ADVERTISEMENT
home / Dry Skin
DIY: नैसर्गिक आणि होममेड स्कीन टोनर तयार करण्यासाठी सोप्या टिप्स

DIY: नैसर्गिक आणि होममेड स्कीन टोनर तयार करण्यासाठी सोप्या टिप्स

त्वचेची निगा राखण्यासाठी तुमच्या डेली स्कीन केअर रूटीनमध्ये काही गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामध्ये क्लिंझिंग आणि मॉश्चराईझिंगप्रमाणेच टोनरचाही समावेश होतो. आजकाल बाजारात विविध प्रकारचे टोनर उपलब्ध असतात. मात्र बाजारातील टोनरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असू शकते. ज्यामुळे तुमच्या त्वचेला फायदा मिळण्याऐवजी नुकसानच सहन करावे लागेल. यासाठी आम्ही तुमच्यासोबत अगदी घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये टोनर कसं तयार करावं याच्या काही टिप्स शेअर करत आहोत. ज्याचा तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. मात्र त्याआधी तुम्हाला तुमच्या त्वचेला नियमित टोन करणं किती महत्त्वाचं आहे हे माहीत असायला हवं.

त्वचेवर टोनर लावणं का आहे गरजेचं

त्वचेची स्वच्छता करण्यासाठी आपण चेहऱ्यावर क्लिझर्स, फेसवॉश, साबण याचा वापर करत असतो. अशा उत्पादनांमध्ये त्वचा स्वच्छ करण्यासाठी बऱ्याचदा केमिकल्सचा वापर केलेला असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण, तेलकटपणा तर कमी होतो. मात्र त्यामुळे त्वचेवरील आवश्यक नैसर्गिक तेलदेखील निघून जाते. सहाजिकच यामुळे त्वचेचं पीएच संतुलन बिघडण्याची शक्यता असते. मात्र त्वचा स्वच्छ केल्यावर त्वचेवर नियमित टोनरचा वापर केल्यामुळे त्वचेमधील आवश्यक मऊपणा कायम राहतो आणि त्वचेचं नुकसान टाळता येतं. यासाठी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यावर चेहरा टोन करणं अत्यंत गरजेचं असतं. 

Shutterstock

ADVERTISEMENT

नैसर्गिक टोनर तयार करण्यासाठी DIY टिप्स –

नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या टोनरचा वापर सर्व प्रकारच्या त्चचेवर करता येतो. शिवाय हे टोनर तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाणदेखील तुम्ही  कमी जास्त करू शकता. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवर कोणतेही दुष्पपरिणाम होत नाहीत. 

1. कोरफडापासून तयार करा स्कीन टोनर

साहित्य – कोरफडाचा  गर आणि पाणी

DIY स्कीन टोनर तयार करण्याची कृती –

कोरफड त्वचेसाठी वरदान आहे हे तर आपण सर्वजण जाणतोच. म्हणूनच अनेक सौंदर्योत्पादनांमध्ये कोरफडाचा वापर केला जातो. कोरफडाच्या वापरामुळे तुमच्या अनेक त्वचा समस्या कमी होऊ शकतात. म्हणूनच दोन चमचे कोरफडाच्या गरामध्ये अर्धा कप पाणी मिक्स करा. यासाठी तुम्ही थेट कोरफडाच्या सालींमधला गर देखील काढून घेऊ शकता. मग ते मिश्रण चांगले एकजीव करा. हे टोनर तुम्ही एखाद्या काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. सकाळी आणि रात्री चेहरा धुतल्यावर कॉटन पॅडवर हे मिश्रण घ्या. कॉटन पॅड चेहऱ्यावर अलगद फिरवून तु्म्ही तुमची त्वचा टोन करा.

ADVERTISEMENT

Shutterstock

2. गुलाब पाण्यापासून तयार करा स्कीन टोनर –

साहित्य –  गुलाबाच्या पाकळ्या आणि डिस्टिल्ड वॉटर

DIY स्कीन टोनर तयार करण्याची कृती –

ADVERTISEMENT

गुलाबाच्या फुलांपासून पाकळ्या वेगळ्या करा आणि कोमट पाण्यामध्ये त्या स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे या पाकळ्यांवर धुळ आणि प्रदूषण राहणार नाही. त्यानंतर एका मोठ्या भाड्यांमध्ये या पाकळ्या ठेवा आणि पाकळ्या बुडतील एवढंच डिस्टिल्ड वॉटर वरुन टाका. या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांना काही वेळ बुडवून ठेवा. नंतर ते भाडं झाकण ठेऊन मध्यम आचेवर गरम करा. 20 ते 30 मिनीटे म्हणजे पाकळ्यांचा रंग उडेपर्यंत ते मिश्रण उकळू द्या. या मिश्रणाला थंड झाल्यावर एका बंद झाकणाच्या डब्बात झाकून ठेवा. गरजेनुसार तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. गुलापबाणी कॉटन पॅडवर घ्या आणि दररोज सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी आणि मेकअप काढल्यावर चेहऱ्यावर लावा. टोनिंग केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ, माती, प्रदूषण कमी होतं. कारण गुलाबपाण्यामुळे तुमची त्वचा अगदी मुळापासून स्वच्छ होते. त्वचेची छिद्रे मोकळी झाल्यामुळे त्वचेला ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. ज्यामुळे तुम्ही फ्रेश दिसाल.

Shutterstock

3. अॅपल सायडर व्हिनेगर पासून तयार करा स्कीन टोनर –

साहित्य – अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी 

ADVERTISEMENT

DIY स्कीन टोनर तयार करण्याची कृती –

अॅपला सायडर व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घ्या. दोन्ही साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करा. तुम्ही तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार इतर इसेंशिअल ऑईलदेखील यात मिसळू शकता. मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून द्या. चेहरा धुतल्यावर थोडे मिश्रण कॉटन पॅडवर घ्या आणि चेहऱ्यावर डॅब करा. पाच मिनीटांनी चेहरा पुन्हा साध्या पाण्याने धुवा. अॅपल सायडर व्हिनेगरमुळे तुमच्या त्वचेचा पीएच संतुलित राहतो आणि त्वचा समस्या निर्माण होत नाहीत. 

अधिक वाचा –

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

ADVERTISEMENT

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

वातावरणातील बदलांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे, मग करा हे सोपे उपाय

 

02 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT