ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
eye liner

आय लायनरचे आहेत वेगळे प्रकार, कोणता आहे वापरायला अधिक सोपा

आयलायनर (Eye Liner) हे महिलांसाठी नक्कीच आवश्यक असे मेकअप प्रॉडक्ट (Makeup Product) आहे. पार्टीपासून ते अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी प्रत्येक महिलेच्या सौंदर्याचा लायनर हा भाग असतोच. कारण महिलांना आपले डोळे अधिक सुंदर दिसावे असे वाटत असते. पण लायनरचेही अनेक प्रकार असतात. तुम्हाला कदाचित एकच लायनर लावायचे माहीत असेल. पण आयलायनरचेही वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यापैकी कोणता प्रकार कसा वापरायचा आणि कोणते आयलायनर वापरणे अधिक सोपे आहे ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. तुमच्यासाठी कोणते आयलायनर आहे उत्कृष्ट ते तुम्ही ठरवा. 

लिक्विड आयलायनर (Liquid Eye Liner)

लिक्विड आयलायनर सहसा आपण बाजारातून अनेक महिलांना खरेदी करताना पाहतो. बऱ्याच महिला याचा वापर करतात. आयलायनरच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, लिक्विड आयलायनर हे ओले असते त्यामुळे ते लावल्यानंतर सुकायला थोडा वेळ लागतो. ब्रशच्या सहाय्याने हे आपण डोळ्याला लावतो. हे त्या महिलांसाठी उत्कृष्ट आहे ज्या महिलांना विंग्ड आयलायनर (Winged Eyeliner) लावणे आवडते. लिक्विड आयलायनरमध्ये वॉटरप्रूफ आणि नॉन वॉटरप्रूफ असे दोन्ही प्रकार अगदी सहजरित्या मिळतात. तुम्हाला लायनर पूर्ण दिवस टिकवून ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी वॉटरप्रूफ आयलायनरचा पर्याय योग्य ठरतो.  

फेल्ट टिप लायनर (Felt Tip Liner)

फेल्ट टिप लायनर एक असे उत्पादन आहे जे एकदम मार्कर पेनाप्रमाणे असते. यामुळे आयलायनर लावताना जर हात थरथरत असतील तर तुम्हाला फायदा मिळतो. तसंच हे अन्य लायनरच्या तुलनेत लवकर सुकते. त्यामुळे तुम्ही घाईत असाल आणि आयलायनरचा वापर करायचा असेल तर तुमच्यासाठी हे उत्तम आहे. तसंच तुम्ही यामुळे अगदी व्यवस्थित आकारात डोळ्यांवर आयलायनर लाऊ शकता. तुम्ही नवशिके असाल तरीही तुम्हाला यामुळे नीट आयलायनर लावता येईल. कारण हात हलला किंवा रेष नीट आली नाही. डोळ्याला आयलायनर चिकटलं असं काहीही याच्या बाबतीत होत नाही. 

पेन्सिल आयलायनर (Pencil Eyeliner)

पेन्सिल अथवा काजळ हे बेसिक आयलायनर आहे. जे तुम्ही रोजच्या वापरामध्ये अगदी सहजपणाने वापरू शकता. हे एक असे उत्पादन आहे जे पेन्सिलसारखे दिसते आणि डोळ्यांवर वापर केल्यानंतर सहसा पसरत नाही. तसंच तुम्हाला पेन्सिलप्रमाणे टोक काढूनही याचा वापर करता येतो. ज्या महिलांना लायनर लावता येत नाही त्यांनी पेन्सिल आयलायनरचा वापर करावा. तुम्ही अगदी आताच आयलायनर लावायला सुरूवात केली असेल तर तुम्ही पेन्सिल आयलायनरचा वापर करून अधिक सुंदर दिसू शकता. यामध्ये विविध रंगही तुम्हाला बाजारात मिळतात. त्यामुळे तुम्हाला वेगळी स्टाईल करायची असेल तर तुम्ही नक्की याचा वापर करावा. 

ADVERTISEMENT

जेल लायनर (Gel Liner)

जेल लायनर हे काजळाच्या डबीप्रमाणेच असते. टोकदार ब्रशने तुम्ही हे लायनर डोळ्यांवर लाऊ शकता. लहान आणि अगदी पातळ ब्रशचा यासाठी वापर करावा लागतो. वास्तविक हे लायनर लावणं तसं सोपं आहे. ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे आणि ज्या महिलांना डोळ्यांवर जास्त घाम येते नाही आणि पसरत नाही अशा महिलांसाठी हा पर्याय उत्तम आहे. मात्र तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांना याचा वापर करू नये कारण हे पटकन पसरते. मिनिमल मेकअप लुकसाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

तुम्हाला यापैकी कोणते आयलायनर लावणे अधिक आवडेल ते तुम्ही नक्की विचारपूर्वक ठरवा. तुम्हालाही यामुळे आयलायनरचे वेगवेगळे प्रकार निवडून वापरता येतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT