ADVERTISEMENT
home / आरोग्य
वजन कमी करण्यासाठी प्या कडीपत्त्याचा रस, जाणून घ्या फायदे

वजन कमी करण्यासाठी प्या कडीपत्त्याचा रस, जाणून घ्या फायदे

वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेत आहात. डाएट  आणि व्यायाम करूनही पण जर तुम्हाला हवा तसा  परिणाम मिळत नसेल तर निराश होऊ नका. कधी कधी चांगला आहार आणि व्यायामामुळेही तुमच्या वजनात जास्त परिणाम झालेला दिसून येत नाही. कारण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सावधपणे आणि नियोजनबद्ध आहार घ्यायला हवा. तुमच्या स्वयंपाक घरात  असे अनेक पदार्थ असतात ज्यामुळे तुमचे वजन काही किलोने नक्कीच कमी होऊ शकते. कडीपत्ता हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पदार्थ आहे. कडीपत्ता स्वयंपाकात वापरल्यामुळे फक्त जेवणाला स्वाद  आणि सुंगधच येतो असं नाही तर यामुळे तुमचे वजनही कमी होऊ शकते. कडीपत्त्यामध्ये ग्लुकोज संतुलित ठेवणारे, पाचन तंत्र सुधारणारे आणि इतर शारीरिक समस्या दूर करणारे घटक असतात. नियमित कडीपत्त्याचा रस पिण्यामुळे तुमच्या शरीरात जमा होणारी जास्तीची चरबी कमी होते. यासाठीच जाणून घ्या कडी पत्ता रस बनवण्याची पद्धत आणि त्याचे शरीरावर होणारे चांगले फायदे. 

कडीपत्त्याचे फायदे –

कडीपत्त्यामध्ये फायबर्स, प्रोटिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम, फॉस्फरस भरपूर असते. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे चांगली पचनशक्ती  असणे. कडीपत्ता तुमच्या पचनशक्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कडीपत्त्यामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य तर सुधारतेच शिवाय तुमची पचनशक्ती मजबूत होते. तुमचे पोट आणि आतडे स्वच्छ आणि निरोगी राहते. ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते आणि तुमचे वजन लवकर कमी होते. कडीपत्त्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या कमी होतात.

कडीपत्त्याचा ज्युस कसा बनवावा

कडीपत्त्याचा रस तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. 

साहित्य –

ADVERTISEMENT
  • एक वाटी कडिपत्त्याची पाने
  • एक ग्लास पाणी
  • एक चमचा लिंबाचा रस
  • अर्धा चमचा  मध

कडीपत्त्याचा रस बनवण्याची पद्धत –

  • कडिपत्त्याची पाने स्वच्थ धुवून ती मिक्सरमध्ये टाका.
  • मिक्सरमध्ये  पाणी टाका आणि कडिपत्त्याची पाने वाटून घ्या.
  • ग्लासामध्ये रस काढून घ्या त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा
  • कडिपत्त्याचा रस एखाद्या डिटॉक्स वॉटरप्रमाणे तुमचे वजन कमी करण्यासाठी फायद्याचा ठरेल
  • दररोज सकाळी व्यायामानंतर तुम्ही हे डिटॉक्स वॉटर  अथवा कडीपत्त्याचा रस घेऊ शकता.

कडीपत्याचा रस घेण्याचे फायदे –

जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर तुमच्या शरीरात फॅट जमा होणार नाही. ज्यामुळे तुमचे वजनही लवकर कमी होईल. कडिपत्ता रस पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. गरोदरपणी होणारा मॉर्निंग सिकनेस अथवा मळमळ कमी करण्यासाठी कडीपत्त्याचा रस फायदेशीर ठरेल. कडीपत्त्याचा रस पिण्यामुळे तुमचे शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातील कॅलरिजवर होतो आणि तुमचे वजन कमी होते. 

आम्ही शेअर केलेली कडीपत्त्याच्या रसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समधून जरूर कळवा. 

ADVERTISEMENT

फोटोसोजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

केसांची वाढ होईल दुपटीने, घरीच बनवा कडीपत्ता तेल

अशी तयार करा कढीपत्त्याची कुरकुरीत चटणी

ADVERTISEMENT

कढीपत्ता खाण्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू (Curry Leaves Benefits In Marathi)

05 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT