Advertisement

लाईफस्टाईल

वॉशिंग मशिन घेण्याआधी जाणून घ्या टॉप लोड आणि फ्रंट लोड मधील फरक

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jul 26, 2021
वॉशिंग मशिन घेण्याआधी जाणून घ्या टॉप लोड आणि फ्रंट लोड मधील फरक

घर अत्याधुनिक सुखसुविधांनी युक्त असेल तर घरात राहणं अधिक सुखकर होतं. आज माणसाने तंत्रज्ञानात खूप प्रगती केलेली आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू ऑटोमॅटिक आणि नवीन तंत्रज्ञानाची असावी असं तुम्हाला नक्कीच वाटू शकतं. कपडे धुण्याच्या मशिनमध्येही विविध प्रकार सध्या पाहायला मिळतात. त्यामुळे वॉशिंग मशिन खरेदी करण्यापूर्वी याबाबत सर्व माहिती तुम्ही जाणून घ्यायला हवी. 

ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनमुळे जगणे झाले सुसह्य –

आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सर्व गोष्टी ऑटोमॅटिक असण्यावर भर दिला जातोत. सेमी ऑटोमॅटिक पेक्षा फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनला जास्त पसंती दिली जाते. कारण या मशीनमध्ये तुम्हावा सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. तु्म्हाला फक्त तुमचे न धुतलेले कपडे आणि डिटर्जंट यात टाकावा लागते. बाकीचे सर्व् काम मशिन आपोआप करते. शिवाय तुम्हाला ड्राय झालेले कपडे मिळतात. ज्यामुळे तुमचा वेळ, कष्ट वाचतात. मात्र यामध्येही दोन प्रकारच्या मशिन बाजारात मिळतात. ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनमध्ये टॉप लोड आणि फ्रंट लोड अशा दोन प्रकारच्या मशिन मिळतात. दोन्ही मशिनमध्ये कपडे धुण्याचेच काम केले  जाते. मात्र काही  फिचर्समध्ये फरक असल्यामुळे तुमच्या गरजेनुसार या मशिनची निवड करू शकता. किचनसाठी हॉब खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

टॉप लोड वॉशिंग मशिन कोणी घ्यावी –

सेमी ऑटोमॅटिकप्रमाणे दिसत असली तरी फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशिन तुमचे कपडे अतिशय  उत्तम रित्या स्वच्छ करते. या  मशिनला फ्रंट लोडपेक्षा जागा कमी लागते. शिवाय या मशिन खाली ट्रॉली ठेवल्यास तुम्ही मशीन आहे त्या जागेवरून स्वतः हलवू शकता. ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे अशा लोकांसाठी  ही मशिन खूप उपयुक्त ठरते. फ्रंट लोड मशिनपेक्षा ती जास्त स्वस्त असते. सेमी ऑटोमॅटिकपेक्षा या मशिनला जास्त पाणी आणि विजेची गरज असते. या मशिनसाठी खास डिटर्जंट मिळतात. ते वापरल्यास मशीन जास्त दिवस टिकतात. पावसाळ्यात स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित पावसाळ्यात स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित

फ्रंट लोड वॉशिंग मशिन घरात का असावी –

फ्रंट लोड मशीनमध्ये पुढे दरवाजा असतो जो कपडे टाकल्यानंतर पूर्ण सायकल झाल्याशिवाय उघडत नाही. ही मशिन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेली असल्यामुळे या मशिनमध्ये तुम्हाला सर्वात जास्त सुविधा दिल्या जातात. ही मशिन इतर सर्व मशिनपेक्षा जड  आणि जास्त जागा व्यापणारी असल्यामुळे जर तुमचे घर प्रशस्त असेल तर ती घेणं योग्य ठरेल. शिवाय मशीनसाठी जास्त पाणी आणि वीजेची गरज लागते. ही मशिन दिसायला अतिशय सुंदर आणि सोयीच्या असते. घरासाठी वॉटर प्युरिफायर खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

घरासाठी कोणती मशिन आहे परफेक्ट –

टॉप लोड अथवा फ्रंट लोड दोन्हीपैकी कोणती वॉशिंग मशिन तुम्ही घरासाठी निवडावी हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. तुमच्या घराचा आकार, रचना, दररोज घरात धुण्यासाठी असणारे कपडे, सोसायटीमधील पाण्याचे प्रेशर, घरातील माणसे या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार वॉशिंग मशिन निवडू शकता.