मी इतकं सगळं करते पण तरीसुद्धा माझं वजन का वाढतयं? असा प्रश्न कायमच अनेकांना पडतो. तुम्ही खात असलेले पदार्थ, तुमचे लाईफस्टाईल या सगळ्यावर वजन वाढणे आणि कमी होणे अवलंबून असते. त्यातच अनेक जण वजन वाढवायचे नसेल तर काही गोष्टी खायला नको याची एक भली मोठी यादीच आपल्याला देऊन टाकतात. यामध्ये अनेकांच्या आवडीचा भात, चीझ, बटाटा आणि पाव आणि त्यापासून बनणारे पदार्थ असतात. अनेकदा वजन वाढीसाठी बेकरी फूड कारणीभूत असतात असे सांगितले जाते. बेकरीफूडमुळे तुमचे वजन वाढते की नाही? हे तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला बेकरी फूडचा नेमका तुमच्या वजनावर काय परिणाम होतो ते सांगणार आहोत.
55 मिनिटे खाण्याचा डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन आहे तरी काय?
बेकरी फूडमध्ये कशाचा असतो समावेश
आता सर्वसाधारणपणे बेकरीफूड म्हटले की त्यामध्ये पाव, ब्रेड, खारी, बिस्कीट, टोस्ट, पफ अशा काही गोष्टींचा समावेश असतो. याव्यतिरिक्तही बेकरीमध्ये काही खास पदार्थ बनवले जातात. हे सगळे पदार्थ मैद्यापासून तयार होतात आणि ते फुलवण्यासाठी त्यामध्ये सोडा, यीस्ट यासारख्या गोष्टी घातल्या जातात.
तर बेकरीफूड करतात तुमच्या आरोग्यावर परिणाम
आता आज आपण ज्या विषयाची अधिक माहिती घेणार आहोत तो म्हणजे वजन वाढीचा विषय त्याविषयी जाणून घेऊया
- बेकरी फूड हे मैद्यापासून बनते. गव्हापासून तयार झालेला मैदा पचण्यास थोडा जड असतो. मैद्याच्या सेवनामुळे पोट जड राहते आणि त्यामुळे फॅट वाढते. अर्थातच या कारणामुळे तुमचे वजन वाढते.
- आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये प्रोटीन, मिनरल्स असतील तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पण बेकरी फूड शिजवताना ते भरपूर हिटमध्ये शिजवण्यात येते त्यामुळे त्यातील पोषकतत्वे कमी होतात.त्यामुळे हे पदार्थ खाऊन तुम्हाला म्हणावा तितका फायदा होत नाही.
- हल्ली तुम्ही अनेक खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर ग्लुटेन फ्री असे वाचले असेल एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, बेक्ड आणि बेकरी फूडमध्ये ग्लुटेन असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढते आणि वजनही
- पावासारखे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला काही काळ काहीच खावेसे वाटत नाही. पण तरीही कधीकधी आपल्या जीभेचे चोचले पूर्ण होत नाही. अन्न न पचता आपण खात इतर पदार्थांचे सेवन करतो. त्यामुळेही तुमचे वजन वाढते.
- नुसताच पाव नाही तर इतरही बेकरी फूड तुमचे वजन वाढवू शकतात. उदा. पफ, बर्गर असे पदार्थ अति खाल्ले तर त्याचा त्रास होऊ शकतो.
सुकलेलं लसूण फेकण्याआधी हे वाचा.. तुम्हालाही बसेल धक्का
बेकरीफूड खा पण थोडे जपून
आता काहींना बेकरी फूड खायला फारच आवडते. म्हणजे पाव किंवा इतर पदार्थ ते आवडीने खातात. जर तुम्हाला पावावाचून जमत नसेल तर ते खाण्यास काहीच हरकत नाही. पण पाव खाताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही कोणताही ब्रेड खा. पण दोन स्लाईसवर एकाचवेळी ब्रेड खाऊ नका. पफ किंवा बर्गर असे पदार्थ तुम्हाला खायचे असतील तर ते आठवड्यातून ते एकदा किंवा दोनदा खा. वजन नियंत्रणात ठेवायचे असतील तर तुम्हाला काही गोष्टींचे भान ठेवायला हवे.
आता वरील गोष्टींवरुन तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की, बेकरी फूड हे वाईट नाही. पण तुम्ही तुमच्या खाण्यावर थोडे निर्बंध ठेवायला हवेत. म्हणजे तुमचे वजन नियंत्रणात राहील.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.