कोणताही हंगाम असो ओठांची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे असते. विशेषतः ओठांचा कोरडेपणा आणि टॅनिंगपासून ओठांना वाचवणे खूप गरजेचे आहे कारण जर यापासून काळजी घेतली नाही तर ओठांना काळेपणा येतो. तसं तर बाजारामध्ये ओठांचा काळेपणा घालविण्यासाठी खूप उत्पादने मिळतात. पण ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात तिळाच्या तेलाचा समावेश करून घेतलात तर त्याचा फायदा होतो. तिळाच्या तेलाचे असे घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी फायदा होतो. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपण जाणून घेऊया.
हळद आणि तिळाच्या तेलाचा लिप मास्क
Shutterstock
साहित्य
- अर्धा चमचा तिळाचे तेल
- चिमूटभर हळद
वापरण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये तिळाचे तेल घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिक्स करा
- हा घरगुती लिप मास्क तुम्ही ओठांवर लावा
- साधारण अर्धा तास तसंच राहू द्या आणि मग ओठ थंड पाण्याने स्वच्छ धुवा
- हळदीमध्ये ब्लिचिंग घटक असतेत ज्यामुळे तुमच्या ओठांना उजळपणा मिळतो
- ओठ जर टॅनिंगमुळे काळे झाले असतील तर तुम्ही हा लिप मास्क रोज लावा आणि ओठांचा काळेपणा दूर करा
वजन कमी करण्यासोबतच मूडही चांगला ठेवतं तिळाचं तेल (Sesame Oil Benefits In Marathi)
तीळ आणि नारळाच्या तेलाचा लिप बाम
साहित्य
- एक लहान चमचा तिळाचे तेल
- अर्धा चमचा नारळाचे तेल
वापरण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये दोन्ही तेल नीट मिक्स करून घ्या
- आता हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोन वेळा ओठांना लावा आणि हलक्या हाताने ओठांचा मसाज करा. यामुळे ओठांचा काळेपणा आठवड्यात दूर होण्याचा तुम्हाला अनुभव मिळतो
- तुम्हाला हवं तर तुम्ही केवळ तिळाच्या तेलाचाही वापर करून घेऊ शकता
- रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर हे मिश्रण ओठांना लाऊन झोपलात तर तुमचे ओठ मूळ गुलाबी रंगाचे होतील आणि मऊ आणि मुलायम राहतील
थंडीत त्वचेवर वापरा तिळाचं तेल आणि मिळवा चमकदार आणि मऊ त्वचा
साखर आणि तिळाच्या तेलाचा लिप स्क्रब
Shutterstock
साहित्य
- एक लहान चमचा साखर
- अर्धा चमचा तिळाचे तेल
वापरण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये साखर घ्या. साखरेचे दाणे जर मोठे असतील तर तुम्ही हलकेसे क्रश करून घ्या
- आता यामध्ये तिळाचं तेल मिक्स करा आणि लिप स्क्रब तयार करा
- त्यानंतर हा स्क्रब ओठांना लावा आणि साधारण एक मिनिटपर्यंत ओठ स्क्रब करा आणि मग पाण्याने ओठ साफ करून घ्या
- तुम्हाला हवं तर तुम्ही या स्क्रबचा रोज वापर करू शकता अथवा आठवड्यातून तीन वेळा तरी किमान याचा वापर करा
थंडी चालू झाल्यावर फुटतात लगेच टाचा, तर वापरा तिळाचे तेल आणि मेण
त्वचेसाठी तिळाच्या तेलाचे फायदे
- तिळाच्या तेलामध्ये सेसमोल आणि सेसमिनोल नावाचे दोन तत्व आढळतात, जे अत्यंत उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स असतात. तसंच तिळाच्या तेलामध्ये फॅटी अॅसिड्स असतात जे त्वचेवर मऊपणा आणण्यास मदत करतात
- तिळाचे तेल औषधीय गुणांनी युक्त असतात आणि हे अँटिइन्फ्लेमेटरीदेखील असते. तुमच्या त्वचेवर कोणत्याही कारणाने सूज आली असेल तरत तिळाच्या तेलाचा वापर केल्याने ती सूज कमी होते
- कोरडेपणामुळे बऱ्याचदा त्वचा फाटते. प्रत्येक हंगामात ही समस्या असतेच. तुम्ही जर तिळाचे तेल ओठांना लावले तर हे एक उत्तम मॉईस्चराईजर म्हणून काम करते आणि त्याशिवाय हे तेल अँटिनॉनसेप्टिक असल्याने होणाऱ्या वेदनाही कमी होतात
- तिळाच्या तेलामध्ये जखम भरण्याचे घटकही असतात. जर तुमचे ओठ अधिक फाटले असतील आणि त्यामध्ये फट पडली असेल तर तिळाच्या तेलाने मसाज केल्यास, ओठांना अधिक चांगला फायदा मिळतो
- चेहरा, हात आणि त्वचा फाटल्यास, टॅनही होते आणि काळी पडते. तिळाच्या तेलामध्ये असणारे विटामिन ई हे कमी करण्यास मदत करते
- त्वचा स्वच्छ राखण्यासाठीही तिळाच्या तेलाचा वापर करण्यात येतो. हे त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचे काम करते
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक