ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Depression Status In Marathi

तणावातून बाहेर काढतील असे स्टेटस (Depression Status In Marathi)

 

तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. आयुष्यात असे काही प्रसंग येतात. ज्यावेळी आपण पूर्णपणे खचून जातो. मनात वाईट विचार येऊ लागतात. सगळीकडे नकारात्मकता दिसू लागते. ही नकारात्मकता संपवणे आपल्याच हातात असते. जर तुम्ही ही नकारात्मकता संपवून आपले आयुष्य पुन्हा एकदा जगण्याचा विचार करत असाल तर ही खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही तणावात आहात की नाही हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला नैराश्याची लक्षणे माहीत हवीत. जर तुम्हाला तणावाखाली असल्याचे जाणवत असेल भावनात्मक मेसेज शेअर करण्यापेक्षा तुम्ही त्या क्षणापासून चांगल्या गोष्टींचा विचार करा. तुमच्या आजबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा अधिक विचार करा. चांगले विचार मनात आणण्यासाठी तुम्ही तणावातून बाहेर काढणारे स्टेटस (Depression Status In Marathi) ठेवा. त्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर सतत सकारात्मक गोष्टी येत राहतील जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्यास मदत करतील. तुम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच आम्ही काही डिप्रेशन कोट्स (Depression Quotes In Marathi) डिप्रेशन शायरी (Depression Shayari In Marathi) आणि तणावमुक्त मेसेज (Depression Shayari In Marathi) यांचे संकलन केले आहे. 

तणावातून बाहेर काढणारे स्टेटस (Depression Status In Marathi)

Depression Status In Marathi

Depression Status In Marathi

 

आपण तणावाखाली नाही. तणावमुक्त आहोत. एखादा नकारात्मक विचार आपल्याला कोणतीही मानसिक हानी पोहोचवू शकत नाही. त्यामुळे अशावेळी काही स्टेटस तुम्ही ठेवून तणाव घालवू शकता.

  • टेन्शन आणि डिप्रेशन हे माणसाला तेव्हाच येतात जेव्हा तो स्वत:चा विचार सोडून दुसऱ्याचा अधिक करु लागतो.
  • प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण आपल्याकडेच प्रत्येक त्रासातून बाहेर पडण्याचा उपाय असतो.
  • आयुष्यात ज्या ज्यावेळी मला हरल्यासारखे वाटेल त्या त्यावेळी मी एक आशावादी चेहरा आठवेन
  • कोण म्हणतं टेन्शन जात नाही… मी ते घालवून दाखवणार 
  • केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे… तसेच तणाव घेतल्याने वाढतो, नाहीच बाळगला तर तो दूरही होतो
  • आशेचा नवा किरण बनून एखादी व्यक्ती आयुष्यात येते त्यामुळे सगळ्या तणावातून मुक्त व्हायला होते.
  • तणावाखाली येऊन काहीही करेन इतका मी साधा नाही…त्या तणावाला हरवून जिंकेन इतकी माझ्यात धमक आहे.
  • वाईट विचार मनात येताच मी मन शांत करायचा प्रयत्न करतो. कारण मला वाईटाचा विचार करायचाच नसतो
  • कधी वाटते जीवन संपवून मुक्त व्हावे तणावातून… पण आयुष्य इतकेही फुकट मिळाले नाही की ते असे वाया घालवू
  • जीव देणे सोपे आहे… मग मागे राहणाऱ्यांना त्याच्या कळा सोसाव्या लागतात… हे जाणूनच मी हा विचार सोडून दिला आहे.
  • साथ मिळाली योग्यतेची की नाही येत मनात वाईट विचार यासाठीच तर मला हवी जन्मभर तुझी साथ
  • शून्यातून विश्व निर्माण करताना येतातच अनेक अडचणी… त्या अडचणींवर मात करुनच जीवन जण्याची खरी मजा येते
  • जीव द्यायला वेळ लागत नाही… तर आयुष्य घडवायला लागतो.. त्यामुळे आयुष्य घडवण्यात आपला वेळ घालवा
  • आज नाही तर उद्या यश मिळणार आहे.. त्यासाठी टेन्शन घेण्याची काय गरज आहे
  • आयुष्य म्हणजे एक पॅकेज आहे, ज्यामध्ये सुख आणि दु:खाची साथ आहे

वाचा – ब्रेकअप स्टेटस (Breakup Status In Marathi)

ADVERTISEMENT

तणावातून बाहेर काढणारे कोट्स (Depression Quotes In Marathi)

Depression Quotes In Marathi

Depression Quotes In Marathi

 

काही चांगले विचारही तुम्हाला तणावमुक्त करण्यास मदत करतात. जर तुम्हाला तणावातून मुक्त व्हायचे असेल किंवा कोणाचा एकटेपणासाठी मेसेज करायचे असेल तर तुम्ही हे कोट्सही शेअर करु शकता.

  • आयुष्यात तीन संघर्ष हे कायम वाट्याला येतात
    जगण्यासाठीचा संघर्ष 
    ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
    ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष
  • माणसाने समोर बघायचं की मागे
    यावरचं पुष्कळसं सुख आणि दु:ख अवलंबून असतं- व.पु. काळे
  • आपण आनंदी आहोत हे केवळ दाखवण्यापेक्षा आनंदी राहा… म्हणजे आयुष्य अधिक चांगल वाटू लागतं.
  • सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे, ही कला जोपासल्यास नक्कीच फायदा होतो.
  • असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की, नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही
  • मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.. कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते
  • जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करु लागतो. त्याच वेळी सकारात्मक बदल घडू लागतात.
  • आलेल्या परिस्थितीला सामोरे न जाणे म्हणजेच खरा भीत्रेपणा
  • अंधारात कोणताही मार्ग सापडत नाही,
    त्यासाठी अंधारातून थोडे दूर प्रकाशाकडे यावे लागते
  • तणाव घालणे कोणाच्याच हातात नाही, ते फक्त आपल्याच हातात आहे
  • चिंता ही वाळवीप्रमाणे आहे जर तिच्यावर योग्यवेळी इलाज केला नाही तर ती वाढत जाते 
  • आयुष्य तुम्हाला रडवण्यासाठी हजार कारणे देईल पण तुम्ही हसण्याची लाखं कारणं आधीच शोधून ठेवा.
  • वेळ कितीही वाईट असली तरी आशा सोडू नका. त्यातून नक्कीच बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो
  • अंध:कार कितीही मोठा असला तर सूर्याचे एक किरण अंधार दूर सारू शकतो. 
  • ही  वेळ देखील निघून जाईल कारण अंधार कायम राहात नाही

वाचा – Miss You Status In Marathi For Friends

तणावातून बाहेर काढणाऱ्या शायरी (Depression Shayari In Marathi)

Depression Shayari In Marathi

Depression Shayari In Marathi

ADVERTISEMENT

 

तणावातून बाहेर काढण्यासाठी काही हलकेफुलके शब्दही तुम्ही गुंफून एखाद्याचे मन हलके करु शकता. सॉरी मेसेज पेक्षा असे केल्यामुळे अनेकदा ताण कमी होण्यास मदत मिळते.

  • पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची
    जिथून हरण्याची भीती जास्त वाटत असते
  • आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
    चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नाही.
  • गरुडासारखी गरुडझेप घ्यायची असेल,
    तर कावळ्याची संगत सोडावी लागते, मग यश तुमचेच होते
  • ज्याचा वर्तमानकाळ आशावादी आहे,
    त्याचे भविष्य हे उज्वल आहे
  • निराशावादी व्यक्ती ही प्रत्येक संधीत अडचणी शोधतो,
    तर आसावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधून त्यावर मात करतो- विन्स्टन चर्चिल
  • आयुष्य तुम्हाला रडवण्याची पुरेपूर संधी शोधेल
    पण तुम्ही आनंदी होण्याची संधी शोधा
  • जे झाले ते झाले, आता मागच्याचा विचार नाही,
    धरुन भविष्याची कास आता मागे वळून पाहणे नाही
  • हार जीत होतच राहील… पण तुम्हाला थांबायचे नाही,
    वाटेवर काटे पेरले असतील तरी तुम्हाला रडायचे नाही,
    आयुष्य हे असेच जगायचे असते, याशिवाय काही मार्ग नाही
  • आयुष्यात आधी दु:ख आले तर सुखाची गोडी ही अधिक लागते
  • सतत अपयशी होऊन जर तुम्ही सतत उठून काम करत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे
  • कामाचा ताण कधी जात नाही,
    आयुष्यात टेन्शन्स कोणाचेच संपत नाहीत.
  • जर असेल मनात विश्वास तर कशाला घाबरायचे दु:खांना
    त्यांना छेदूनच तर तुम्हाला मिळेल आनंद नवा आयुष्याचा
  • मनात येता वाईट विचार… लगेच करा कामाला सुरुवात
    कारण त्यामध्ये अधिक चांगली कामे होतात.
  • नका करु स्वत: वर अविश्वास त्यानेच तर होते
    नैराश्याची सुरुवात
  • खिशात दमडी नसतानाही मोठी स्वप्न पाहणाऱ्या व्यक्ती या आयुष्यात खूप काही मिळवून जातात.

वाचा – Life Struggle Quotes In Marathi

तणावमुक्त करणारे मेसेज (Depression Messages In Marathi)

Depression Messages In Marathi

Depression Status In Marathi

 

तणावाचा फेज हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. कोणत्याही कारणामुळे तणाव हा येऊ शकतो. दुःखी कोट्स पाहण्यापेक्षा त्या तणावातून मार्ग काढणेही आपल्याच हातात असते. जर तुम्हाला किंवा तुमच्या आजुबाजूच्या कोणाला तणावाने ग्रासले असेल तर तुम्ही त्यांना तणावमुक्त करणारे आणि आयुष्याला प्रेरणा देणारे हृदयस्पर्शी मेसेज नक्की पाठवू शकता.

ADVERTISEMENT
  • आजचा संघर्ष हा उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला आयुष्य ही बदलेल
  • विश्वास असायला हवा… आयुष्य काय कुठूनही सुरु होऊ शकतं
  • जी व्यक्ती आपल्या चुका शोधून त्यावर काम करते ती कायम जिंकते
  • आज जो त्रास तुम्ही सहन करत आहात तीच उद्या तुमची ताकद होईल- डॉ. अब्दुल कलाम आझाद
  • मेहनत इतकी करा की, जे नशीबात नाही ते देखील देव तुम्हाला देईल
  • जमिनीवर पडून जो पुन्हा उठतो तोच खरा यशस्वी होतो
  • यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक मेहनत आणि दोन अधिक मेहनत
  • संघर्ष करा फळाची अपेक्षा करु नका, यश तुमच्या पाठीमागे येत आहे.
  • कशाला घाबरता हरण्याला.. हराल तरच जिंकण्याची खरी किंमत कळते.
  • आशेचा किरण हा आपल्यातूनच निघतो. त्यामुळे त्याचा शोध घ्या 
  • शोध ही यशाची जननी आहे. त्याचा शोध घेण्यात वेळ घालवा.. तणावात नाही 
  • नाही सापडले तरी एकदा तरी मला यश मिळणार आहे.. तणावावर मी माझ्या मात आज करणार आहे
  • तुम्हाला मिळेल नेहमीच सगळ्यांची साथ फक्त कधी सोडू नका आशावाद
  • तणाव काय आहे.. आपल्यातील नकारात्मक उर्जा तिला आताच काढून टाका
  • आज मी मुक्त आहे तणावातून… त्यामुळेच मला जीवनाचे सगळे सुख दाखवणारे मार्ग खुले झाले आहे

तणावातून मु्क्त करत तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करणारे असे हे विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील.

14 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT