ADVERTISEMENT
home / मनोरंजन
दीपिकाने रणवीरची का केली बॅटने ‘धुलाई’

दीपिकाने रणवीरची का केली बॅटने ‘धुलाई’

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बॉलीवूडचे एक क्युट कपल आहे. दोघांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना फारच आवडते. दोघंही सोशल मीडियावर सतत  अॅक्टिव्ह असतात. नुकतंच त्या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये ते पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत.

Deepika Beating Ranveer with bat 1

दीपिकाने रणविर सिंहची धुलाई केली

आजकाल रणविर सिंह त्याच्या आगामी चित्रपट ‘83’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरू असून रणवीर सिंग या चित्रपटाबाबत फारच उत्साही आहे. रणवीरने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दीपिका रणवीर सिंगला बॅटने मारत असल्याचं दिसत आहे. बॅट लागल्यावर रणवीर देखील उड्या मारत ओरडत आहे. एवढंच नाही तर रणवीरने यावर एक कॅप्शन देखील दिलं आहे. “माझं रिल लाईफ आणि रिअल लाईफ” असं त्यानी यावर शेअर केलं आहे. सहाजिकच या मजेशीर व्हिडिओ आणि कॅप्शनमुळे रणवीर आणि दीपिका सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर या दोघांच्या चाहत्यांनी मजेशीर कंमेट द्यायलाही सुरूवात केली आहे.

रणवीर साकारणार कपिल देव यांची भूमिका

रणवीर सिंहचा आगामी चित्रपट ‘83’ हा चित्रपट भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव यांची बायोपिक आहे. रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. आश्चर्य म्हणजे या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका दीपिका साकारणार आहे. आतापर्यंत ही भूमिका नेमकं कोण साकारणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. मात्र आता दीपिका ही भूमिका करणार हे पक्कं झालं आहे. यासाठी दीपिका सध्या लंडनला या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये रणवीरने “या चित्रपटात माझ्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी दीपिकाच योग्य आहे” असं जाहीर केलं होतं. यावरून रणवीर आणि दीपिकाचं प्रेम दिसून येतं.

ADVERTISEMENT

Deepika Beating Ranveer with bat 2

83 चित्रपटाची टीम शूटिंगसाठी सज्ज

83 चित्रपट कबीर खान दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटातील 1983 सालचे दिग्गज क्रिकेटपटू साकारण्यासाठी अनेक हिंदी आणि मराठी अभिनेत्यांची टीम त्यांनी तयार केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर तर कृष्णामाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. सैयद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर तर पंकज त्रिपाठी ‘मानसिग’ यांची भूमिका साकारणार आहे.सुनिल गावस्कर यांचा रोल ताहिर भसीन साकारणार आहे. विशेष म्हणजे संदीप पाटील यांची भूमिका यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे. शिवाय कपिल देव यांची  मुलगी आमिया देव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन करणार आहे. ती पहिल्यांच या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरूवात करत आहे. या टीममध्ये चिराग पाटील आणि आदिनाथ कोठारे या दोन मराठी कलाकारांची वर्णी लागल्याने चाहते फारच खूश झाले आहेत. थोडक्यात या चित्रपटातून अनेकजण आपलं नशिब आजमावणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. 83 चित्रपट 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार असून लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.

आणखी वाचा

करिनाने मला लग्नाचे आमंत्रण… वाचा इतक्या वर्षानंतर काय म्हणाला शाहीद

विद्या बालनला समुद्राच्या लाटांसोबत खेळताना पाहून ‘या’ अभिनेत्रीला आला राग

ADVERTISEMENT

#BBM2 : बिग बॉसच्या घरात भरलीयं शाळा

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

12 Jun 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT