ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
उन्हाळ्यात छातीखाली येत असतील रॅश तर करा सोपे उपाय

उन्हाळ्यात छातीखाली येत असतील रॅश तर करा सोपे उपाय

उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो घामाचा. त्यातही घरातील गृहिणींना सतत गॅसजवळ काम करून छातीखाली येणाऱ्या रॅशचा अधिक त्रास होतो. ही समस्या कॉमन आहे. पण बरेचदा अनेकजणी याकडे दुर्लक्ष करतात. असं अजिबात करणं योग्य नाही. कारण दिवसभर ब्रा घालूनही याचा त्रास होतो. त्याशिवाय यामुळे सतत खाज येणे आणि जळजळ होणे या समस्या होतात. यामुळे चिडचिड वाढून कामंही नीट होत नाहीत. तुम्हालाही उन्हाळ्यात छातीखाली रॅश येऊन त्रास होत असेल आणि यापासून सुटका हवी असेल तर तुम्हाला काही घरगुती उपाय आम्ही सांगत आहोत. या आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हीही हे उपाय जाणून घेऊन घरच्या घरी या समस्येवर इलाज करू शकता. नक्की काय उपाय आहेत आणि त्याचा कसा वापर करायचा ते जाणून घेऊया. पण त्याआधी याची कारणे जाणून घेऊ. 

छातीखाली रॅश होण्याची कारणे

छातीखाली रॅश होण्याची कारणे

Freepik.com

तुम्हाला तुमच्या छातीच्या अर्थात स्तनांच्या खालील त्वचेमध्ये जळजळ होत असेल अथवा लाल चट्टे दिसत असतील तर हे नक्कीच रॅश आहेत. वास्तविक बऱ्याच कारणांमुळे स्तनांखाली रॅश येऊ शकतात. पण घाम अथवा उन्हाळ्याचा त्रास हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. अन्य कारणांमध्ये इन्फेक्शन, अलर्जी, ऑटोइम्यून विकार अन्य गोष्टींचा समावेश आहे. तुम्हाला आलेल्या रॅशेसचे लक्षण हे गंभीर असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांना भेट द्यायला हवी. पण जर हे रॅशेस उन्हामुळे अथवा घामामुळे आले असतील तर तुम्ही घरगुती उपयांनी यावर मात करू शकता. पाहूया काय आहेत घरगुती उपाय (home remedies for rashes under breast)

ADVERTISEMENT

नारळाचे तेल

नारळाचे तेल

Shutterstock

नारळाच्या तेलामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी आणि एनाल्जेसिक गुण असतात जे स्तनांच्या अर्थात छातीखाली होणाऱ्या रॅशेसपासून सुटाक मिळवून देण्यास मदत करतात. तसंच नारळाच्या तेलामध्ये अँटिमायक्रोबियल गुण असल्याने आलेले रॅश घालविण्यासाठी मदत मिळते. 

साहित्य 

ADVERTISEMENT

1-2 चमचे नारळाचे तेल

वापरण्याची पद्धत 

  • नारळाचं तेल आपल्या हातावर घ्या आणि रगडा. त्यानंतर रॅश आलेल्या त्वचेवर लावा 
  • सुकेपर्यंत तसंच राहू द्या 
  • दिवसातून दोन वेळा याचा वापर करा 

कोरफड

कोरफड

Shutterstock

ADVERTISEMENT

कोरफडमध्ये असणाऱ्या अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे स्तनांखाली निर्माण झालेले रॅशेस आणि त्यामुळे येणारी खाज आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

साहित्य 

आवश्यकतेनुसार कोरफड जेल 

वापरण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • कोरफडचे एक पान काढून घ्या. त्यातून ताजी जेल काढून घ्या
  • रॅश आलेल्या ठिकाणी लावा 
  • साधारण अर्धा तास तसंच सुकू द्या आणि मग स्वच्छ पाण्याने धुवा 
  • दिवसातून रोज 1-2 वेळा करा 

अॅप्पल साईड व्हिनेगर

अॅप्पल साईड व्हिनेगर

Shutterstock

अॅप्पल साईड व्हिनेगरमध्ये अँटिमायक्रोबियल गुण असतात, जे कँडिडासमवेत काही सूक्ष्म जिवांच्याविरुद्ध प्रभावी ठरतात. तुमच्या स्तनांच्या काली जर इन्फेक्शनमुळे रॅश आले असतील तर हा उपाय योग्य आहे. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 1-2 मोठे चमचे ऑर्गेनिक अॅप्पल साईड व्हिनेगर
  • अर्धा कप पाणी 
  • कापसाचे बोळे 

वापरण्याची पद्धत 

  • अर्धा कप पाण्यात एक ते दोन मोठे चमचे अॅप्पल साईड व्हिनेगर मिक्स करा 
  • योग्य मिक्स केल्यानंतर त्यात कापसाचा बोळा भिजवा 
  • हे मिश्रण तुम्ही रॅश आलेल्या ठिकाणी लावा आणि सुकू द्या 
  • काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने धुवा 
  • याचा वापर तुम्ही रोज करू शकता

त्वचेवरील मुरूमांपासून सुटकेसाठी सोपे घरगुती उपाय

हळद

हळद

Shutterstock

ADVERTISEMENT

तुमच्या स्वयंपाकघरात असणाऱ्या हळदीचा वापर करूनही तुम्ही घरगुती उपाय करू शकता. याचा प्रमुख घटक करक्युमिन आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिइन्फेमेटरी गुण असल्याने स्तनांच्या खाली असणारे रॅश काढून टाकण्यास मदत मिळते. 

साहित्य 

  • 1-2 चमचे हळद पावडर 
  • आवश्यकतेनुसार पाणी 

वापरण्याची पद्धत 

  • पाण्याचे काही थेंब दोन चमचे हळद पावडरमध्ये मिक्स करून त्याची जाड पेस्ट करून घ्या 
  • ही पेस्ट तुम्ही त्वचेवर रॅश आलेल्या ठिकाणी लावा 
  • साधारण अर्धा तास तसंच राहू द्या 
  • स्वच्छ पाण्याने नंतर साफ करा 
  • याचा वापर तुम्ही दर एक दिवसानंतर दिवसातून दोन वेळा करून घेऊ शकता. 

चेहऱ्यावरील लालिमा (रेडनेस) कमी करण्यासाठी उपाय (How To Reduce Redness On Face In Marathi)

ADVERTISEMENT

टी ट्री इसेन्शियल ऑईल

टी ट्री इसेन्शियल ऑईल

Shutterstock

टी ट्री इसेन्शियल ऑईलमध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबियल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुणांनी इन्फेक्शन निर्माण करणाऱ्या जंतूना समाप्त करण्याची क्षमता असते. तसंच सूज आणि खाज या दोन्ही समस्या कमी करण्याासाठीही याचा उपयोग होतो. 

साहित्य

ADVERTISEMENT
  • टी ट्री इसेन्शियल ऑईल 2-3 थेंब
  • नारळाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईल 2-3 चमचे 

वापरण्याची पद्धत 

  • नारळाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईल आपल्या आवडीनुसार घेऊन त्यात टी ट्री ऑईल मिक्स करा 
  • व्यवस्थित मिक्स करून समस्या असणाऱ्या त्वचेवर लावा 
  • रात्रभर तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ करा 
  • याचा वापर तुम्ही रोज एकदा करू शकता 

या सोप्या घरगुती उपयांनी तुम्ही स्तनांच्या खाली असलेले रॅशेस लवकर काढून टाकू शकता. तसंच या टिप्स अत्यंत फायद्याच्या आहेत. त्याशिवाय यांचा वापर केल्यास, तुम्हाला त्रासही होणार नाही.

पुरळ घरगुती उपाय, असे कमी करा अंगावरील रॅशेस (Home Remedies For Skin Rashes In Marathi)

स्तनांखाली रॅश होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी (Precautions to avoid rashes under breast)

  • रॅश होणारी त्वचा रोज अँटिबॅक्टेरियल साबण आणि पाण्याने स्वच्छ करा 
  • सुगंध नसणारे मॉईस्चराईजर वापरा 
  • खाजवणे टाळा
  • घाम आलेले कपडे त्वरित बदला 
  • अधिक घाम येत असेल तर ब्रा लाईनर घाला

छातीखाली अथवा स्तनांखाली होणाऱ्या रॅशेसपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही या घरगुती उपाय आणि टिप्सचा वापर करू शकता. पण उपाय केल्यानंतरही लक्षणांमध्ये कोणताही बदल न जाणवल्यास, लवकरात लवकर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT