ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
dark-skin-on-upper-lip-easy-home-remedies

अपर लिप्स झाले असतील काळे तर करा सोपे उपाय

बरेचदा आपल्या चेहऱ्याचा रंग अचानक काळा होऊ लागतो आणि आपल्याला कारण कळत नाही. त्याचे खरे कारण आहे डिस्कलरेशन. आपल्या त्वचेचा वेगवेगळा भाग यामुळे काळा होऊ लागतो आणि त्वचेवर वेगवेगळ्या ठिकाणी काळे डाग येतात. काही जणांना फ्रेकल्स येणे, काही जणांना सुरकुत्या येणे तर काही जणांना काळी वर्तुळं येणे असा त्रास होतो. तर यामध्ये अजून एक समस्या म्हणजे ओठ काळे पडणे. विशेषतः अप्पर लिप्स (upper lips). दोन्ही ओठ काळे पडतात पण त्यापैकी जास्त त्रासदायक ठरतो तो वरचा ओठ. लिप पिगमेंटेशन (lip pigmentation) काही घरगुती उपाय (home remedies for lip pigmentation) नक्कीच तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्ही प्रत्येकवेळी महागड्या उपायांचा आधार घेऊ नका. याचा परिणाम व्हायला वेळ लागतो मात्र नैसर्गिक असल्याने याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. अपर लिप्स काळे झाले असतील तर कोणते सोपे घरगुती उपाय करायचे ते आपण जाणून घेऊया पण त्याआधी याची नक्की काय कारणे आहेत ते बघूया. 

ओठ काळे होण्याची कारणे (Reason for dark lips)

black lips

ओठ काळे होण्याच्या मागे अनेक कारणे असू शकतात आणि ओठ काळे होणे हे हायपरपिगमेंटेशनच्या श्रेणीमध्येच येते. याची काही कारणे पुढीलप्रमाणे – 

  • गरजेपेक्षा अधिक काळ उन्हामध्ये राहणे 
  • पाणी जास्त न पिणे 
  • सिगरेट पिणे 
  • कोणत्याही लिपस्टिक अथवा टूथपेस्टची अलर्जी होणे 
  • एखाद्या औषधाची अलर्जी असणे 
  • आनुवंशिकतेने पिगमेंटेशन येणे 
  • लहानपणी आवश्यकतेपेक्षा जास्त ओठांना चावल्यास
  • एनिमिया अथवा विटामिन्सची कमतरता 
  • किमोथेरपी अथवा एखादा आजार असणे 

आजकाल अनेक केमिकल उपचार, लेझर अथवा हायड्रोक्विनन उपचार अस्तित्वात आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या वरील ओठांचा काळेपणा घालवू शकता. पण त्याआधी तुम्ही घरगुती उपचारांचा नक्कीच वापर करून पाहिला पाहिजे. 

लिंबू आणि साखरेचा स्क्रब (Lemon and Sugar Scrub)

lemon and sugar
lemon and sugar scrub

काळ्या ओठांची समस्या तुम्हाला कोणत्याही अलर्जी अथवा उन्हाच्या त्रासामुळे झाली असेल तर तुम्ही ही समस्या काही दिवसांमध्ये कमी करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला हा घरगुती उपाय उत्तम ठरतो. 

ADVERTISEMENT
  • एका लिंबाचा काप तुम्ही साखरेमध्ये बुडवा आणि हलक्या हाताने हे ओठांवर घासा
  • दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही दीड चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध आणि थोडेसे ग्लिसरीन मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही ओठांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. थोडा वेळ तसेच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने तुम्ही धुवा. यावर साबण लाऊ नका अन्यथा ओठांची जळजळ होईल

डाळिंबामुळे होईल ओठांचा रंग गुलाबी (pomegranate) 

pomogranate

डाळिंबाच्या रसामध्ये एंजाईम्स असतात जे हायपरपिगमेंटेशच्या समस्येतून बाहेर येण्यासाठी मदत करतात. डाळिंबाचे सौंदर्यासाठी फायदे होतात. तुम्ही याचा उपयोग ओठांसाठी नक्कीच करू शकता. 

  • 1 चमचा डाळिंबाचे दाणे, 1 लहान चमचा गुलाब पाणी आणि 1 मोठा चमचा ताजी दुधाची साय घ्या. या तिन्ही गोष्टी मिक्स करून घ्या आणि ओठाला लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. थोडा वेळ तसंच ठेवा आणि मग साधारण 10 मिनिट्सने पाण्याने धुवा
  • ही ट्रिक तुम्ही ओठांना गुलाबीपणा येईपर्यंत रोज वापरू शकता. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत

स्ट्रॉबेरी आणि बेकिंग सोड्याची कमाल 

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी आणि बेकिंग सोड्याची मदत घेऊ शकता. हादेखील चांगला घरगुती उपाय आहे. नक्की कोणत्या कारणाने ओठ काळे पडत आहेत हे माहीत नसेल तर याचा उपयोग करून पाहा. 

  • 3-4 क्रश्ड स्ट्रॉबेरी आणि एक लहान चमचा बेकिंग सोडा घ्या. हे दोन्ही नीट मिक्स करा आणि ओठांना लाऊन मसाज करा. थोड्या वेळानंतर हा पॅक थंड पाण्याने धुवा
  • तुम्ही ही ट्रीक रात्रीच्या वेळी नाईट स्किन केअर रूटीन म्हणूनही वापरू शकता 

या टिप्सशिवाय तुम्ही बदामाचे तेल अथवा नारळाच्या तेलानेही ओठांचा मसाज रोज हलक्या हाताने केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. अपर लिप्सचा काळेपणा कमी करण्यासाठी अगदी सोपे आणि साधे उपाय आहेत ज्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल अथवा तुम्हाला कोणत्याही गोष्टींची अलर्जी असेल तर कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

अधिक वाचा – DIY – तिळाच्या तेलाने ओठांचा काळेपणा करा त्वरीत दूर

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT