ADVERTISEMENT
home / भविष्य
डिसेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती असतात तरी कशा,  घ्या जाणून

डिसेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती असतात तरी कशा, घ्या जाणून

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म, महिना आणि वर्ष हे ठरलेलं असतं. त्याच्या जन्मवेळेनुसार त्याचं भविष्य ठरलेलं असतं. प्रत्येक माणसाच्या जन्मानुसार त्याचा स्वभाव आणि त्याचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे माणूस वागतो आणि बोलतो. डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती नक्की कशा असतात ते आपण जाणून घेणार आहोत. खरं तर डिसेंंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या अतिशय दिलफेक असतात असं म्हटलं जातं. पण त्याचबरोबर अतिशय मेहनती, आशावादी आणि विसराळूदेखील असतात. या राशीचा स्वामी हा गुरू आहे. तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याआधी नक्की जाणून घ्या काय आहेत या व्यक्तीची वैशिष्ट्य – 

1- डिसेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती या भाग्यशाली असण्यासह बुद्धिवादीदेखील असतात. यांच्यामध्ये जास्त प्रमाणात टॅलेंट असतो. त्यामुळे इतर व्यक्तींपेक्षा थोड्या वेगळ्या असतात. 

2- या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचं मन हे कायम तरूण राहातं. तसंच काहीतरी सतत नवीन करण्याची उत्सुकता या व्यक्तींमध्ये असते. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन काहीतरी नवं करण्याची प्रेरणा या व्यक्ती देतात. 

3- जन्मापासूनच नेता असण्याचं वैशिष्ट्य यांच्यामध्ये असतं. या व्यक्तींंना राजकारण हे क्षेत्र जास्त प्रमाणात आकर्षित करतं. तसंच या महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्ती आपलं करिअर चित्रपट, राजकारण, उद्योग यामध्ये जास्त प्रमाणात घडवतात. 

ADVERTISEMENT

4- डिसेंबर महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींची रास ही धनु आहे. या राशीच्या व्यक्ती शक्तीशाली मानल्या जातात. पण बऱ्याचदा इतरांचा तिरस्कारही या व्यक्तींना सहन करावा लागतो. त्यामुळे रागाच्या भरात स्वतःचं नुकसानदेखील या व्यक्ती करून घेतात. 

5- या महिन्यात जन्म झालेल्या मुली या अंधारातूनही एखादा आशेचा किरण नक्कीच शोधतात. या व्यक्ती अतिशय आशावादी असतात. त्यांचा हा सकारात्मक दृष्टीकोन त्यांना आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा आधार मिळवून देतो. तशाच या राशीच्या मुली सहसा कोणावरही रागावत नाहीत. एक उत्तम गर्लफ्रेंड आणि गृहिणी म्हणून या मुली स्वतःला सिद्ध करतात. पण या कोणावरही अवलंबून नसतात. त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा आणल्यास, यांच्यासारखी वाईट व्यक्ती नाही. 

6- या व्यक्तींना मजामस्करी करणं खूपच आवडतं. लहानसहान गोष्टीतही या व्यक्ती आनंद शोधतात. तुम्ही या व्यक्तींबरोबर असाल तर कधीही कंटाळणार नाही या गोष्टीची नक्कीच हमी आहे. पण या व्यक्ती अतिशय फटकळ असतात. समोरच्या व्यक्तीला कितीही वाईट वाटलं तरीही या व्यक्ती जे मनात आहे ते तोंंडावर सांगतात. 

7- आपलं प्रेम दाखवण्यासाठी सरळ समोरासमोर बोलणं या व्यक्तींंना जमत नाही. पण या व्यक्ती तुमच्या सतत जवळ राहत असतील आणि तुम्हाला हसवत असतील तर नक्कीच या व्यक्ती तुमच्या प्रेमात आहेत हे समजून जा. तुम्हाला चांगलं वाटावं यासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात. सगळ्या गोष्टी अगदी इमानदारी आणि खरेपणाने या व्यक्ती करतात. 

ADVERTISEMENT

8- काही प्रमाणात या व्यक्ती आखडू आणि जिद्दीदेखील असतात. पण सहसा दाखवत नाहीत. या व्यक्तींना जर काही आवडत नसेल तर या व्यक्ती पटकन त्या गोष्टींचा स्वीकार करत नाहीत. आपली कितीही चूक असली तरीही पटकन स्वीकारण्याचा यांचा स्वभाव नाही. त्यामुळे बऱ्याचदा इतरांशी भांडण होण्याची शक्यता असते. 

9- आपलं स्वातंत्र्य या व्यक्तींना खूपच महत्त्वाचं वाटतं. या व्यक्ती अतिशय उत्साही असतात आणि आयुष्यात जे काही करायचं आहे ते आपल्या स्वतःच्या हिमतीवर करण्याची धमक यांच्यात असते. या व्यक्तींना कोणीही त्यांना नियंत्रणात ठेवलेलं आवडत नाही. कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांना आवडत नाही. आपल्या अटी आणि शर्तींंवर या व्यक्ती आयुष्य जगतात. 

10- यांच्या आयुष्यात साहस नाही असं कधीच होत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवा विचार, नवा करण्याचा उत्साह त्यांना काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. त्यामुळे यांचं आयुष्य नेहमी काहीतरी वेगळं करण्यात व्यग्र राहातं. इतर व्यक्तींना त्यांच्या या स्वभावाचा नेहमीच हेवा वाटतो. 

भाग्यशाली क्रमांक  – 6,16,23,60 आणि 81

ADVERTISEMENT

भाग्यशाली रंग – पिवळा, हलकासा आकाशी, गुलाबी

भाग्यशाली दिवस –  गुरुवार, मंगळवार

भाग्यशाली खडा – पुखराज

डिसेंबरध्ये जन्म झालेल्या प्रसिद्ध व्यक्ती – 

ट्विंकल खन्ना, दिलीप कुमार, रजनीकांत, सलमान खान, दिया मिर्झा, गोविंदा, रतन टाटा, तमन्ना भाटिया, युवराज सिंग, शरद पवार, सोनिया गांधी

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा

जाणून घ्या, सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती नक्की असतात तरी कशा, जाणून घ्या

नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात प्रभावशाली, जाणून घ्या

ADVERTISEMENT
29 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT