वडापाव हा असा पदार्थ आहे जो कोणी खाल्ला नाही असे मुळीच होणार नाही. बटाटा वडा आणि पाव हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे वडापावचे अनेक व्हर्जन हल्ली पाहायला मिळतात. आता वडापाव हा साधासुधा राहिलेला नाही. वडापावचे हल्ली कित्येक प्रकार पाहायला मिळतात. म्हणजे मसाला वडा पाव, चीझ वडापाव, शेजवान वडापाव असे खूप प्रकार मिळतात. जर तुम्ही वडापावचे चाहते असाल तर तुम्हीही ट्राय करा वडापावचे हे प्रकार
चीझ वडापाव
चीझ हा खूप जणांचा आवडता असा प्रकार आहे. कोणत्याही पदार्थात त्यांना चीझ लागतेच. चीझ आवडणाऱ्या लोकांची हीच आवड लक्षात घेऊन खूप ठिकाणी मस्त चीझ वडापाव मिळतो. चीझ वडापाव असेंबल करताना पावामध्ये मस्त मेयोनिज आणि त्यासोबत मेल्टेट चीझ घातले जाते. त्यामुळे हा वडापाव खाताना चीझ अगदी एखाद्या पिझ्झासारखे खाली येते. जे खायला एकदम मज्जा येते. तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार त्यामध्ये पिरीपिरी मसाला घातला जातो. त्यामुळे हा वडापाव एकदम टेस्टी लागतो.
शेजवान वडापाव
हल्ली शेजवान हा प्रकार चायनिज खाद्यपदार्थामुळे चांगलाच प्रचलित झाला आहे. शेजवानचा चटपटीतपणा खूप जणांना आवडतो. त्यामुळेच वडापावमध्ये अधिक चटपटीतपणा आणण्यासाठी वडापावला शेजवान चटणीत घोळवून हा वडापाव दिला जातो. त्यामुळे हा वडापाव एकदम चटपटीत आणि मस्त लागतो. शेजवान वडापावसोबत बरेचदा थोडी जास्त शेजवान चटणी दिली जाते. त्यामुळे शेजवान वडापाव तुम्ही नक्की एकदा तरी खाऊन पाहून पाहा. तुम्हाला नक्की आवडेल.
मसाला वडापाव
ज्याप्रमाणे मसाला पाव असतो. अगदी त्याचप्रमाणे मसाला वडापाव असा प्रकार असतो. मसाला वडापाव हा प्रकारही फार चविष्ट आणि चटपटीत लागतो. मसाला वडापाव हा तवा फ्राय असा प्रकार आहे. ज्याप्रमाणे पावभाजीची भाजी करतात. अगदी त्याचप्रकारे तुम्हाला पाव त्यामध्ये घोळवून दिले जातात. मस्त गरमारम असा हा वडापाव मिळतो. मसाला पावसारखाच हा वडापाव मिळतो. जो तुम्ही एकदातरी ट्राय करायला हवा.
कडू कारल्याची भाजी अशी करा चविष्ट आणि मिळवा फायदेच फायदे
नुडल्स वडापाव
नुडल्स वडापाव हा असा प्रकार आहे जो काहीतरी नक्कीच नवीन आहे. खूप जणांना नुडल्स विशेषत: मॅगी हा प्रकार खूप आवडतो. मॅगीचा वापर करुन वडे केले जातात. त्यामध्ये तुमच्या आवडीचा सॉस घालून वडापावस सर्व्ह केला जातो. जो चवीला थोडासा हटका आणि वेगळा दिसतो. असा हटके वडापाव तुम्ही अगदी नक्कीच खायला हवा आहे.
आता तुम्हीही नक्की ट्राय करा असा मस्त नुडल्स वडापाव.
मस्त झणझणीत भरली वांगी एकदम परफेक्ट पद्धत