आजकालची जीवनशैली जितकी आधुनिक तितकीच धकाधकीची झाली आहे. या धकाधकीच्या जीवनशैलीचा तुमच्या शरीर आणि मनावर नकळत परिणाम होत असतो. त्यामुळे आजकाल प्रत्येकालाच कसला ना कसला ताण सहन करावा लागतो. कामाची धावपळ, कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या, नातेसंबध अशा अनेक गोष्टींमधून हा ताण वाढत जातो. ताणामुळे जसा आरोग्य आणि मानसिक स्वास्थावर परिणाम होतो अगदी तसाच तो तुमच्या त्वचा आणि केसांवरही होत असतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा अती ताणात असता तेव्हा तुमच्या सौंदर्यावर याचे परिणाम दिसू लागतात.
मानसिक ताण कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय (Relieve Mental Pressure In Marathi)
सौदर्यावर काय होतो परिणाम
तुमचे केस आणि त्वचा हा तुमच्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतात. कारण केस आणि त्वचेमुळेच तुमचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र जेव्हा तुम्ही ताणात असता तेव्हा तुमच्या सौंदर्यावर याचा परिणाम दिसू शकतो.
अॅक्नेचे प्रमाण वाढणे
ताणतणावामुळे तुमच्या शरीरात अती प्रमाणात स्ट्रेस हॉर्मोन्स निर्माण होतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर आणि केसांमध्ये असलेला तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्वचेवर आणि केसांमध्ये अती प्रमाणात तेलाची निर्मिती झाल्यामुळे चेहरा, मान, कपाळ, छाती, केसांत पिंपल्स येतात आणि तुमचे सौंदर्य बिघडते.
त्वचेवर सुरकुत्या येतात
ताणतणावामुळे तुमच्या चेहऱ्यावर लवकर एजिंग मार्क्स दिसू लागतात. वास्तविक चेहऱ्यावर सुरकुत्या येणं हे वय झाल्याचं लक्षण आहे. मात्र वयोमानुसार होणारे बदल होण्याआधीच ताणामुळे तुम्ही वयस्कर दिसू लागता. कारण ताणामुळे तुमच्या त्वचेमधील लवचिकता कमी होते आणि त्वचा सैल पडू लागते.
डार्क सर्कल्स दिसू लागतात
कामाचा ताण तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसू लागतो. तुम्ही अती प्रमाणात काम करत असाल, थकलेले असाल अथवा एखादी चिंता काळजी तुमच्या मनात असेल तर तुमची झोप नेहमीपेक्षा कमी होते. ज्यामुळे मेंदू आणि डोळ्यांना आराम मिळत नाही. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे दिसू लागतात. वयानुसार या काळेपणामध्ये वाढ होते आणि तुमचे सौंदर्य झाकले जाते. बऱ्याचदा यामुळे तुमच्या ओठांजवळ फाईन लाईन्स अथवा गालाजवळ पिगमेटेंशन दिसू लागते.
केस लवकर पांढरे होतात
वयानुसार तुमच्या शरीरातील मॅलानिनची निर्मिती कमी झाल्यामुळे तुमचे केस पांढरे दिसू लागतात. मात्र जर वयाआधीच तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुमच्या मनात कसलातरी ताण नक्कीच आहे. तुमच्या मनातील ताणतणावामुळे शरीरात स्ट्रेट हॉर्मोन्सची निर्मिती वाढते आणि मॅलानिनची निर्मिती कमी होत जाते. केस पांढरे दिसू नयेत यासाठी वेळीच ताणतणाव नियंत्रित ठेवा.
त्वचा कोरडी पडते
वातावरणातील बदल अथवा थंडाव्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडते. पण या शिवाय जर तुमची त्वचा अती प्रमाणात कोरडी होत असेल तर त्यामागे तुमची चिंता काळजी कारणीभूत असू शकते. कारण स्ट्रेस हॉर्मोन्समुळे तुमच्या त्वचेमधील मऊपणा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडते. त्वचेचं वातावरणापासून संरक्षण होण्यासाठी त्वचा योग्य प्रमाणात हायड्रेट असायला हवी. जाणून घ्या तुम्ही तणावाखाली तर नाही ना… नैराश्य लक्षणे (Depression Symptoms In Marathi)
कसे मिळवाल ताणावर नियंत्रण
दैनंदिन जीवनात कामाची चिंता, काळजी असणं स्वाभाविक आहे. मात्र हा ताण वाढू नये यासाठी तुम्ही काळजी घ्यायला हवी.
- स्ट्रेस कमी करण्यासाठी दिवसातील काही वेळ मनोरंजनासाठी घालवा. एखाद्या गोष्टीवर मनसोक्त हसा ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल.
- अरोमा थेरपी अथवा मसाज थेरपी घेतल्यामुळे तुमच्या ताणावर नियंत्रण नक्कीच मिळेल
- दिवसभरात सतत कोमट पाणी प्या आणि झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करा.
- योगा, व्यायाम आणि मेडिटेशन ताण कमी करण्यासाठी चांगले पर्याय आहेत.
- स्किन रूटिन, फेशिअल, मसाज यासाठी पुरेसा वेळ द्या. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.
- जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवा आणि मन मोकळं करा.
- तणावातून बाहेर काढतील असे स्टेटस (Depression Status In Marathi) वाचा