योगाचे शरीरासाठी अनेक फायदे होतात. योगचे अनेक प्रकार आहेत. योगाच्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे धनुरासन (Dhanurasana). धनुरासनला इंग्रजीमध्ये बोव पोज असं म्हटलं जातं. योगासनामध्ये धनुरासन हे असं आसन आहे जे पचनशक्ती मजबूत करण्यासाठी आणि हाडांच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरते. याशिवाय तुमच्या शरीरामध्ये अधिक चांगला लवचिकपणा येतो. धनुरासान करण्याचे अनेक फायदे आहे. धनुरासन मराठी माहिती (Dhanurasana Marathi Mahiti) या लेखातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. धनुरासची माहिती (Dhanurasana Information In Marathi) असणे आणि याचा निमयित व्यायामामध्ये समाविष्ट करून घेणे तुम्हालाही फायद्याचे ठरेल. धनुरासन चे फायदे म्हणजे मधुमेह, कमरेतील दुखणे बंद होण्यासाठी, मांड्यांच्या पेशी व्यवस्थित करणे आहे. तर काही परिस्थितीत धनुरासन करू नये. त्यामुळे धनुरासनासंदर्भात योग्य आणि इत्यंभूत माहिती तुमच्यासाठी.
Table of Contents
धनुरासन म्हणजे काय – What is Dhanurasana In Marathi
धनुरासन (Dhanurasana Information In Marathi) हा शब्द मुळात संस्कृत शब्दाने तयार झाला आहे. धनु याचा अर्थ धनुष्य आणि आसन म्हणजे मुद्रा. सोप्या शब्दात धनुष्याप्रमाणे आकाराचे आसन म्हणजेच धनुरासन. धनुरासन करण्यामुळे शरीर तंदुरुस्त राहाते आणि पचनतंत्र तसंच हाडांसाठी याचा फायदा होतो. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरते. पण धनुरासन करण्यापूर्वी तुम्हाला याबाबत महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्यात.
धनुरासन करण्यापूर्वी माहीत असायला हव्यात या गोष्टी – Must Know Things About Dhanurasana Marathi
धनुरासन (Dhanurasana Information In Marathi) या आसनाचा अभ्यास अथवा सराव करण्यापूर्वी काही गोष्टी आधी जाणून घ्यायला हव्यात.
- धनुरासन करण्यापूर्वी तुम्ही तुमचे पोट रिकामे असायला हवे. नाश्ता करून अथवा काहीही खाऊन तुम्ही धनुरासन करणे योग्य नाही
- तसंच हे आसन तुम्ही शौचाला जाऊन आल्यानंतरच करावे.
- हे आसन करण्यापूर्वी साधारण 5-6 तास आधी जेवण झालेले असावे. त्यामुळे सकाळी उठल्यावरच हे आसन करणे योग्य आणि फायदेशीर ठरते. इतका वेळ हा जेवण पचविण्याचा कालावधी म्हणून योग्य ठरतो आणि तुम्हाला आसन करण्यासाठी लागणारी ऊर्जाही राखली जाते
- हे आसन करण्याची योग्य वेळ ठरते ती म्हणजे सकाळची. पण जर तुम्हाला काही कारणाने सकाळी धनुरासन करणे जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळीही हे आसन करू शकता
- धनुरासन नेहमी आरामात करा. योग करताना कधीही शरीराला अधिक खेचू नका. आपल्या शरीराच्या क्षमतेवर संपूर्ण लक्ष द्या
वाचा – योग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, अन्यथा होईल नुकसान
धनुरासन कसे करावे – How To Do Dhanurasana In Marathi
धनुरासन मराठी माहिती (Dhanurasana Information In Marathi) घेताना धनुरासन कसे करावे हेदेखील महत्त्वाचे आहे. धनुरासन करण्याची पद्धत आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देत आहोत. खरं तर धनुरासन करणे सोपे आहे पण याची योग्य पद्धत जाणून घेतली तर या आसनाचे नक्की फायदे होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आसन कधीही जमिनीवर करू नका. त्यासाठी तुम्ही चटई अथवा योगा मॅटचा (Yoga Mat) वापर करावा
- योगा मॅटवर तुम्ही पोटावर झोपा आणि पाय जवळ घ्या तसंच हातही पायाजवळ सरळ रेषेत ठेवा
- त्यानंतर हळूहळू मागच्या बाजूने पाय वरच्या बाजूला घ्या आणि हात मागे करून पाय पकडा
- श्वास आतल्या बाजूला खेचा आणि छाती वर उचला. त्यानंतर तुमच्या मांड्या आणि छातीचा भाग दोन्ही हळूहळू वर उचला. हात तुम्ही पायाच्या दिशेने खेचा
- समोरच्या बाजूला चेहरा ठेवा आणि चेहऱ्यावर हास्य टिकवून ठेवा
- आपले लक्ष तुम्ही तुमच्या श्वासावर केंद्रीत करा. शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे होईल अशा पद्धतीने तुम्ही आसन करा. हात हे धनुष्याच्या दोरीप्रमाणे काम करते
- जोपर्यंत तुमचा श्वास सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने येत आहे तोपर्यंत तुम्ही हे आसन करा आणि दीर्घ श्वास घेत राहा
- साधारण 15-20 सेकंद तुम्ही श्वास घ्या आणि सोडा
धनुरासनाचे प्रकार – Types of Dhanurasana In Marathi
धनुरासनचे काही प्रकार आहेत, ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा मिळतो. हे प्रकार तुम्हीही जाणून घ्या (Dhanurasana Information In Marathi).
द्विपद धनुरासन – या आसनामुळे तुमचे दंड, पोट आणि पायांना व्यवस्थित आकार आणि टोन मिळतो आणि याशिवाय मसल्सदेखील मजबूत होतात. हे आसन केल्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला एक व्यवस्थित आकार मिळतो आणि टोन्ड बॉडी मिळते.
पादांगुष्ठा धनुरासन – हे आसन शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळते आणि त्याशिवाय पचनशक्तीही सुधारते.
दंडायमान धनुरासन – या आसनामुळे तुमचे संतुलन राखण्यास मदत होते आणि शरीराच्या मुख्य भागाला मजबूती मिळते. याशिवाय लवचिकता आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळते. तसंच बेली फॅट (Belly Fat) अर्थात पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते.
ऊर्ध्व धनुरासन – पाठ आणि ढुंगणावरील चरबी कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर हे एक उत्तम आसन आहे. यामुळे हॅमस्ट्रिंग (Hamstring) आणि ग्लट्स (Gluts) साठी योग्य टोन मिळतो. यामुळे फुफ्फुस अधिक कार्यरत होते आणि दम्याच्या रूग्णांसाठीही हे आसन योग्य ठरते
एक पद उर्ध्व धनुरासन – यामुळे तुमच्या मणक्याची लवचिकता सुधारते. तसंच तुमच्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. हे तुमची श्वसन प्रक्रिया अधिक चांगली करण्यास फायदेशीर ठरते. तसंच या आसनामुळे तुम्हाला ऑस्टियोपोरोसिस या रोगापासूनही दूर राहता येते
धनुरासन चे फायदे – Benefits Of Dhanurasana Yoga In Marathi
धनुरासन मराठी माहिती (Dhanurasana Information In Marathi) देताना धनुरासनचे फायदे (Benefits of Dhanurasana) माहीत असायला हवे. जाणून घ्या धनुरासनचे फायदे
- नैराश्य कमी करण्यासाठी उपयुक्त – योगा केल्यामुळे माणसाची मानसिक आणि शारीरिक स्थिती विकसित होते हे आतापर्यंत अनेक शोधानुसार सिद्ध झाले आहे. काही शोधानुसार, माणूस नैराश्यातून बाहेर येण्यासाठीही धनुरासन या आसनाचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय नैराश्याचे लक्षण कमी करम्यासाठी याचा फायदा होतो. तसंच जाडेपणा कमी होऊन शरीर संतुलित राखण्यासाठी याची मदत मिळते. योगा केल्यामुळे कोर्टिसोल हार्मोन नियंत्रित करण्यास मदत मिळते. कारण कोर्टिसोल हार्मोन हे नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत करते. तुम्हाला चिंता करण्याची अथवा सतत विचार करण्याची सवय असेल तर तुम्हाला नियमित धनुरासन करायला हवे.
- पोटाच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी – अनेक योगासनांचे प्रकार आहेत, ज्याचा उपयोग शरीरामध्ये अनेक होणाऱ्या समस्या ठीक करण्यासाठी होतो. तसाच धनुरासनचा उपयोग पोटाच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी होतो. हे आसन करताना पाठ वाकवल्याने मांसपेशी खेचल्या जातात आणि हाडांमध्ये लवचिकता निर्माण होण्यास मदत मिळते. तसंच मांसपेशींमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्हाला नियमित हे धनुरासन केल्याने नक्कीच फायदा मिळतो. धनुरासनामुळे मांसपेशींना मजबूती मिळते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूरही राहाता.
- पाठ ताठ राहण्यासाठी – सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये अनेकांना पाठदुखीचा त्रास असल्याचे ऐकिवात येते. आपली बसण्याची पद्धत आणि कामाच्या वेळा यामुळे अगदी लहानपणापासूनच अनेकांना हा त्रास होतो. पाठीमध्ये त्रास अथवा कंबरदुखी अशा समस्या असतील तर त्यापासून सुटका मिळविण्यासाठी धनुरासन हे योग्य आसन आहे. काही ठिकाणच्या शोधानुसार, नियमित धनुरासन नियमित केल्यामुळे पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पण लक्षात ठेवा हे आसन तुम्ही नियमित करायला हवे.
- पायाच्या मांसपेशी होतात मजबूत – धनुरासन केल्याने मांसपेशी खेचल्या जातात आणि पाय, हाताच्या मांसपेशी खेचल्यामुळे त्यातील कसावट टिकून राहाते. वैज्ञानिक शोधानुसार, याची पुष्टी देण्यात आली नसली तरीही पायांच्या मांसपेशीच्या मजबूतीसाठी तुम्ही धनुरासनचा उपयोग करून घेऊ शकता. तुम्हाला हातापायांमध्ये मजबूती आणि शरीरात चांगली प्रतिकारशक्ती हवी असेल तर तुम्ही नियमित धनुरासन करणे अत्यंत गरजेचे आहे.
धनुरासन करताना काय घ्यावी काळजी
तुम्हाला जर मुळात काही आजार असतील तर त्यानुसार तुम्ही धनुरासन करायचे की नाही हे ठरवायला हवे. धनुरानस करताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. अन्यथा हे आसन शरीराला नुकसानदायी ठरते.
- तुमचे नुकतेच पोटाचे अथवा मानेचे ऑपरेशन झाले असेल तर तुम्ही हे आसन अजिबात करू नये
- गर्भावस्थेदरम्यान योग केला जातो. मात्र त्यामध्ये धनुरासनाचा समावेश करू नये
- तुमच्या पाठीला एखादी दुखापत झाली असेल तर अशा अवस्थेत तुम्ही धनुरासन करू नका
- ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी अजिबातच हे आसन करू नये
- तसंच हार्निया असणाऱ्या व्यक्तींना अथवा हार्नियाचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनी कधीही धनुरासन करू नये
- तुमच्या पायाला अथवा हाताच्या कोपऱ्यांना दुखापत झाली असेल तर तुम्ही काळजी घ्यायला हवी. अशा परिस्थितीत तुम्ही धनुरासन करू नये
- तुम्हाला अल्सर हा आजार असेल तर तुम्ही धनुरासन करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला याचा उलट त्रास होण्याची शक्यता असते
त्यामुळे धनुरासन करण्यापूर्वी तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि या गोष्टींची काळजी घेऊन मगच धनुरासन करा.
FAQ’s – धनुरासन माहिती मराठी
प्रश्न – धनुरासन साधारण किती वेळ करावे?
उत्तर – आपल्या क्षमतेनुसार साधारणतः 15 – 20 सेकंद तुम्ही धनुरासन करू शकता. मात्र तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
प्रश्न – धनुरासन केल्याने कोणते आजार दूर होतात?
उत्तर – तुम्हाला डोकेदुखी, पाठदुखी, मणक्याचा त्रास असेल तर असे त्रास दूर होण्यास धनुरासनचा नक्कीच उपयोग होतो. याशिवाय मधुमेह, लठ्ठपणा, अस्वस्थपणादेखील कमी होण्यास या आसनाचा उपयोग होतो.
प्रश्न – पोटात सतत जळजळ होत असेल तर धनुरासन करणे योग्य आहे का?
उत्तर – पोटात जळजळ होत असेल तर अजिबात धनुरासन करू नये. यामुळे तुमची पोटातील जळजळ अधिक वाढीला लागू शकते. त्यामुळे पोटाशी निगडीत समस्या असल्यास तुम्ही हे आसन करू नये. हे आसन पोटावर झोपून केले जाते. त्यामुळे समस्या वाढीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुम्हालाही आपले आरोग्य तंदुरुस्त राखायचे असेल अर्थात निरोगी आयुष्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तुम्हीही नियमित योगा करावा आणि धनुरासन व्यवस्थित काळजी घेऊन करावे.