सेक्स (Sex) हा दोन व्यक्तींमधील अत्यंत महत्त्वाचा आणि व्यक्तीगत भाग आहे. एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण आणि इंटरेस्ट हे दोन व्यक्ती एकमेकांशी शेअर करत असतात. पण लव्ह मेकिंग (Love Making) च्या बाबतीत जो विचार केला जातो, त्याच्या अत्यंत विरूद्ध सेक्स आहे. मात्र बऱ्याचदा अनेक जण लव्ह मेकिंग आणि सेक्स हे दोन्ही एकच असल्याचे समजतात. लव्ह मेकिंगचा संबंध हा कोणत्याही व्यक्तीच्या भावनांशी आणि मनाशी असतो. तर सेक्सचा संबंध हा शरीराच्या आनंदासाठी, यौन इच्छा आणि शारीरिक इच्छा पूर्ण करण्याशी असतो. नक्की लव्ह मेकिंग आणि सेक्समध्ये फरक काय आहे हे तुम्ही या लेखातून जाणून घ्या. तुम्ही ज्याला सेक्स समजता अथवा लव्ह मेकिंग समजता ते खरंच तसं आहे का? हे समजून घ्या.
बोलणे (Speaking with Each Other)
जेव्हा कोणतीही व्यक्ती एखाद्यावर प्रेम करते, तेव्हा ती व्यक्ती भावनात्मक बोलण्यामध्ये गुंतते. ज्यामध्ये प्रेम, अंतरंग आणि मनातील इच्छा व्यक्त करण्यात येतात. हे सर्व एका कनेक्शनपासून सुरू होते. तर सेक्स हे कधीही होऊ शकते. कोणत्याही बोलण्याशिवाय केवळ शारीरिक आवश्यकतेसाठी सेक्स करता येऊ शकते हा फरक आहे.
डोळ्यातील भाव (Eye Contact)
ज्या व्यक्ती लव्हमेकिंग करतात, त्यांना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील भाव महत्त्वाचे असतात. आय कॉन्टॅक्ट अशा व्यक्तींसाठी महत्त्वाचा असतो. डोळ्यातील प्रेम, काळजी, स्नेह इत्यादी भावना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. ही त्यांच्यासाठी मनाला भिडणारा गोष्ट असते. तर सेक्समध्ये या सगळ्याची गरज भासत नाही. कारण सेक्स करताना बरेचदा आय कॉन्टॅक्ट केला जातोच असं नाही.
दृष्टीकोन (Approach)
ज्या व्यक्ती आपल्या जोडीदारावर प्रेम करतात, त्यांच्या दृष्टीकोनातून सेक्स म्हणजे प्रेम असते. सेक्सचा आनंद अशा व्यक्ती हळुवारपणे, सौम्य आणि नाजूकपणाने घेतात. तर नुसतंच सेक्स करणाऱ्या व्यक्ती या कोरडेपणाने शरीराची गरज पूर्ण करतात. यामध्ये कोणतेही इंटिमेट होणे अथवा एकमेकांच्या भावनांचा आदर करणे अशा गोष्टी येत नाहीत.
स्पर्श (Touch)
सेक्समध्ये स्पर्श जाणवण्याची गरज असतेच असं नाही. तर लव्ह मेकिंग करताना स्पर्शच सर्वकाही असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्पर्शानेच संपूर्ण अंग हुरळून जातं. लव्हमेकिंग दरम्यान अत्यंत हळूवारपणे जोडीदार एकमेकांना स्पर्श करतात. ओठ, गाल, कपाळ, एकमेकांच्या हातात हात घालणं, अंगावरून हळूवार हात फिरवणं या स्पर्शातून आपल्या जोडीदाराचे प्रेम आणि त्याला हवंहवसे असणारे आपण हे कळून येते. त्यासाठी बोलण्याचीही गरज भासत नाही. सेक्स तर केवळ काही सेकंदाच्या फोरप्लेनेदेखील पूर्ण केला जातो. त्यामुळे Love Making आणि सेक्समध्ये खूपच फरक आहे.
मिठी (Cuddles)
ज्या व्यक्ती आपल्या जोडीदारावर प्रेम करतात, त्यांना सेक्स केल्यानंतरही आपल्या जोडीदाराने आपल्याला मिठी मारावी आणि आपल्याला आंजारावे, गोंजारावे असं वाटत असतं. सेक्सनंतरही गादीवर पडून एकमेकांना मिठी मारून राहणं हे लव्हमेकिंगमध्ये करण्यात येतं. हे एखाद्या जोडीमध्ये एकमेकांबाबत भावना निर्माण करण्यास आणि प्रेम व्यक्त करण्यसाठी महत्त्वाचे ठरते. पण जे केवळ सेक्ससाठी एकत्र असतात, त्यांना सेक्स संपल्यावर जास्त वेळ झोपणे अजिबात आवडत नाही. त्यांना त्वरीत वेगळं व्हायचं असतं.
Love Making आणि सेक्समधील अत्यंत महत्त्वाचे फरक आम्ही तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हीही तुमच्या जोडीदारासह कसे आहात अथवा तुमचा जोडीदार तुमच्यासह कसा वागतो हे यातून पडताळून पाहू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक