ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कलाकार,सध्या काय आहे त्यांचे स्टेटस

सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कलाकार,सध्या काय आहे त्यांचे स्टेटस

एकाच ठिकाणी काम करत एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या अनेक लव्हस्टोरीज तुम्ही ऐकल्या आहेत. कलाकारांच्या बाबतीतही असे कायम होते. एकाच मालिकेत किंवा चित्रपटात काम करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. आज अशाच काही स्मॉल स्क्रिन कपल्सच्या लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत आणि सध्या या कपल्सचे रिलेशनशीप स्टेटस काय ते देखील जाणून घेऊया

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया

divyanka dahiya

 ‘ये है मोहब्बते’ मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी मालिकेमुळे घराघरात जाऊन पोहोचली. या मालिकेत करण पटेल तिचा नवरा दाखवण्यात आला आहे. पण रिअल लाईफमध्ये मात्र वेगळाच ट्विस्ट आला. या मालिकेत पोलिसाची भूमिका साकारणारा विवेक दहिया दिव्यांकाचा लाईफपार्टनर झाला. अभिषेक सिंह नावाचे पात्र त्याने या मालिकेत साकारले होते. तर दिव्यांका मुख्य भूमिकेत होती. आता त्यांची लव्हस्टोरी म्हणाल तर अशी काही नाही. कारण या दोघांचे चक्क ठरवून लग्न झाले आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांनी लग्न केले आणि आता ते हॅपिली मॅरिड कपल आहे.

ADVERTISEMENT

जेेव्हा कार्तिकच्या नावाने सारा ओरडते तेव्हा,  पाहा व्हिडिओ

 रोहन मेहरा आणि कांची सिंग

kanchi-rohan

रोहन मेहरा आणि कांची सिंग यांची लव्हस्टोरी एकता कपूरच्या मालिकेप्रमाणे आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत जेव्हा काहीवर्षानंतरचा काळ दाखवण्यात आला. तेव्हा या नव्या जनरेशनच्या चेहऱ्यात ही दोघं होती. नक्श आणि गायत्री अशी त्यांनी साकारलेल्या पात्रांची नावे होती. सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले ही मालिका खपू वर्षे टिआरपी टिकवून होती. त्यामुळे साहजिकच या मालिकेतील प्रत्येक कलाकारांवर सगळ्यांचे लक्ष होते. त्यातच रोहन मेहरा आणि कांची सिंग एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बाहेर पसरु लागल्या. नंतर त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने त्यांचे रिलेशनशीप कर्न्फम केले.  आता या कपलच्या रिलेशनशीपला ३ ते ४ वर्षे झाली आहेत. नुकतीच ही जोडी मस्त आऊटिंग करुन आली आहे. त्यामुळे त्यांचे रिलेशनशीप छान सुरळीत सुरु आहे. यात शंका नाही.

ADVERTISEMENT

*आणखी एक महत्वाची गोष्ट कांची सोबत रिलेशनशीपमध्ये येण्याआधी रोहन मेहरा  युक्ती कपूर (सिया के राम) हिला देखील डेट करत असल्याच्यादेखील चर्चा होत्या. पण आता त्यावर पडदा पडला आहे

आदिती भाटिया आणि अभिषेक वर्मा

aaditi abhishek

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील बहीण भावाची जोडी अर्थात आदिती भाटिया आणि अभिषेक वर्मा मालिकेच्या शुटींग दरम्यान एकमेकांच्या रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. सेटवरील फावल्या वेळात ही दोघे अनेकदा एकमेकांच्या मेकअप रुममध्ये दिसायचे. सोशल मीडियावरदेखील ते त्यांचे बरेच फोटो शेअर करत होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. २०१८ च्या शेवटापर्यंत या दोघांचे ब्रेकअप झाले असते कळले. त्यामुळे आदिती आणि अभिषेकच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला. पण या चर्चानंतर या दोघांनी आम्ही फक्त मित्र असल्याचे सांगितले. पण त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एकमेकांचे फोटो काढून टाकणे आणि एकमेकांना Unfollow करणे यामुळे त्यांच्यात दुरावा आला हे स्पष्ट झाले.

ADVERTISEMENT

बडे लोक बडी बाते… श्लोकाला सूनमुख म्हणून मिळाला ३०० कोटीचा हार

 रश्मी देसाई- नंदिश संधू

nandish rashmi

‘उतरन’ या मालिकेतील हीट जोडी वीर सिंह बुंदेला आणि तपस्या राठोड म्हणजेच रिअल लाईफ रश्मी देसाई आणि नंदीश संधू … या मालिकेत जरी या दोघांनी इच्छामुळे एकत्र येता आले नसले. तर रिअल लाईफमध्ये मात्र त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. सेटवरील त्यांची जवळीक सगळ्यांनाच दिसत होती. त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना त्यांनी लवकर फुलस्टॉप दिले ते लग्न करुन..२०१२ साली त्या दोघांनी लग्न केले पण त्यांच्या लग्नानंतर नंदीशच्या खराब वागणुकीला कंटाळून रश्मीने २०१६ साली नंदीशशी घटस्फोट घेतला. त्यानंतर या दोघांच्याही लिंकअपविषयी फार काही कळले नाही.

ADVERTISEMENT

सरोगसीचा आधार घेत हे सेलिब्रिटी झाले आई-बाबा

  राकेश बापट-रिद्धी डोगरा

rakesh bapat

‘मर्यादा:लेकीन कब तक’ या मालिकेतील मुख्य जोडी आदित्या आणि प्रिया हे दखील या मालिकेच्या शुटींग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी २०११साली लग्न केले. २०१२ साली त्यांच्या मालिकेने निरोप घेतला. राकेश आणि रिद्धीची जोडी परफेक्ट जोडी म्हणून कायमच लोकांच्या लक्षात राहिली. पण लग्नाच्या ८वर्षानंतर या दोघांनी अचानक घटस्फोट घेतला याच्या चर्चा आहेत. पण या दोघांनीही या संदर्भात काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शिवाय त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही असे काही वाटत नाही.

ADVERTISEMENT

(फोटो सौजन्य- Instagram)

26 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT