home / अॅक्सेसरीज
Common fashion mistakes while creating an ethnic look tips in Marathi

सणासुदीला एथनिक लुक करत असाल तर या चुका मुळीच करू नका

सणसमारंभ असला अथवा एखाद्या लग्नकार्यात सहभागी व्हायचं असेल तर एथनिक लुक परफेक्ट दिसतो. मात्र एथनिक करताना तुम्ही काही गोष्टी करणं टाळलं नाही तर तुमचा लुक खराब होऊ शकतो. एथनिक लुक करताना प्रत्येकाला काही बेसिक फॅशन टिप्स माहीत असायला हव्या. कारण या छोट्या छोट्या चुका टाळल्या तरच तुम्ही स्टायलिश आणि फॅशनेबल दिसू शकता. यासोबतच दिवाळीसाठी सर्वांना द्या दिवाळी शुभेच्छा संदेश, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

एथनिक लुक करताना करू नका या चुका

लग्नकार्य अथवा सणाला साडी, लेहंगा, पंजाबी सूट असे कपडे घालून तुम्ही एथनिक लुक करू शकता. मात्र या लुकसोबत काही गोष्टी मुळीच शोभून दिसत नाहीत. यासाठी या फॅशन टिप्स जरूर लक्षात ठेवा.

Common fashion mistakes while creating an ethnic look tips in Marathi

दागिने आणि ड्रेसमध्ये संतुलन ठेवा 

काही लोकांना सणाला अथवा लग्नकार्यात भरपूर दागदागिने घालण्याची आवड असते. साडी अथवा लेहंगा घातल्यावर घरात असतील तेवढे दागिने ते घालतात. असं केल्यामुळे तुमचा ड्रेस, साडी अथवा मेकअप हायलाईट होत नाही. शिवाय यामुळे तुमचा पूर्ण लुक बिघडतो. यासाठीच एथनिक लुकवर साजेशी आणि मोजकीच ज्वैलरी कॅरी करा. साडी अथवा लेंहग्यावर जर तुम्ही मोठे कानातले घालणार असाल तर गळ्यात जास्त हेव्ही नेकलेस घालू नका. जर नेकलेस हेव्ही असेल तर फार मोठे कानातले घालू नका. ज्यामुळे तुमचा हेव्ही वर्क असलेला ड्रेस जास्त शोभून दिसेल.

फिटिंगवर लक्ष द्या 

एथनिक लुकचे कपडे घालताना ते योग्य फिटिंगचे असायला हवेत. नाहीतर तुमचा लुकच खराब दिसेल. अती ढगळ अथवा अती घट्ट कपडे घातल्यामुळे ड्रेस, लेहंगा चांगला दिसत नाही. यासाठी साडीवरचे ब्लाऊज, लेहंगा अथवा ड्रेस तुमच्या परफेक्ट फिटिंगचा असेल याची काळजी घ्या.

बॉडी टाईपनुसार अशी निवडा ब्लाऊज अथवा ड्रेसच्या हाताची लांबी

जास्त प्रयोग करू नका 

एथनिक लुकवर अनेकींना काही प्रयोग करण्याची सवय असते. जसं की मिक्समॅच कलर वापरणं, साडी अथवा एथनिक सूटवर स्कार्फ, बेल्ट अथवा कॅज्युअल एक्सेसरीज कॅरी करणं. मात्र प्रत्येकवेळी असा प्रयोग यशस्वी होईलच असं नाही. त्यामुळे कमीत कमी एथनिक लुकसोबत असे प्रयोग करत बसू नका. 

खणाच्या या ब्लाऊजचा ट्रेंड जो या फेस्टिव्ह सीझनसाठी आहे परफेक्ट

अती शिमर अथवा चमकणारे ड्रेस

एथनिक लुकहा तुमच्या प्रत्येक कार्यक्रमानुसार वेगवेगळा असू शकतो. म्हणजे एखाद्या लग्नासाठी, दिवाळी पार्टीसाठी, गेट टुगेदरसाठी अथवा सणासुदीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही एकसारखे कपडे नाही घालू शकत. प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप, सहभागी होणारे लोक, ड्रेस थीम या सर्वांचा विचार करून कपडे निवडा. जास्त चमकणारे अथवा शिमर लुकचे कपडे वापरण्यापेक्षा सिल्क, सॅटिन अथवा एम्बॉडरी असे एथनिक लुक सगळीकडे शोभून दिसतात. पण आपण कोणत्या कार्यक्रमात जात आहोत यावरून एथनिक लुक कसा असेल हे ठरतं हे लक्षात ठेवा.

परफेक्ट फेस्टिव्हल लुकसाठी अमेझॉन ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ मध्ये फॅशन आणि ब्युटीचा धमाका

22 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this