दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया ही टीव्हीवरील लोकप्रिय जोडी सर्वात जास्त चर्चेत असते. नुकतेच दोघं जण वेकेशनहून मुंबईत परत आले. दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटोजही शेअर केले. पण परत आल्यावर दुसऱ्याच दिवशी विवेकची तब्येत बिघडली. एवढी की, त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं.
पोटदुखीमुळे करावं लागलं अॅडमिट
सूत्रानुसार, मकाऊहून परत आल्यावर पुढच्याच दिवशी विवेकला ताप आला. तसंच त्याच्या पोटातही दुखू लागलं. यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं. तिथे नेल्यावर टेस्ट करण्यात आल्या. टेस्टमध्ये कळंल की, त्याच्या आतड्यांना इन्फेक्शन झालं आहे.
याबाबत दिव्यांकाला विचारलं असता तिनेसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचं मान्य केलं. दिव्यांकाने सांगितलं की, विवेक तब्येत खूपच बिघडली आहे. यामुळे दिव्यांका शूटींग आणि हॉस्पिटल अशी कसरत करत आहे. लवकरच त्यांचं कुटुंबसुद्धा मुंबईत दाखल होईल. दिव्यांकाच्या सांगण्यानुसार, विवेकला आता आधीपेक्षा बरं वाटत आहे. त्याला लवकरच हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात येणार आहे. पण डॉक्टरांनी त्याला काही दिवस बेडरेस्ट घेण्यास सांगितली आहे.
आता नाही करू शकणार ‘नच बलिए’चं होस्टींग
अशी बातमी होती की, नच बलिए च्या पहिला एपिसोड दिव्यांका आणि विवेक मिळून होस्ट करणार होते. कारण हे दोघं होते लास्ट सिझनचे विनर. पण आता विवेकची तब्येत बिघडल्याने त्याला अँकरिंग करणं शक्य नाही. तसं पाहता दोघांनीही वेकेशनवर जाण्याआधी दोघांचा परफॉर्मन्स शूट केला होता. सूत्रानुसार, आता दिव्यांका दुसऱ्या कोणा बरोबर तरी होस्ट करण्याची शक्यता आहे. विवेकची तब्येत पाहता नच बलिएचं होस्ट करणं त्याच्यासाठी कठीणच आहे.
मकाऊ वेकेशनचे सुंदर फोटोज
विवेक दहियाची तब्येत खराब होण्याआधी हे दोघंही मकाऊला वेकेशनसाठी गेले होते. तिथे त्यांनी खूप सुंदर फोटोज काढले होते. पाहा या दोघांच्या रोमँटीक मकाऊ वेकेशनचे काही फोटोज.
हेही वाचा –
‘ये है मोहबतें’ फेम विवेक दहिया झळकणार नागिन 4 च्या प्रमुख भूमिकेत