प्रत्येकाला कदाचित कढी आवडतेच असं नाही. पण असेही काही लोक आहेत जे वाटीवर वाटी कढी पितात. कधी कधी कढी उरते. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच कढी खायचा कंटाळा आल्याने काही जण ती कढी फेकून देतात अथवा खराब झाली असं समजतात. पण तुम्ही उरलेल्या कढीपासून काही चविष्ट अर्थात टेस्टी डिश घरच्या घरी तयार करू शकता. यातून तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्टही मिळेल आणि अन्नही वाया जाणार नाही. नक्की कोणते पदार्थ बनवता येतात ते जाणून घेऊया.
बनवा चविष्ट खांडवी
खांडवी हा नाश्ता आपण घरी बनवतो पण कढीपासूनही तुम्हाला खांडवी बनवता येते. उरलेल्या कढीपासून बनवलेल्या कढीचा स्वादही वेगळा येतो.
आवश्यक साहित्य
- उरलेली कढी
- अर्धा कप बेसन
- कढीपत्ता 7-8 पाने
- 2 हिरव्या मिरच्या
- 1 मोठा चमचा तेल
- मोहरी
- तीळ अर्धा चमचा
- अर्धा कप किसलेले खोबरे (ओल्या नारळाचे खोबरे)
- अर्धा कप कोथिंबीर
- पाव चमचा लाल मिरची पावडर
बनविण्याची पद्धत
- कढीमध्ये ब्लेंडर घालून थोडी पातळ करून घ्या आणि मग त्यात अजून बेसन मिक्स करा
- गॅसवर कढई अथवा पॅन ठेवा आणि कढी थोडी जाडसर होईपर्यंत उकळा
- दुसऱ्या गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवा आणि त्यावर तेल घाला. त्यानंतर कढी त्यावर ओता आणि चमच्याच्या मदतीने संपूर्ण तव्यावर पसरून घ्या
- शिजल्यावर याचे लहान तुकडे करून रोल करा आणि खांडवी तयार
- दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करा त्यात मोहरी, कडिपत्ता, कापलेली मिरची आणि तीळ घालून तुम्ही फोडणी तयार करा आणि खांडवीवर ती घाला
- वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर पसरा याची अप्रतिम चव लागत. चटणीसह खायला द्या
उरलेल्या पोळ्यांपासून बनवा कुरकुरीत कटलेट्स, 15 मिनिट्समध्ये चविष्ट नाश्ता
उरलेल्या कढीचा ढोकळा
घरच्या घरी पिवळा ढोकळा करण्यासाठीही तुम्ही उरलेल्या कढीचा वापर करून घेऊ शकता. हे करणं तसं सोपं आहे.
आवश्यक साहित्य
- 2 कप उरलेली कढी
- 1 कप रवा
- अर्धा चमचा बेकिंग सोडा अथवा इनो पावडर
- मोहरी
- हळद
- कढीपत्ता 7-8 पाने
- स्वादानुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
- 2 हिरव्या मिरच्या
- इडली अथवा ढोकळा स्टँड
बनविण्याची पद्धत
- कढीमध्ये ब्लेंडर घालून थोडी पातळ करून घ्या आणि मग त्यात रवा आणि चिमूटभर हळद आणि मीठ मिक्स करा
व्यवस्थित मिक्स झाल्यावर थोडा वेळ झाकून ठेवा - साधारण 15 मिनिट्स झाल्यावर यामध्ये रवा फुलून येईल. त्यानंतर त्यात इनो पावडर अथवा बेकिंग सोडा मिक्स करून व्यवस्थित बॅटर करून घ्या
- ढोकळ्याच्या स्टँडमध्ये तेल लावा आणि बॅटर स्टँडमध्ये घालून वाफ द्या
- 15 मिनिट्सनंतर काढून ढोकळा तयार आहे का तपासून घ्या. तुम्ही घरातील चाकूच्या सहाय्याने ढोकळा शिजला आहे का ते पाहू शकता.
- दुसऱ्या पॅनमध्ये तेल घाला. तेलामध्ये मोहरी, कडीपत्ता आणि मिरचीची फोडणी देऊन ढोकळ्यावर ओता आणि ढोकळा चटणीसह सर्व्ह करा
कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता
उरलेल्या कढीचे पराठे
पराठे हा उत्तम नाश्ता आहे. यामुळे पोटंही भरतं आणि चवीलाही उत्तम आहे. तुम्ही उरलेल्या कढीचे चविष्ट पराठे बनवू शकता.
आवश्यक साहित्य
- उरलेली कढी
- 2 वाटी गव्हाचे पीठ
- स्वादानुसार मीठ
- अर्धा चमचा लाल मिरची पावडर
- पाव चमचा हळद
- 1 चमचा धने पावडर
- 2 हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या)
- 2 चमचे कापलेली हिरवी कोथिंबीर
- तूप अथवा तेल अथवा बटर (तुमच्या आवडीनुसार)
बनविण्याची पद्धत
- उरलेल्या कढीमध्ये गव्हाचे पीठ आणि इतर साहित्य मिक्स करा
- याची कणीक नीट मळून घ्या
- गोलाकार करून पराठे पीळ लाऊन तयार करा
- गॅसवर तवा ठेवा आणि तेल अथवा बटरवर पराठे शेकून घ्या
- चटणी, लोणचं आणि दह्यासह पराठे खायला द्या
- उरलेल्या कढीपासून बनवलेले हे तिन्ही ब्रेकफास्ट लहान मुलांनाही नक्कीच आवडतील. त्यामुळे तुम्ही कढी फुकट न घालवता पुढच्या वेळेपासून हे पदार्थ नक्की ट्राय करा.
परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक