थंडीत ओठांचा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. थंडीत ओठ फुटण्यापासून सुरुवात होते. या फुटलेल्या ओठांकडे दुर्लक्ष केले की, ओठांवरील त्वचा निघणे, त्यातून रक्त येणे, ओठांच्या कडा फाटणे, ओठांच्या आजुबाजूला पांढरे होणे असे काही त्रास होऊ लागतात. वातावरणात साधारण थंडावा जाणवू लागला की, ओठ सुकण्यापासून आपल्याला ओठांचा त्रास जाणवू लागतो या काळात ओठांची नेमकी काळजी कशी घ्यायची? लिपस्टिक लावणार असाल तर मेकअपच्या दृष्टिकोनातून ओठ कसे जपायचे ते आता आपण जाणून घेऊया. चला करुया सुरुवात. जाणून घेऊया सोपे आणि परिणामकारण उपाय
आकर्षक ओठ करणारी ‘लिप ब्लशिंग’ ट्रिटमेंट नक्की काय आहे
तूपाचा वापर
तूप हे सगळ्यात उत्तम असे मॉश्चरायझर आहे. तुम्ही दिवसातून किमान दोनवेळा तूपाचा मसाज ओठांना करा. तूपामध्ये असलेले घटक त्वचेमधील ओलावा कायम ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कितीही थंडी पडली तरी ओठ वाळत नाहीत. ते कायम ओलसर आणि नरम राहतात. तूप लावण्याची उत्तम वेळ म्हणजे रात्री झोपतानाची. रात्री झोपताना अगदी किंचितसे तूप घेऊन ते ओठांना चोळा. जर ओठ कोरडे झाले असतील, फाटले असतील, ओठांची जळजळ होत असेल तर ही जळजळ तूपाच्या वापरामुळे लगेचच थांबते. शिवाय तुमचे ओठ अधिक आकर्षक दिसतात.
मेकअपने ओठ बोल्ड आणि आकर्षक करण्यासाठी सोप्या टिप्स
लिप बाम ठेवा सोबत
तूपामुळे ओठ चांगले राहात असले तरी आपण दिवसभर तूप लावून फिरु शकत नाही. तूपाला एक विशिष्ट वास असतो. जो कदाचित घराबाहेर पडताना इतरांना यावा असे तुम्हाला अजिबात वाटणार नाही. अशावेळी लिप बाम हे चांगलेच कामाला येतात. हल्ली वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये लिप बाम मिळतात. यामध्ये लाँग लास्टिंग असा लिप बामचा पर्याय तुम्ही निवडा कारण तो फारच फायदेशीर असतो. जो तुम्हाला सतत लावावा लागत नाही
ओठांवर टाळा स्क्रबचा वापर
ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी साखरेचा स्क्रब अनेक जणांनी वापरला असेल. किंवा तुम्ही इतर कोणतेही स्क्रब ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी वापरत असाल तर थंडीच्या दिवसात ओठांवर वापरल्या जाणाऱ्या स्क्रबचा वापर टाळा. स्क्रबचे काम त्वचेवरुन मृत त्वचा काढून ती अधिक चांगली करणे असे जरी असले तरी देखील थंडीच्या दिवसात स्क्रबच्या वापरामुळे त्वचा अधिक ताणली जाते. त्यातील मॉईश्चर कमी झाले की, ओठ अधिक कोरडे होतात आणि जो त्रास आपण टाळायचा प्रयत्न करत आहोत. तोच त्रास आपल्याला स्क्रबच्या वापरामुळे अति होऊ लागतो.
गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर
ओठांना लावू नका जीभ
जळजळणारे ओठ, फाटलेले ओठ, ओठांच्या कडा इतक्या त्रासदायक असतात की, कारण नसताना अचानक आपली जीभ त्या जखमेकडे जाते. सतत लाळ लावल्यामुळेही तेथील त्वचा अधिक कोरडी होत जाते. आपण सतत काहीतरी खात असतो. असे जीभेवर अन्नपदार्थांचे कण असतात. जर ओठांना जखमा असतील आणि ते अन्नपदार्थ जखमांमध्ये जाऊन त्याची जळजळ होत राहते. त्यामुळे ओठांना तुम्ही मुळीच जीभ लावू नका.
त्यामुळे काही गोष्टी लक्षात घेत तुम्ही ओठांची काळजी घेतली तर तुम्हाला अजिबात ओठांचा त्रास होणार नाही.