ADVERTISEMENT
home / मनोरंजन
#angrybirdsmovie2 मधील ‘रेड’ला कपिल शर्माचा आवाज

#angrybirdsmovie2 मधील ‘रेड’ला कपिल शर्माचा आवाज

हॉलीवूडचा एक लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपट ‘Angrybird’चा सिक्वल लवकरच येत आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला अ्ॅंग्री बर्ड चित्रपट बच्चेकंपनीचा अगदी आवडता चित्रपट होता. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वलची म्हणजेच #angrybirdsmovie2 ची लहान मुलं अगदी अतिशय आतूरतेने वाट पाहत आहेत. येत्या 23 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत डबिंग करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या हिंदी डबिंगसाठी कपिल शर्मा शोमधील कॉमेडी स्टार कपिल शर्मा, किकू शारदा आणि अर्चना पूरनसिंह या तिघांचा आवाज वापरण्यात आला आहे. कपिल शर्माने या चित्रपटातील ‘रेड’ या प्रमुख पात्राला आवाज दिला आहे. कपिल शर्माच्या मते त्याने या पात्राचं डबिंग करताना दिग्गज कलाकार नाना पाटेकर आणि  धर्मेंद यांची शैली वापरली आहे. ज्यामुळे रेड सर्वांना नक्कीच आवडेल. कपिल शर्माने पहिल्यांदाच एखाद्या कार्टून कॅरेक्टरला आवाज दिला आहे. शिवाय या निमित्ताने त्याला हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधीदेखील मिळाली आहे. सहाजिकच कपिल शर्माचा हा अनोखा अंदाज त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. हिंदी कलाकारांनी हॉलीवूड चित्रपटांना आवाज देण्याची ही पहिली वेळ नक्कीच नाही. यावर्षीच जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दी लायन किंग’ च्या हिंदी चित्रपटात शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खानने आवाज दिला होता. या चित्रपटातील या दोघांचेही डबिंग फारच उत्तम झालं होतं. त्यामुळे आता अॅंग्रीबर्डचा सिक्वल पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.

कपिल शर्मा होणार लवकरच बाबा

कपिलने 12 डिसेंबर 2008 रोजी त्याची बालमैत्रीण गिन्नी चतरथ हिच्याशी विवाह केला  कपिलचे लग्न हे बी टाऊनसाठी एक सोहळाच होता. त्याच्या लग्नसोहळ्यालाही बी टाऊनमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामुळे कपिलचे लग्न अगदी धुमधडाक्यात झालं होते. कपिल शर्मा या शोमुळे कपिल सर्वसामान्य जनतेच्या घरात पोहचला आहे. त्याच्या खुमासदार शैली आणि कॉमेडी सेन्समुळे त्याने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ज्यामुळे चाहत्यांना आता कपिलला खऱ्या बाबाच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच कपिल आणि गिन्नीच्या जीवनातील आनंद नव्या पाहुण्याच्या आगमनाने द्विगुणित व्हावा हिच ईच्छा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.डिसेंबरमध्ये कपिल  आणि गिन्नी आई-बाबा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

कपिलचा यशस्वी प्रवास

कपिल शर्मा हा टेलिव्हिजन माध्यमातील एक जबरदस्त स्टार आहे. ‘The Kapil sharma show’ च्या माध्यमातून त्याने अनेक चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लंडन बुक ऑफ रेकॉर्डच्या मते ‘दी कपिल शर्मा शो’ जगभरात पाहिला जाणारा एक लोकप्रिय शो आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी कपिलच्या जीवनात मोठं वादळ आलं होतं. कपिल आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. ज्यामुळे निर्मात्यांना शो बंद करावा लागला होता. हा शो परत सुरु होणार की नाही अशी अनेकांना शंका होती. पण कपिलने आता कमबॅक केलं आहे आणि सर्व काही पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. शिवाय आता त्याने डबिंच्या माध्यमातून हॉलीवूडमध्येही पदार्पण केलं आहे. लवकरच कपिल बाबाही होणार असल्याने त्याच्या जीवनात सध्या आनंद भरभरून वाहत आहे.

ADVERTISEMENT

 

अधिक वाचा –

‘साजणा’ने गाठली शंभरी, मालिकेचं यश आणि पूजाच्या वाढदिवसानिमित्त केलं सेलिब्रेशन

बाहुबली प्रभास आणि अनुष्काच्या नात्याबाबत नवा खुलासा

ADVERTISEMENT

OMG अर्जुन रेड्डी स्टार Vijay Deverakonada सोबत झळकणार Janhvi Kapoor

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

20 Aug 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT