ADVERTISEMENT
home / केस
coconut water is helpful to control dandruff problem in marathi

नारळ पाण्याने दूर करा केसांतील कोंडा, असा करा वापर

हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होते. हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम त्वचेप्रमाणेच केसांवरही होतो. स्काल्प कोरडा झाल्यामुळे केसांत मोठ्या प्रमाणावर कोंडा निर्माण होतो. सहाजिकच हिवाळा सुरू होताच केसांच्या समस्या आणि कोंडा वाढू लागतो. केसांत कोंडा निर्माण झाला की स्काल्पला सतत खाज येते आणि केस गळण्याचे प्रमाण वाढू लागते. चारचौघात असताना  केसांमधील कोंडा कपड्यांवर पडण्यामुळे संकोच वाटतो तो वेगळाच. यासाठीच हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यायला हवी. कोंड्यावर उपाय करण्यासाठी आजवर तुम्ही अनेक उपाय केले असतील. पण कधी तुम्ही केसांना नारळाचे पाणी लावले आहे का? नसेल तर हा प्रयोग जरूर करून पाहा. कारण यामुळे तुमच्या केसांमधील त्वचा हायड्रेट राहील आणि कोंडा वाढणार नाही.

नारळपाणी पिण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Coconut Water Benefits In Marathi)

नारळाचे पाणी केसांसाठी का आहे फायद्याचे 

नारळाचे पाणी संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण नारळाच्या पाण्यात अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन्स, अॅंटि ऑक्सिडंट, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि झिंक मोठ्या प्रमाणावर असते. या सर्व घटकांची शरीराचे कार्य उत्तम चालण्यासाठी गरज असते. त्यामुळे नियमित नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. पण एवढंच नाही तर नारळाचे पाणी केसांनाही उपयुक्त ठरते कारण नारळाच्या पाण्यामधून केसांना चांगले पोषक घटक मिळतात. केसांचा कोंडा दूर करण्यासाठी नारळाच्या पाण्यामधील पोषक घटकांचा चांगला फायदा होतो. 

केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)

ADVERTISEMENT

नारळपाण्यामुळे केसांवर काय होतो परिणाम

नारळपाण्याने तुम्ही जर नियमित तुमचा स्काल्प धुतला अथवा नारळपाण्याने केसांच्या मुळांना मसाज केला तर त्वचा निरोगी राहते. ज्यामुळे त्वचेमधील लवचिकता वाढून केस मजबूत होतात. सहाजिकच याचा चांगला परिणाम केसांवर होतो. ज्यामुळे केस गळणे कमी होते. जर तुमच्या केसांत कोंडा झाल्यामुळे स्काल्पला खाज येत असेल तर नारळ पाण्यामुळे तुमचा स्काल्प हायड्रेट राहण्यास मदत होते आणि खाज येणं कमी होतं. केसांची वाढ चांगली झाल्यामुळे केस गळणे कमी होते, केस लवकर पांढरे होत नाहीत. नारळ पाण्यासोबत तुम्ही थोडा लिंबाचा रस मिसळून केसांना लावू शकता. ज्यामुळे केसांना चांगले कंडिशनर मिळते आणि केस मऊ आणि शाइनी होतात. त्यामुळे नारळाचे पाणी नियमित प्या देखील आणि आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांनाही लावा. ज्यामुळे तुमचा कोंडा आणि केसांच्या अनेक समस्या सहज दूर होतील. 

ओल्या नारळाची रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी (Olya Naralachi Recipe In Marathi)

22 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT