ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
e-commerce-shopping-increasing-this-year-for-wedding

यंदाच्या लग्नसराईत ‘ई-कॉमर्स’वर खरेदी करण्यास अनेकांचे प्राधान्य

लग्नाची खरेदी हा नेहमीच एक आनंददायक अनुभव असतो. वधू असो, तिचे कुटुंबीय असो किंवा त्यांच्याकडचे पाहुणे, प्रत्येकजण लग्नासाठीची विशेष खरेदी करण्यास उत्सुक असतो. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभिन्न स्वरुपाच्या प्रथा-परंपरा आहेत. जसं महाराष्ट्रीयन लग्नात मराठी उखाणे घेण्याची परंपरा आहे. पण सर्व संस्कृतींमध्ये लग्न समारंभात लग्नाच्या पोशाखाला एकसारखेच महत्त्व असते. सध्याच्या काळात लग्नाची खरेदी ई-कॉमर्स साईट्सवर (E-Commerce Site) करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. याचे कारण या साईट्सवर कपड्यांची, वस्तूंची बरीच व्हरायटी असते, विविध प्रकार उपलब्ध असतात, निवडीला मोठा वाव असतो. तसेच घरात बसून शॉपिंग करण्याचा सोयीस्करपणाही मिळतो. आकर्षक ऑफर व किंमती, तसेच दिवसांतील 24 तासांत कोणत्याही वेळी खरेदी करण्याची सुविधा, यांमुळे लोक ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यातही सध्या ‘मीशो’ (Meesho) या साईटवरील खरेदी अधिक वाढलेली दिसून येत आहे. 

साड्यांच्या विक्रीतही वाढ 

Online Shopping

गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत सण व लग्नसराईच्या निमित्ताने लेहेंगा चोळी, कुर्ता सेट, एथनिक गाऊन, शेरवानी आणि एथनिक जॅकेट यांसारख्या स्त्री-पुरूष या दोघांच्याही एथनिक वेअर कपड्यांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाल्याचे ‘मीशो’ या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स अॅपवर दिसून आले. या कालावधीत, मुलांसाठीच्या एथनिक पोशाखांच्या मागणीतही वाढ झाली कारण लग्नासाठी एथनिक लुक अधिक प्रमाणात केला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून याकरीता सर्वात जास्त ऑर्डर आल्या. लग्नसराईच्या काळात साड्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जुलै 2020 पासूनच साड्यांसाठीच्या ऑर्डर्समध्ये वाढ झाली. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामात गेल्या 2 वर्षांपासून विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ‘मीशो’च्या साईटवर ऑक्टोबरपासून साड्यांच्या विक्रीत तिप्पट वाढ झाली आहे.

आकर्षक पोषाखांनाही प्राधान्य 

महाराष्ट्रातील ग्राहक कॉटन सिल्क, जॉर्जेट, बनारसी सिल्क साडी आणि कॉटन यांसारख्या फॅब्रिक्समधील पार्टी वेअर, पारंपरिक, सेलिब्रिटी-इन्स्पायर्ड आणि वेडिंग वेअर साड्यांना प्राधान्य देतात. प्रिंटेड, जरीने विणलेल्या, एम्ब्रॉयडरी आणि नक्षीदार नमुन्यांच्या साड्यांचे प्रयोग करण्यासही हे ग्राहक प्राधान्य देतात. बहुरंगी, हिरवा, गुलाबी, लाल आणि काळा हे रंग या बाबतीत महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय आहेत. आकर्षक पोषाखांना पूरक म्हणून एथनिक दागिने घेण्यालाही महत्त्व असते. अशा दागिन्यांची ‘मीशो’वर होणारी खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या वस्तूंमध्ये ज्वेलरी सेट, मंगळसूत्र, नेकलेस आणि चेन यांचा समावेश आहे. आकर्षक कपडे, त्या कपड्यांना मॅचिंग असणारे दागिने, याशिवाय मेकअपचे सामान, पारंपरिक कपड्यांपासून ते आधुनिक कपड्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे आणि अगदी खिशाला परवडतील अशा किमतीसह मिळत असल्यामुळे ग्राहक अधिक याकडे वळत आहेत. याशिवाय वस्तूंचा दर्जाही तितकाच महत्त्वाच आहे आणि हा दर्जा सांभाळूनच या साईट्सवर वस्तू ग्राहकांना मिळतात. त्यामुळेही इथून खरेदी करण्याला अनेक जण प्राधान्य देतात. याशिवाय आजकाल बाहेर खरेदीला जाण्यासाठी वेळही मिळत नाही. जसे ऑनलाईन दिसते. त्याचप्रमाणे योग्य पैशात जर घरपोच गोष्टी मिळत असतील तर त्या कोणाला नको असतील. त्यामुळे हा उत्तम पर्याय आहे. 

आजच्या काळातील ग्राहक डिजिटली-जाणकार आहेत आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरक्षित साधन म्हणून ते ई-कॉमर्सकडे वळत आहेत.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT