीच संवेदनशील त्वचा असणाऱ्या लोकांनी सुंगध विरहित सॅनिटरी पॅडच निवडावे.
सॅनिटरी पॅडची साईझ निवडताना –
सॅनिटरी पॅड खरेदी करताना निरनिराळ्या साईजचे सॅनिटरी पॅड खरेदी करा. कारण जर तुम्ही हेव्ही फ्लोसाठी असलेले मोठ्या साईझचे पॅड मासिक पाळीच्या सर्व दिवसांमध्ये वापरले तर ज्या दिवशी तुम्हाला कमी रक्तस्त्राव होतो त्या दिवशी उगाचच जड पॅड कॅरी केल्यामुळे तुमच्या मांड्यावरील रॅशेस वाढू शकतात. यासाठीच नेहमी तुमच्या मासिक पाळीच्या फ्लोनुसार निरनिराळ्या आकाराचे सॅनिटरी पॅड वापरा. दिवस आणि रात्रीसाठीही तुम्ही पॅडच्या आकारात बदल करू शकता. 17 ते 25 सेंटीमिटर लांबीचे पॅड दिवसासाठी आणि रात्रीसाठी 35 सेंटीमिटर लांबीचे पॅड निवडा. ज्यामुळे रात्री तुम्हाला पॅड लिक होण्याची चिंता सतावणार नाही.
पॅड बदलण्याची वेळ –
सॅनिटरी पॅड कधी बदलावे तर ते जास्त खराब होण्याआधी बदलणं गरजेचं आहे. एखाद्या दिवशी जर तुमचा ब्लड फ्लो कमी असेल तरी किमान सहा तासांनी तुम्ही पॅड बदलणं गरजेचं आहे. कारण मासिक पाळीतील रक्त बाहेर पडल्यावर त्याचा जीवजंतूंशी संपर्क होतो आणि तुमच्या त्वचेला इनफेक्शन होण्याचा धोका वाढू लागतो. यासाठीच वेळच्या वेळी सॅनिटरी पॅड बदला ज्यामुळे तुमच्या मांड्यावर रॅशेस पडणार नाहीत.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
सॅनिटरी पॅडच्या कडा मांड्याना लागतात.. मग करा या सोप्या आयडिया
उन्हाळ्यात तुम्हालाही नकोसे होतात पिरेड्स, मग वाचाच
पिरेड्समध्ये तुम्ही तर करत नाही या 5 चुका (5 mistakes every girl do in her periods)