ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
Balcony Garden: कुंडीत कोथिंबीर उगवण्याची ही आहे योग्य पद्धत

Balcony Garden: कुंडीत कोथिंबीर उगवण्याची ही आहे योग्य पद्धत

ऑरगॅनिकच्या काळात हल्ली अनेकांना सगळ्याच गोष्टी ऑरगॅनिक हव्या असतात. ऑरगॅनिक भाज्या, ऑरगॅनिक फळ मिळवण्यासाठी अगदी दुप्पट किंमतीही दिल्या जातात. आता सगळीचं झाडं तुम्हाला बाल्कनीमध्ये लावता येणार नाहीत. पण काही भाज्या तुम्ही अगदी सहजच तुमच्या घरात उगवू शकता. आता कोथिंबीरच घ्या ना. आपण सगळेच जेवणात कोंथिंबीरचा वापर करतो.  तुम्ही घरीच तुमच्यापुरती कोथिंबीर अगदी सहजच उगवू शकता. पण कोथिंबीर उगवण्याचीही एक पद्धत आहे. तुम्ही घरातील धण्याचे दाणे पेरल्यानंतर त्यातून कोथिंबीर येईलच असे नाही. कारण त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात. जाणून घेऊया घरच्या घरी बाल्कनीमध्ये कशी उगवायची कोथिंबीर

घरी झाडं लावायला आवडतात, मग ही 5 झाडे आवर्जून लावा

अशी करा तयारी

तयारी महत्वाची

Instsgram

आता तुम्हाला कोणतीही भाजी घरी करायची असेल तर तुम्हाला काही पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी तुम्हाला 40%  गार्डन सॉईल (माती) 20% कोकोपीठ किंवा रेती, 40% कंपोस्ट खत हे साहित्य तुम्हाला लागेल. जर तुमच्याकडे हे साहित्य असेल तर भाजी अगदी उत्तम पद्धतीने रुजून येते. त्यामुळे तुम्ही आधी या गोष्टी घरी आणा. हल्ली कोकोपीठ,  कंपोस्ट खत या गोष्टी विकत मिळतात. त्यामुळे तुम्हाला फार टेन्शन घेण्याचे कारण नाही. 

ADVERTISEMENT

कचऱ्यापासून तयार करा असे केमिकल फ्री औषध … पळवा पाली आणि चिलटं

बियाणांची निवड

धणे निवडताना

Instagram

आता आज आपण कोथिंबीर लावणार आहोत याचाच अर्थ आज आपण धणे पेरणार आहोत. पण धण्याचे दाणेही यासाठी चांगले असणे गरजेचे असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे धण्याचे दाणे घ्या. जुणे आणि खराब झालेल्या धण्यांच्या दाण्यांमधून कोथिंबीर उगवेल असे अजिबात सांगता येत नाही. म्हणून तुम्ही बाजारातून ताजे धण्याचे दाणे आणल्यास फारच उत्तम

कचऱ्यापासून तयार करा असे केमिकल फ्री औषध … पळवा पाली आणि चिलटं

ADVERTISEMENT

आता करुया थोडी शेती

अशी करा छाटणी

Instagram

  • वर सांगितल्याप्रमाणे कुंडीमध्ये तुम्हाला माती घालायला घ्यायची आहे. 
  • वर दिलेले सगळे साहित्य एकत्र करुन घ्या. 
  • जर तुम्ही एखाद्या टबमध्ये हे दाणे पेरणार असाल तर फारच चांगले. कारण जागाही भरपूर मिळते. 
  • आता धणे तुम्हाला चांगले भरडून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हे दाणे भरडायचे नसतील तर तुम्ही रुजवण्याआधी 10 ते 15 मिनिटं छान भिजवा. 
  • भरडलेले किंवा भिजवलेले दाणे तुम्ही रुजत घाला. 
  • लगेचच खूप पाणी घालायला जाऊ नका. कारण बिया नुकत्यात रुजवल्यानंतर त्यांना मातीसोबत मिसळायला थोडा वेळ द्यायचा असतो. 
  • तुम्ही स्प्रेने पाणी शिंपडले तरी चालू शकेल .
  • आता साधारण 5  दिवसांनी तुम्हाला थोडे थोडे रोप बाहेर आलेले दिसेल. 
  • ही रोप लहान असे पर्यंत फार जपावी लागतात. कारण कोवळी रोप खाण्यासाठी चिमण्या येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्याजवळ एखादी बारीक जाळी असलेली चाळण ठेवा आणि कोथिंबीर झाकून ठेवा. 
  • एकदा कोथिंबीर मोठी झाली की मग चिमण्या फिरकत नाही. नित्यनेमाने पाणी घाला. पाण्याचा अतिरेक करु नका आणि पान खुडण्याची घाई करु नका. ती साधारण एक फूटभरवर आली की, मगच ती काढा आणि पुन्हा नव्याने कोथिंबीर पेरा.

मग आता विचार कसला करताय आजच तुमच्या बाल्कनीतील कुंडीमध्ये रुजत घाला धणे आणि मिळवा कोथिंबीर  

जाणून घ्या सेंद्रिय शेतीचे फायदे

16 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT