वजनाचा काटा जास्तीकडे झुकू नये असे सगळ्यांना वाटते. आपल्या उंचीनुसार आपले वजन असावे आणि कायम फिट राहावे असे कोणाला वाटणार नाही. सुडौल शरीर हे सगळ्यांनाच हवे असते. यासाठीच आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश करण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो. त्यामुळे आहारात वजन वाढणाऱ्या गोष्टी या कोणालाच नको असतात. आता उदाहरणादाखल सांगायचे झाले तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करताना काही खास फळ ही खाल्ली जात नाही. केळी हे असं बारमाही फळ आहे जे अगदी मुबलक प्रमाणात आणि खिशाला परवडणाऱ्या दरात मिळते. तसे केळी खाण्याचे फायदे बरेच आहेत पण असे म्हणतात की केळ्याच्या सेवनामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. पण तुम्हाला यामगील सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. केळ खाऊन खरंच वजन वाढते का? चला जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी केळं उत्तम
केळ्यामध्ये फॅट असते म्हणून केळ खाऊ नका असा सल्ला दिला जातो. केळी खाल्ल्यामुळे शरीरातील फॅट वाढून वजन वाढते असे म्हटले जाते. पण अभ्यासांती असे सिद्ध झाले आहे की, केळ्यामध्ये प्रोटीन, कार्बोदके आणि फॅट असतात. पण या फॅटचे रुपांतर हे उर्जेत होते त्यामुळे त्याचा शरीराला त्याचे नुकसान होत नाही. शरीराला आवश्यक असलेले फॅट मिळाल्यामुळे शरीराचे कार्य अगदी योग्यपद्धतीने होत राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी एक केळं खाल्लं तरीसुद्धा पोट भरलेले राहते. अरबटचरबट खाण्याची इच्छा त्यामुळे मुळीच होत नाही. त्यामुळे केळ्याचे सेवन अगदी हमखास तुम्ही करायलाच हवे.
हिवाळ्यात करा केळ्याचे फेशियल आणि करा कोरडेपणा दूर
वजन कमी करण्यासाठी असे करावे केळ्याचे सेवन
केळ्याचे सेवन करण्याची योग्य माहिती देखील तुम्हाला असायला हवी. केळ्याचे सेवन करण्याची वेळ आणि पद्धत माहीत हवी म्हणजे तुम्हाला केळ्याचे सेवन कसे करायचे ते कळेल.
- केळं खायला आवडत असेल तर तुम्ही नाश्त्याला केळं खायला हरकत नाही. म्हणजे उपाशी पोटी तुम्हाला केळं खायचे नाही. तुमचा रोजचा नाश्ता केल्यानंतर तुम्हाला केळं खायचं आहे. त्यामुळे तुमचं पोट जास्तीत जास्त काळासाठी भरलेले राहते. केळ्यात असलेले फॅट तुमच्या शरीराला उर्जा देण्याचे काम करते.
- जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही केळ्याचे सेवन जेवणाऐवजी रात्री देखील करु शकता. त्यासाठी तुम्हाला केळ्याची स्मुदी तयार करायची आहे. केळ आणि दूध एकत्र करुन त्याची स्मुदी केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होण्यास मदत मिळते. केळ्याची स्मुदी ही आरोग्यासाठी खूपच चांगली असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
पावसाळ्यात या भाज्यांमुळे वाढू शकतो इनफेक्शनचा धोका
यावेळी केळं खाणं टाळा
केळं खाणं हे वजन वाढीसाठी नाही तर वजन कमी करण्यासाठी असल्याचे तुम्हाला कळाले असेल पण काही खास वेळी तुम्ही केळ्याचे सेवन न करणेच चांगले असते. केळ्याचे सेवन तुम्ही खूप खाल्ले असेल त्यावेळी करु नका. रात्री झोपताना तुम्ही केळं नाही खाल्ले तर जास्त चांगले कारण त्यामुळे केळं पचत नाही. त्यामुळे केळ रात्री झोपताना किंवा शक्यतो जेवणानंतर केळं खाण्याची घाई करु नका. कारण शरीराला नको असलेल्या कॅलरीज देण्याचीही गरज नसते.
आता केळी बिनधास्त खा. पण वेळ जपून आणि मग बघा चमत्कार तुमचे वजन कमी होईल.
सतत गवती चहा प्यायल्याने होऊ शकते हे नुकसान