दिया और बाती फेम आरझू राठी म्हणजेच अभिनेत्री प्राची तेहलान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्राचीच्या लग्नाचे विधी सात ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. प्राची दिल्लीमधील एका बिझनेस मॅन सोबत लग्न करत असून दोन जुलैला तिचा रोका झाला आहे. उद्योगपती रोहीत सरोहा अशा तिच्या होणाऱ्या पतीचे नाव आहे. प्राची आणि रोहीतचा साखरपुडा आणि लग्न अशा पद्धतीने पार पडणार आहे.
कसा रंगणार प्राचीचा विवाहसोहळा
प्राचीन तिच्या इन्स्टाग्रामवरून या लग्नाचे माहिती दिली आहे. अर्थात कोविड 19 मुळे या लग्नासाठी काही खास लोकांनाच आमंत्रित केलं जाणार आहे. प्राचीने शेअर केलं की, दोन ऑगस्टला घरातच तिची गौरी पूजा करण्यात आली. तिला खरंतर डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं. मात्र सध्या सुरू असलेल्या कोविड 19 मुळे तिचा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडणार आहे. लग्नासाठी फक्त 50 मंडळी असणार आहेत. साखरपुडा आणि विवाह एकाच दिवशी पार पडेल. सकाळी साखरपुडा होईल तर रात्री लग्नसोहळा असेल. या सर्व विधींसाठी एक मोठे फार्म हाऊस बूक करण्यात आलेलं आहे. सोशल डिस्टेसिंगचे सर्व नियम पाळून हा विवाह पार पडणार आहे.
प्राची आणि रोहीतचं आहे लव्हमॅरेज
प्राची तेहलान आणि रोहीत सरोहा एकमेकांना गेली सात वर्षे डेट करत होते. तिने तिची लव्ह स्टोरी शेअर करत सांगितलं की, रोहीतची आणि तिची भेट तिच्या चुलत भावाच्या लग्नात झाली. तो त्या तिच्या होणाऱ्या वहिनीचा बालपणीचा मित्र होता. प्राचीला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. मात्र तेव्हा त्या दोघांना करिअरवर फोकस करायचं होतं. त्यामुळे त्यांनी आणि आता सात वर्षानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्राची आणि रोहीत नोव्हेंबरमध्येच लग्न करणार होते मात्र सध्या परिस्थिती लवकर सुधारेल असं वाटत नसल्यामुळे त्यांनी ऑगस्टमध्ये त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली. याआधी चार जुलैला तिचा आणि रोहीतचा रोका हा विधी झालेला आहे. प्राचीच्या मते ते दोघंही जाट असल्यामुळे त्याचं कल्चर एकसारखं आहे. आणि ही एक गोष्ट त्यांना इतके वर्ष एकमेकांसोबत बांधून ठेवण्यास पुरेशी आहे. तिला तिच्या होणाऱ्या पतीचे स्मितहास्य खूप आवडते. त्याचप्रमाणे तिच्या मते रोहीतचं तिच्यावर तिच्याहूनही जास्त प्रेम आहे. तिच्यासाठी तो बेस्ट जीवनसाथी आहे असंही तिला वाटतं. रोहीतच्या बाबतीत सांगताना तिच्या चेहऱ्यावर अनोखे भाव दाटून येतात. तिला रोहीतचं अॅडवेचरस आणि फन लविंग असणं खूप आवडतं. शिवाय तो एक बिझनेसमेन आहे, नऊ ते पाचची नोकरी करत नाही ही गोष्ट तिला खूप महत्वाची वाटते. तो मल्टी टॅलेंटेड आहे अशा प्रकारे तिला रोहीत का आवडतो याची लिस्ट कधीच न संपणारी आहे असं तिचं म्हणणं आहे.
प्राची लग्नानंतरही करणार फिल्मइंडस्ट्रीमध्ये काम
प्राचीने 2014 मध्ये ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून अभिनयाला सुरूवात केली. त्यानंतर ‘एक्यावन’ या मालिकेतून ती झळकली. दोन पंजाबी, एक मल्याळम आणि एका तेलूगू चित्रपटात तिने काम केलेलं आहे. लग्नानंतरही ही तिचं करिअर असंच सुरू ठेवणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
बिग बींचे मन अजूनही हॉस्पिटलमध्येच, अभिषेकच्या आठवणीने झाले व्याकूळ
बॉलीवूड कलाकार जे रिअल लाईफमध्येही आहेत ‘बेस्ट फ्रेंड’
रीनाच्या ‘इन्स्टा लाईव्ह’ चा बोलबाला… चक्क भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहलची हजेरी