ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
Coconut Oil Massage in Monsoon in Marathi

पावसात भिजण्यापूर्वी अंगाला लावा नारळाचे तेल, जाणून घ्या फायदे

भिजण्यापू्र्वी नारळाचं तेल त्वचेवर लावावं असं नेहमी सांगण्यात येतं. पूर्वीच्या काळातही लोक त्वचेची निगा राखण्यासाठी त्वचेला नारळाचं तेल लावत असत. नारळाचे तेल त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असून त्वचेवर नारळाच्या तेलाचे अनेक फायदे होतात. त्वचा मऊ, मुलायम, निरोगी आणि हायड्रेट राहण्यासाठी नारळाचे तेल बेस्ट आहे. नारळाच्या तेलामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. यासाठी अंगाला नारळाच्या तेलाने मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. पावसाच्या पाण्यात भिजण्यापूर्वी जर तुम्ही अंगाला नारळाचं तेल लावलं तर तुम्हाला त्वचेचं इनफेक्शन होत नाही. यासाठीच वाचा नारळाचे तेल आणि त्याचे फायदे | Benefits Of Coconut Oil In Marathi, पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी | Monsoon Skin Care Tips In Marathi, त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय | Skin Diseases Ayurvedic Remedies In Marathi

पावसाळ्यात त्वचेला का लावावं नारळाचं तेल

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढलेली असते. जीवजंतू आणि फंगल इनफेक्शनचा धोका वाढलेला असतो. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आजारपणे आणि त्वचेचे विकार पसरतात. मात्र नारळाच्या तेलात या जीवजंतूंना रोखणारे अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. नारळाचे तेल तुमच्या त्वचेत खोलवर मुरतं आणि त्वचेचं संरक्षण करतं. सहाजिकच जर तुम्ही पावसात भिजण्यापूर्वी अंगाला नारळाचं तेल लावलं तर तुम्हाला त्वचेचं इनफेक्शन होत नाही. शिवाय नारळाच्या तेलामुळे तुमच्या त्वचेचं पोषणही होतं. 

पावसात भिजण्याआधी नारळाचे तेल अंगाला लावण्याचे फायदे

त्वचेची निगा राखण्यासाठी जर पावसात भिजण्यापूर्वी तुम्ही नारळाचे तेल त्वचेला लावणार असाल तर त्याचे फायदे जरूर जाणून घ्या.

  • नारळाच्या तेलात अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि मायक्रोबीयल आणि फॅटी अॅसिड भरपूर असतात.
  • नारळाच्या तेलात तुमच्या त्वचेचं खोलवर पोषण करून, त्वचेला मऊ, मुलायम, चमकदार करणारे गुणधर्म असतात.
  • नारळाचे तेल त्वचेत सहज मुरतं, जेव्हा तुम्ही त्वचेवर नारळाचे तेल लावून मसाज करता तेव्हा तुमच्या त्वचेवरील पोअर्स मोकळे होतात आणि तेलाच्या पोषणामुळे त्वचा मऊ होते. 
  • नारळाचे तेल तुमच्या त्वचेवर संरक्षक कवच म्हणून काम करतं ज्यामुळे तुमच्या त्वचेला इनफेक्शनचा धोका राहत नाही.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT