ADVERTISEMENT
home / Fitness
Halasana Information In Marathi

हलासन माहिती मराठी | Halasana Information In Marathi

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. हजारो वर्षांपासून आपल्याकडे योग अस्तित्वात आहे आणि प्राचीन काळच्या लोकांच्या निरोगी आयुष्याचे रहस्य हे योग हेच होते. आधुनिक माध्यमे आणि जाहिरातींमुळे योग म्हणजे फक्त शारीरिक आसने आहेत असा आपला समज असतो. पण तसे नाही.  ध्यान, जप, मंत्र, प्रार्थना, श्वासोच्छवासाचे व्यायाम,  अनुष्ठान यांसारख्या चिंतनशील आणि स्वयं-अनुशासनात्मक पद्धती म्हणजे योग करणे होय. अर्थात आताच्या आयुष्यात आपण हे सगळे तर पाळू शकत नाही. पण निदान शारीरिक आसने , ध्यानधारणा व श्वासोच्छवासाचे व्यायाम इतके आपण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी नक्कीच करू शकतो.  “योग” हा शब्द “युज” या मूळ संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ “जोडणे” किंवा “बांधणे” असा होतो.  ज्योतिषशास्त्रीय संयोगापासून विवाहापर्यंत या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, ज्याची मूळ थीम कनेक्शन अशी आहे. योगासन म्हणजे योगाचा शारीरिक सराव आणि आसने. योग आपल्या सर्वांगीण कल्याणासाठी फायदेशीर आहे.अलीकडे पावर योगा आणि त्याचे फायदे देखील लोकांना माहित झाले आहेत.

योग आपल्याला आपल्या शरीरावर तसेच मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. आपला तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे. योगाचे अनेक फायदे आहेत. याचा नियमित सराव केल्यास अनेक शारीरिक व मानसिक आजार दूर राहण्यास मदत होते. जेव्हा आपण अनेक आसनांचा सराव करतो तेव्हा ते आपले शरीर मजबूत करते. योगामुळे आपले मन तीक्ष्ण होण्यास आणि आपली बुद्धिमत्ता सुधारण्यास मदत होते. योगाद्वारे आपण एकाग्रतेची उच्च पातळी प्राप्त करू शकतो आणि आपल्या भावनांना कसे स्थिर ठेवायचे हे देखील शिकू शकतो.  थोडक्यात योगाचे अनेक फायदे आहेत. प्रत्येकाने आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि त्याचा फायदा घेण्यासाठी त्याचा सराव केला पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे अनेक प्रकार आहेत.

हलासन माहिती मराठी | Halasana Information In Marathi
हलासन माहिती मराठी

जेव्हा माणूस आदिम अवस्थेत होता तेव्हा तो शिकार करून आपले पोट भरत असे.काही काळाने माणसाने शेती करायला सुरुवात केली. पुढे शेतीची कामे सुलभ व्हावीत म्हणून कृषी अवजारांचाही शोध लागला. या साधनांच्या शोधातील सर्वात मोठा शोध नांगराचा होता. नांगरणी केल्याने मातीत बी पेरणे सोपे जाते. भारतातील महान योगींनी नंतर नांगरापासून प्रेरणा घेऊन हलासन नावाचे आसन तयार केले. नांगरामुळे जशी कठोर जमीन मऊ होते, त्याचप्रमाणे शरीरातील लवचिकता वाढवण्यासाठी हलासन (Halasana Information In Marathi) अत्यंत उपयुक्त ठरू शकते. विशेषत: जर तुम्हाला डेस्क जॉबमुळे मणक्याच्या वेदना होत असतील तर हलासन (Halasana Yoga Information In Marathi) करणे खूप फायदेशीर आहे. या लेखात हलासन म्हणजे काय , हलासन माहिती मराठी, हलासन कसे करावे, हलासनाच्या सरावातील खबरदारी, हलासनाचे फायदे आणि हलासनाचे शास्त्र याबद्दल माहिती देणार आहे.

अधिक वाचा – सायटिकावर घरगुती उपाय आणि व्यायाम

ADVERTISEMENT

हलासन म्हणजे काय । What Is Halasana

हलासन हा शब्द ‘हल’ आणि ‘आसन’ या दोन हिंदी शब्दांपासून बनलेला आहे. हा योग करताना शरीराची मुद्रा नांगरासारखी असते. ज्याला इंग्रजीत ‘प्लो पोज’ म्हणतात. या योगाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे वजन कमी होते, शरीर मजबूत होते. यासोबतच अनेक फायदे आहेत ज्यांचे खाली तपशीलवार वर्णन केले आहे. नांगराचा उल्लेख केवळ भारतातच नाही तर तिबेट, चीन आणि इजिप्तच्या दंतकथांमध्येही आढळतो. गुप्त खजिना शोधण्यासाठी नांगराचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो. हलासन केल्याने शरीर तुमच्यासाठी तेच करू शकते. तुमच्या शरीरात अशा अनेक सुप्त शक्ती आहेत ज्याचा शरीर कधीही वापर करत नाही. हलासनाच्या सरावाने शरीराला अशा अनेक शक्तींना सक्रिय करण्याची चालना मिळते. हलासनाचा सराव सकाळी रिकाम्या पोटी केला तर उत्तम होईल. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी ते करणे शक्य नसेल, तर हलासनाचा सराव संध्याकाळी देखील केला जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा की आसन करण्यापूर्वी शौचाला जाऊन यावे आणि सरावाच्या 4-6 तास आधी जेवण केले असावे. काहीही खाल्ल्यावर लगेच हलासन कधीही करू नये. आपले शरीर लवचिक बनवण्यासाठी हलासन महत्त्वाचे आहे. यामुळे आपला पाठीचा कणा कायम तरुण, लवचिक आणि मजबूत राहतो. जर हे आसन योग्य प्रकारे केले तर आरोग्याच्या दृष्टीने ते खूप फायदेशीर ठरू शकते. या आसनाने लठ्ठपणा कमी होतो तसेच हे आसन मधुमेह, थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील  खूप फायदेशीर आहे. हलासना करणे इतके सोपे नाही. ज्यांना हे  आसन करण्यास जमत नाही त्यांनी अर्धहलासन (Ardha Halasana Information In Marathi ) करावे.

अधिक वाचा – जाणून घ्या भुजंगासन संपूर्ण माहिती मराठी

हलासन कसे करावे । How To Do Halasana

हलासन माहिती मराठी | Halasana Information In Marathi
हलासन माहिती मराठी

स्तर: सामान्य

शैली: हठयोग

ADVERTISEMENT

कालावधी: 30 ते 60 सेकंद

पुनरावृत्ती: नाही

स्ट्रेचेस: खांदे व फासळ्या 

फायदे: पाठीचा कणा व मान मजबूत होते 

ADVERTISEMENT

हलासन करण्याची योग्य पद्धत – प्रथम योगा मॅटवर पाठीवर झोपा.आपले हात शरीराच्या जवळ ठेवा. तळवे जमिनीकडे राहतील अशा पद्धतीने उघडे ठेवा. तीन ते चार वेळा दीर्घ श्वास घ्या आणि शरीर हलासनासाठी तयार करा. आता हळूहळू श्वास घेत पाय वर उचला. पाय कंबरेपासून पूर्ण वर उचला जेणे करून पाय व शरीर यांचा 90 अंशाचा कोन बनेल व पोटाच्या स्नायूंवर ताण येईल. या स्थितीत काही सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.पाय वर करताना हाताने कंबरेला आधार द्या. त्यानंतर हळूहळू पाय डोक्याच्या दिशेने वाकवा आणि डोक्याच्या मागे घेण्याचा प्रयत्न करा आणि पायांचे अंगठे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा.  कंबरेवरून हात काढून सरळ जमिनीवर ठेवा. त्यानंतर कंबर जमिनीला समांतर राहील. तुम्हाला जमेल तितका वेळ या स्थितीत रहा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास सोडताना, हळूहळू पाय जमिनीवर परत आणा. आसन सोडताना घाई करू नका. हळूहळू पाय सामान्य स्थितीत आणा आणि शवासनाच्या स्थितीत या. 

वाचा – शवासन माहिती मराठीतून | Shavasana Information in Marathi

हलासनात करता येणारे बदल आणि पर्याय ।  How To Modify Halasana

हलासन माहिती मराठी | Halasana Information In Marathi
हलासन माहिती मराठी

हलासनाचा सराव करताना खूप कमी बदल आणि पर्यायांचा अवलंब केला जाऊ शकतो. त्यापैकी काहींचे खाली वर्णन केले आहे.

  • सुरूवातीस, पोझच्या वेळी मानेला आधार देण्यासाठी खांदे आणि मानेच्या खाली ब्लँकेटचा वापर केला जाऊ शकतो आणि मज्जातंतूंना कोणतेही नुकसान न होता मानेच्या ग्रीवेला पुरेसा आधार मिळू शकतो.
  • जर पायाची बोटे जमिनीवर टेकवता  येत नसतील, तर या योगासनातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी आणि शरीराला आवश्यक असलेली सहजता देण्यासाठी पायाखाली ब्लॉक्स किंवा ब्लँकेट ठेवता येऊ शकते. 
  • हलासनामध्ये राहण्यात अडचण आल्यास, तुम्हाला आधार देण्यासाठी  भिंतीचा उपयोग केला जाऊ शकतो. भिंतीपासून हाताच्या अंतरावर डोके जमिनीवर ठेवून, तुमचे पाय वर करा आणि पायाची बोटे भिंतीच्या जवळ घेऊन मागे टेकवा. भिंतीच्या जवळ असलेल्या पायाची बोटं चांगली पकड सुनिश्चित करतील आणि म्हणूनच तुम्ही आरामशीर श्वास घेऊन पोझ जास्त काळ ठेवू शकाल.
  • भिंत वापरण्याची पर्यायी पद्धत म्हणजे, भिंतीवर पाय 90 अंशांवर उभे करून, भिंतीकडे तोंड करून, पाय मागे आणण्यासाठी भिंतीचा आधार वापरा. तुम्ही दोन्ही पाय भिंतीवर ठेऊन सुरुवात करू शकता आणि पाठ भिंतीच्या अगदी जवळ ठेवा. श्वास घ्या, पाय वर करा आणि हळू हळू पाय मागे घ्या. 
  • जर तुम्ही क्लासला जात असाल तर योग शिक्षक तुम्हाला पाठीच्या खालच्या भागाला थोडासा आधार खालचे शरीर उचलण्यास मदत करू शकतात आणि अशा प्रकारे आधाराने पाय वर करून योगासन करण्यास मदत करू शकतात.

वाचा – Padmasana Information In Marathi

ADVERTISEMENT

हलासन करताना होणाऱ्या संभाव्य चुका । Common Mistakes While Doing Halasana

तुम्ही योगासने करण्यास नुकतीच सुरुवात केली असेल तर एकदम हलासनावर उडी मारू नका. हे असं नवशिक्यांसाठी नाही. हे आसन करण्यासाठी तुम्हाला मूलभूत गोष्टींची चांगली सवय असणे आणि शरीराचे योग्य संरेखन समजून घेणे आवश्यक आहे. ते सुरक्षितपणे करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी लवचिकता देखील असणे आवश्यक आहे. कधी कधी हलासन करताना खालीलपैकी चुका होऊ शकतात. अशा वेळी पाठीवर किंवा मानेवर ताण येऊन दुखापत होऊ शकते. म्हणून हलासन अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. 

ब्लॅंकेटचा चुकीच्या पद्धतीने वापर 

हलासन करताना जर तुम्ही तुमच्या ग्रीवेच्या मणक्यावर खूप जास्त भार दिला तर तुमची मान असुरक्षित स्थितीत येऊ शकते. प्रॉप म्हणून ब्लँकेटचा वापर केल्याने मानेचे रक्षण होण्यास मदत होऊ शकते जेणेकरून वजन तुमच्या मानेऐवजी तुमच्या खांद्यावर असेल. आपण ब्लँकेट वापरत असल्यास, ते योग्यरित्या सेट केले जाणे आवश्यक आहे. ब्लॅंकेट आयताकृती आकारात घडी घातलेले असायला हवे जी तुमच्या योगा मॅट इतके रुंद असेल.

ब्लँकेट तुमच्या चटईच्या अगदी टोकाला किंवा त्याच्या मध्यभागी ठेवा. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमचे खांदे ब्लँकेटवर ठेवा आणि तुमचे डोके त्यापासून लांब ठेवा. आवश्यक असल्यास आपले डोके वर सरकेल अशा प्रकारे स्वत: ला सेट करा आणि नंतर पाय वर उचला. जर तुम्हाला ब्लँकेट वापरायचे नसेल , तर तुमचे खांदे घट्ट असल्याची खात्री करून, तुमच्या पाठीला थोडासा आधार देऊन तुम्ही ब्रिज पोजमध्ये असेच परिणाम मिळवू शकता.

हलासनाचे फायदे । Benefits Of Halasana In Marathi

हलासन माहिती मराठी | Halasana Information In Marathi
हलासन माहिती मराठी

हलासनाचा नियमित सराव केल्याने संपूर्ण शरीरात ऊर्जेचा भरपूर संचार होतो आणि पोषण होते. हलासनामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि गळा व पोटाभोवतील स्नायूंची लवचिकता वाढते. हलासनामुळे शरीरातील ताणतणाव दूर होतो. याच्या नियमित सरावाने गळा आणि मानेच्या वेदना कमी होतात. जर तुम्हाला सायनोसायटिसचा त्रास असेल किंवा श्वसनमार्गामध्ये श्लेष्मा किंवा कफ जमा होण्याची समस्या असेल तर हलासनाच्या सरावाने श्वसन प्रणाली साफ होते. सततच्या सरावाने श्वासाचा वेगही स्थिर होऊ लागतो. हलासन शरीराच्या संपूर्ण मज्जासंस्थेला बरे करते आणि शांती देते. हे ग्रंथींमधून हार्मोन्सचा स्राव नियंत्रित करण्यास मदत करते. विशेषतः थायरॉक्सिन आणि ऍड्रेनॅलीन यांसारख्या संप्रेरकांचे उत्सर्जन हलसनाने नियंत्रित करता येते. भुजंगासन, धनुरासन, हलासन ही योगासने करुन प्रतिकारशक्ती वाढवता येऊ शकते.

ADVERTISEMENT

हलासना आपल्या मूत्रमार्गातील व पचनसंस्थेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर हे आसन तुम्हाला फायदेशीर आहे. हलासनाचे इतर काही फायदे जाणून घ्या. 

  • हे आसन पचनसंस्थेच्या अवयवांना मालिश करते आणि पचन सुधारण्यास मदत करते.
  • हलासनामुळे मेटाबॉलिजम वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे सर्वोत्तम आसन आहे, कारण ते साखरेची पातळी नियंत्रित करते.
  • यामुळे मणक्याची लवचिकता वाढते आणि पाठदुखीमध्ये आराम मिळतो.
  • हलासनाचा सराव तणाव आणि थकवा हाताळण्यास देखील मदत करतो.
  • याच्या नियमित सरावाने मनाला शांती मिळते.
  • या आसनामुळे मणक्याला आणि खांद्यांच्या स्नायूंवर चांगला ताण येतो.
  • हलासनामुळे थायरॉईड ग्रंथीशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
  • हा योग केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते. यासोबतच पचनक्रियाही मजबूत होते.
  • ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हलासन हा रामबाण उपाय आहे. असे केल्याने निद्रानाश आणि तणाव दोन्ही दूर होतात. त्यामुळे रोज हलासन करावे.

अधिक वाचा – वजन कमी करण्यासाठी, करून पाहा ‘हे’ योगासने

हलासन करताना घ्यावयाची काळजी । Safety And Precautions

हलासन माहिती मराठी | Halasana Information In Marathi
हलासन माहिती मराठी
  • तुम्हाला जुलाब किंवा मानेला दुखापत झालेली असलास किंवा मानेची समस्या असल्यास या आसनाचा सराव करू नये.
  • जर तुम्ही हाय बीपी किंवा दम्याचे रुग्ण असाल तर हे आसन करू नका.हाय बीपीच्या रुग्णांनी डॉक्टरांना विचारूनच हे आसन करावे. 
  • जर तुम्ही नवशिके असाल तर योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच या आसनाचा सराव सुरू करा.
  • हे आसन करताना सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मानेवर खूप ताण जाणवू शकतो.
  • मणक्याशी संबंधित गंभीर आजार किंवा मानेमध्ये काही गंभीर आजार असल्यास हे आसन करू नये. आसन करताना लक्षात ठेवा की पाय पसरलेले असावेत आणि गुडघे सरळ असावेत.
  • हलासन करताना जबरदस्तीने कोणतीही क्रिया करू नका. हळूहळू शरीर लवचिक होईल तेव्हा पूर्ण आसन करणे सोपे जाईल. पण तोवर जबरदस्तीने कोणतीही पोझ करू नका.

योग हा निरोगी राहण्याचा सर्वात सोपा आणि अचूक मार्ग आहे. त्याचा नियमित सराव तुम्हाला निरोगी आणि आनंदी तर ठेवतोच पण तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतो.म्हणूनच नियमितपणे हलासनाचा सराव केला पाहिजे. 

Photo Credit – istockphoto

अधिक वाचा –

योगासनांचा सराव सुरू करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा
धनुरासन माहिती मराठी

ADVERTISEMENT
28 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT