ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
न आवडणाऱ्या व्यक्तीसह राहायचं असेल तर कशी करावी तडतोड, सोप्या टिप्स

न आवडणाऱ्या व्यक्तीसह राहायचं असेल तर कशी करावी तडतोड, सोप्या टिप्स

आपण राहतो तिथे आपल्याला काही माणसं जशी आवडत असतात तशी काही माणसं अजिबात आवडत नाहीत. आपण समाजात राहातो आणि त्यामुळे अशा न आवडणाऱ्या माणसांनाही काही वेळा सहन करावं लागतं. माणूस आवडणं अथवा न आवडणं हे त्याच्या स्वभाव आणि वागण्यानुसार ठरतं. काही जणांना एखाद्याचा स्वभाव आवडत नाही, काहींना व्यक्तीमत्व आवडत नाही तर काहींना एखाद्याचं वागणं आवडत नाही. या सगळ्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीबद्दल मन दूषित होतं आणि त्या न आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर कायम राहणं शक्य होत नाही. एखादी व्यक्ती बाहेरची असेल तर अशा व्यक्तीला टाळणं हा त्यावर एक उपाय असू शकतो हे नक्की. पण जर व्यक्ती घरातीलच असेल तर तसं करणं शक्य होत नाही. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने ती व्यक्ती समोर येणार आणि कधीतरी बोलावं लागणारच. अशावेळी आपल्याला स्वतःचाही राग यायला लागतो. पण मग न आवडणाऱ्या व्यक्तीसह राहायचं असेल तर नक्की कशी तडजोड करायची हे तुम्हाला या लेखातून जाणून घेता येईल. आम्ही तुम्हाला याबाबत काही टिप्स देणार आहोत, त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच सुखी राहू शकता आणि न आवडणाऱ्या व्यक्तींना टाळूही शकता.

या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत

न आवडणाऱ्या व्यक्तींना कसे करावे हँडल

न आवडणाऱ्या व्यक्तींसह आयुष्य काढणं अथवा त्यांच्यासह राहणं हे नक्कीच खूप कठीण  आहे. पण एक काळ गेला की कशाप्रकारे तडजोड करायची हे जाणून  घ्यायला हवं. कारण या व्यक्तींबरोबरच राहायचं आहे ही मानसिक तयारी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला स्वतःचं सुख हवं असेल आणि मन शांत राहायला हवं असेल तर ही तडजोड स्वतःच  करता येणं गरजेचं आहे. 

नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात प्रभावशाली, जाणून घ्या

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिले न आवडणाऱ्या व्यक्तीचा एखादा गुण आवडतो की नाही हे आठवा कारण आपल्याला व्यक्ती पटकन कळत नाही. पण एखादा गुण रागात तुम्ही कळून घेतला नसेल तर तो आठवून त्या व्यक्तीचा हा गुण लक्षात ठेवण्याचा  प्रयत्न करा. कोणताही माणूस  आदर्श नाही त्यामुळे एखादा तरी गुण समोरच्या व्यक्तीमध्ये असणार याचा विचार तुम्ही करा आणि त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा
  • समोरची व्यक्ती जशी आहे तशीच राहणार ती बदलणार नाही हे मनाला खडसावून सांगा.  त्यामुळे स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच फायदा नाही याचा पुन्हा  पुन्हा आपल्या मनाला इशारा द्या
  • अशी व्यक्ती समोर दिसल्यानंतर राग राग होणारच पण त्यापेक्षा घरातही जितकं शक्य होईल तितकं त्या व्यक्तीला टाळा 
    न आवडणाऱ्या व्यक्तीला स्वीकारा आणि त्या व्यक्तीचं एखादं कार्टून बनवा. म्हणजे तुम्हाला राग न येता हसूच येईल. कार्टून हे विचित्रच असतात हे एकदा स्वीकारलं की रागही निघून जाईल
  • न आवडणाऱ्या व्यक्तीला टाळण्यासाठी आपला एखादा आवडता छंद तुम्ही जोपासा आणि  आपल्याला जे काम  आवडतं त्यात स्वतःला गुंतवून घ्या. शक्यतो त्या व्यक्तीच्या आजूबाजूलाही फिरकू नका आणि त्यांनाही आपल्या आजूबाजूला फिरकू देऊ नका
  • कामात मन गुंतलं की न आवडणाऱ्या व्यक्तीचा विचारही मनात येणार नाही. ती व्यक्ती घरात असून सतत समोर येत असेल तर अशी एखादी जागा निवडा जिथे तुम्ही त्या व्यक्तीकडे  पाठ करून काम करू शकाल. म्हणजे तुम्हाला दोघांनाही त्रास होणार नाही.  
  • काही जणांच्या बाबतीत न आवडणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची वेळ येते आणि मग अशावेळी नैराश्य अधिक प्रमाणात येतं. पण अशावेळी तुम्ही आवडत्या व्यक्तींना त्यांच्यात पाहायचा प्रयत्न करा आणि आपलं मन गुंतवा. अशा वेळी आत्मविश्वासाने  वावरा. माणसांना हाताळायला शिकलं तर त्रास होणार नाही
  • सतत न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलून  तुम्ही त्यांची मनात अधिक जागा निर्माण करता त्यामुळे शक्यतो बोलणं टाळा आणि त्यापेक्षा आवडत्या व्यक्तींबद्दल अधिक बोला 

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT