दीपिका पदुकोण लवकरच निर्माती मेघना गुलजारच्या एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण एका अशा मुलीची भूमिका करत आहे जिच्यावर अॅसिडने हल्ला करण्यात आला होता.
हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या पीडितेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिकासोबत उत्तम अभिनयाची जाण असलेला अभिनेता विक्रांत मेस्सीही दिसणार आहे.
छपाक च्या भूमिकेसाठी दीपिकाची खास तयारी
डिप्पीची ही भूमिका लक्ष्मी अग्रवाल नावाच्या पीडित महिलेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या तयारीसाठी लक्ष्मीशी निगडीत सर्व ऑनलाईन माहिती आणि मीडियातील बातम्यांचा अभ्यास सध्या दीपिका करत आहे. याशिवाय लक्ष्मी अग्रवालशीही दीपिका व्यक्तीगतरित्या संवाद साधत आहे. सूत्रानुसार लक्ष्मीने दीपिकासमोर अशाही काही गोष्टी ठेवल्या आहेत, ज्या अजून मीडियासमोरही आल्या नाहीत.
याशिवाय दीपिकाला निर्माती मेघना गुलजार हीने 8 ते 10 डीव्हीडीज आणि पेनड्राईव्ह दिले आहेत. ज्यामध्ये 10 अॅसिड पीडितांच्या मुलाखती आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी आपली वेदना विस्तारीतपणे मांडली आहे. या मुलाखतींमुळे दीपिकाला लक्ष्मी आणि तिच्यासारख्या अॅसिड हल्ला झालेल्या पीडितांची वेदना अजून जवळून समजता येईल.
दीपिकावर आहे दुहेरी जवाबदारी
या चित्रपटाची तयारी करतानाच दीपिकावर निर्माती असण्याची जवाबदारीही आहे. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दीपिका निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात उतरल्यावर ‘छपाक’सारखा संवेदनशील सिनेमा प्रोड्यूस करण्याचं दीपिकाचं हे पाऊल नक्कीच उल्लेखनीय आहे. त्यामुळे सध्या दीपिकाची दुहेरी कसरत सुरू आहे.
रणवीरच्या शब्दांनी दीपिका झाली भावूक
खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास दीपिका आणि रणवीर सिंग ही जोडी नुकतीच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाशच्या लग्नाच्या वेळी एकत्र दिसली होती.
या फंक्शनसाठी दीपिकाने तिचा आवडता डिझाईनर सब्यसाची मुखर्जीची सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
तर रणवीर सिंगने पारंपारिक शेरवानी घातली होती.
फोटो सौजन्य – Instagram
हेही वाचा –
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र
Forbes List: दीपिका पदूकोण भारतातील सर्वात ‘श्रीमंत’ महिला सेलिब्रेटी