ADVERTISEMENT
home / मनोरंजन
हंसल मेहतांना नाही करायचे कंगनासोबत काम

या कारणासाठी मला कंगनासोबत काम करायचे नाही, दिग्दर्शकाचा खुलासा

 अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranut) बॉलिवूडमधील बेधडक असा चेहरा आहे. तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या वक्तव्यांसाठी आता जास्त प्रसिद्ध आहे. एखादी राजकीय घटना घडली की, ती त्यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सगळ्यांचे लक्ष असते. पण तिचा हा अतिरेक इतका जास्त होतो की, ती अनेकांच्या कामात हस्तक्षेप करते असे अनेकदा निदर्शनास आले आहे. अभिनेत्री, दिग्दर्शिका अशा भूमिका साकारताना ती कधी कधी कोणाचे मन दुखावून जाते तिलाही कळत नाही. तिच्या याच उद्धटपणाचा आणि सतत आपलं ते खरं करण्याचा स्वभाव एका दिग्दर्शकाला चांगलाच भोवला आहे.  एका मुलाखतीत त्याला कंगनासोबत का काम करायचे नाही? याचा त्याने खुलासा केला आहे. चला जाणून घेऊया या विषयी…

काय म्हणाला दिग्दर्शक

कंगनाला (Kangna Ranut) आतापर्यंत अनेक दिग्दर्शकांसोबत काम करायची संधी मिळाली आहे. तिने काही चित्रपटांना चांगला न्यायही मिळून दिला आहे. दिग्दर्शक हंसल मेहता ( Hansal Mehta) यांचा काही दिवसांपूर्वी ‘सिमरन’ नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट सपशेल पडला. या चित्रपट पडावा असा अजिबात नव्हता. पण कंगनाचा हस्तक्षेप हा या चित्रपटात इतका होता की, तिला चित्रपटात कसे दिसायचे आहे, काय सादर करायचे आहे तेच ती करुन घेत होती. त्यामुळे तिने चित्रपटाला आपल्याप्रमाणे फिरवले. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून मी काहीही काम करु शकलो नाही. कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करायची सगळ्यांनाच इच्छा आहे. पण मी तिच्यासोबत काम करुन चुकी केली अशी प्रतिक्रिया त्यांनी या दरम्यान दिली आहे. 

अशी होती चित्रपटाची कहानी

सिमरन हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला. कॉमेडी पटात मोडणाऱ्या या चित्रपटात चोरी दाखवण्यात आली आहे. अत्यंत गंमतीशीर अशा रुपात या चोरी दाखवण्यात आल्या आहेत. सिमरन या चित्रपटात दाखवलेल्या चोरींवर कोणालाही विश्वास बसणार नाही अशा आहेत. त्यामुळे यातील कोणत्याही पात्राशी जोडता येत नाही. हंसल मेहता सारख्या प्रसिद्ध अशा दिग्दर्शकाने अशा प्रकारे हलका- फुलका चित्रपट करताना तो इतका हलका करणे अपेक्षित नव्हते. त्यामुळेच हा चित्रपट पडला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तशी फारशी कमाई केलेली नाही.  त्यामुळे हंसल मेहतान यांना चांगलाच फटका बसला असणार यात काहीही शंका नाही.

अधिक वाचा : असा पार पडला पायल रोहतगीचा मेंदी समारंभ, या दिवशी होणार लग्न

ADVERTISEMENT

अनेकांना त्रास

कंगना रणौत (Kangna Ranut) बद्दल आलेली ही पहिली तक्रार नाही. कारण कंगना सेटवर खूपच वेगळी असते. तिच्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत तर मात्र ती खूप त्रास देते किंवा एखाद्याबद्दल बोलून ती इतका तमाशा करते की, सूड घेतल्याशिवाय ती राहात नाही. त्यामुळे कंगनाच्या तसे नादाला कोणीही लागायला बघत नाही. कंगनासोबत काम करणाऱ्या को- स्टार्सना देखील फार विचार करुन काम करावे लागते. 

आता हंसल मेहताच्या या नव्या खुलासामुळे कंगना चवताळते का? हे पाहावे लागेल.

वाय’चा विशेष शो आयोजित करून थिएटरमध्येच केला मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवले ‘मुक्ता’

07 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT