ADVERTISEMENT
home / आरोग्य
पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का (Benefits Of Drinking Water In Marathi)

पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का (Benefits Of Drinking Water In Marathi)

हायड्रेट राहण्यासाठी सतत थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावे हे आपण अनेकदा ऐकलेलं असतं. आपल्याकडे पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी रिमांयडर अॅपदेखील उपलब्ध असतात. पण तरिही आपण पाणी पिण्याचा कंटाळा करतो असं का ? मानवी शरीरात पाणी नेमकं कसं कार्य करतं ? पाणी पिणं का महत्वाचं आहे? आणि आपण पाणी पिणं का विसरता कामा नये? तुमच्या अशा अनेक शंकाचं निरसन करण्यासाठी आम्ही ही माहिती तुम्हाला देत आहोत. पाणी पिण्याचे हे अनेक फायदे सविस्तर जाणून घेणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल.

जाणून घ्या पाणी पिणं का महत्वाचे आहे

दररोज किती पाणी पिणे गरजेचे आहे

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती

ADVERTISEMENT

गरम पाणी पिणे फायदेशीर आहे का

पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला सतत प्रोत्साहित करतील

FAQs

7 lose weight

ADVERTISEMENT

जाणून घ्या पाणी पिणं का महत्वाचे आहे ? (Importance Of Drinking Water In Marathi)

आपल्याला लहानपणी शाळेत शिकविण्यात येतं की मानवी शरीर साठ टक्के पाण्यापासून तयार झालं आहे. या साठ टक्के पाण्यामुळेच शरीरातील महत्वाची कार्य सुरळीत चालतात. शरीराचे पोषण करणं, शरीरातील मुख्य स्त्राव योग्य प्रमाणात स्त्रवणास मदत करणं, रक्ताभिसरण करणं, पचन करणं आणि शरीराचं तापमान संतुलित ठेवणं या अशा अनेक शारीरिक क्रिया पाण्यामुळे योग्य पद्धतीने चालतात. कदाचित आता तुमच्या नक्की लक्षात येईल की…तुमची आई तुम्हाला सतत पाणी पिण्यासाठी का सांगत असते. ‘डिहायड्रेशन’ ही अशी भयंकर समस्या आहे की जी सतत निर्माण होत असेल तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात. सतत डिहायड्रेशन झाल्यास थकवा, मळमळणं, स्मृतीभ्रंश सारखे भयंकर मानसिक आजारदेखील यामुळे होऊ शकतात. या शिवाय पाणी कमी प्यायल्यास रक्तदाब कमी होणं आणि अशक्तपणादेखील येऊ शकतो.

कोमट पाण्याचे फायदे देखील वाचा

दररोज किती पाणी पिणे गरजेचे आहे? (How Much Water Should You Drink Every day?)

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते तहान लागली नाही तरी दिवसभरात सतत पाणी पिणं फार गरजेचं आहे. पण काही जण सांगतात की दररोज कमीतकमी दोन लीटर तरी पाणी प्यावं. तुम्हाला किती प्रमाणात घाम येतो आणि तुमची शारीरिक क्षमता किती आहे यावर सारं काही अवलंबून असू शकतं.  जर तुम्ही खेळाडू असाल अथवा तुम्ही उष्ण प्रदेशात राहत असाल तर मात्र तुम्हाला यापेक्षा अधिक पाणी पिण्याची गरज असू शकते.

Also Read About पाणी वाचवण्यासाठी टिप्स

ADVERTISEMENT

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? (Best Time To Drink Water)

‘नॅशनल अकेडमी ऑफ सायन्स’कडून करण्यात आलेल्या एका संशोधनात या संस्थेचे सहलेखक मायकल फेरेल यांना असं आढळून आले आहे की, तहान नसतानादेखील जाणिवपूर्वक पाणी पिण्याने तुमच्या मेंदूला तहान कधी लागते हे समजत नाही. खरंतर तुमच्या शरीराला पाणी पिण्याची कधी गरज आहे हे नक्कीच माहित असतं. यासाठीच पाणी पिणं तेव्हाच योग्य ठरतं जेव्हा तुम्हाला खरंच तहान लागलेली असते किंवा तुम्ही डिहायड्रेट झाले असता.

असं असलं तरी, जपानी लोकांचा असा विश्वास आहे की, निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर लगेचच चार ग्लास पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुमची त्वचा नितळ व निरोगी राहते. जपानी लोक हा नियम पाळतात याचं आणि एक कारण म्हणजे यामुळे तुमच्या मेटाबॉलिजमचा स्तर नियमित राहतो व तुमचे वजन कमी होते. पण याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्ही पाणी प्यायल्यानंतर पंचेचाळीस मिनीटं काहीही खात नाही.

शक्य असेल तर या दोन्ही नियमांचे पालन करण्यास काहीच हरकत नाही. यासाठी सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या. ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होणार नाही. शिवाय दिवसभरातदेखील जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा सतत पाणी प्या. ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट तर होणार नाहीच शिवाय तुमच्या त्वचेचा पोत देखील सुधारेल व शरीराचे कार्य उत्तम चालेल.

गरम पाणी पिणे फायदेशीर आहे का? (Benefits of Drinking Hot Water)

अनेक लोक असा सल्ला देतात की, सकाळी उठल्यावर अनोशी पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्या. पण गरम पाणी पिण्याने नेमका काय फायदा होतो?  हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला गरम पिण्याचे काही चांगले फायदे सविस्तरपणे सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

नाक मोकळे होते (Relieves Congestion)

The Magic Drink - All You Need To Know About Green Tea   Its Benefits 7

एक कप गरम पाणी प्यायल्यास नाकपुड्या मोकळ्या होतात. गरम पाण्याने तुमचा घसा देखील साफ होतो. आणि तुम्हाला त्वरीत आराम मिळू शकतो. जर तुम्हाला सर्दी झाली असेल अथवा घसा दुखत असेल तर डॉक्टर तुम्हाला गरम पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला देतात. तुम्ही यासाठी लिंबू व आलं टाकलेला वाफाळता चहा देखील घेऊ शकता.

पचनक्रिया सुधारते (Helps In Digestion)

जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर गरम पाणी घेतल्याने तुमची समस्या कमी होऊ शकते. पोट बिघडलं असेल तर रिकाम्या पोटी गरम पाणी प्या. गरम पाण्यामुळे पचन जलद  होतं आणि शरीरातील टॉक्सिन्सदेखील बाहेर टाकले जातात. जर तुम्हाला पोटाच्या समस्या सतत होत असतील तर त्यासाठी रिकाम्यापोटी गरम पाणी जरुर प्या.

बद्धकोष्टता कमी होते (Relieves Constipation)

आतड्यांमध्ये अन्न अडकून पडल्याने अपचन होऊन बद्धकोष्टतेचा त्रास होतो. गरमपाणी पिण्याने आतड्यांमध्ये अडकलेलं अन्न मार्गाला लागून बद्धकोष्टता कमी होते. थोडक्यात यामुळे तुमचं पोट साफ होतं. जर तुम्हाला सतत बद्धकोष्टतेचा त्रास वारंवार होत असेल तर गरम पाणी तुमच्यासाठी अगदी अमृताप्रमाणे आहे. गरम पाण्यात तुम्ही थोडंसं लिंबू किंवा ग्रीन-टीदेखील टाकू शकता.

ADVERTISEMENT

निवांत राहण्यास मदत होते (Helps Calm You Down)

05 benefits of drinking water-zeldaya drinking water

मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यास अथवा मन शांत करण्यासाठी गरम पाणी फार महत्वाचं आहे. जर तुमचा आठवडा धकाधकीचा असेल अथवा तुम्हाला थकवा जाणवत असेल तर एक कप गरम पाणी प्या. ज्यामुळे तुमचं मन शांत होईल व तुम्हाला निवांत वाटेल. कॅमोमाईल चहादेखील यासाठी उत्तम ठरेल कारण त्यामुळे तुम्हाला पाणी व चहा असे दुहेरी फायदे मिळतील.

वाचा: वाईट श्वास लावतात कसे

थंड पाणी कधी प्याल? 

थंड पाणी पिण्याचे गरम पाण्याऐवढे चांगले फायदे नक्कीच नाहीत. पण थंड पाणी पिण्याचे काही फायदे जरुर असतात. जसं की वर्क आऊट केल्यावर थंड पाणी पिणं नेहमीच फायदेशीर असतं. विशेषतः जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी वर्क आऊट करता त्यावेळी तुमच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढलेलं असते. थंड पाणी घेतल्याने तुमच्या शरीराचे तापमान संतुलित राहते.

ADVERTISEMENT

थंड पाणी पिण्याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होत नाही. जर तुम्ही उष्ण प्रदेशात राहत असाल तर शरीर हायड्रेट राहण्यासाठी सतत थंड पाणी प्या ज्यामुळे तुमचे शरीराचे तापमान संतुलित राहील.

गरम असू दे अथवा थंड ‘पाणी’ शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नेहमीच महत्वाचे आहे.

पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला सतत प्रोत्साहित करतील (Benefits Of Drinking Water In Marathi)

water image

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात (Flushes Out Toxins)

शरीर शुद्ध करण्यासाठी बऱ्याचदा तुम्ही ग्रीन-टी अथवा एखाद्या फॅन्सी प्रॉडक्टचा आधार घेता. पण तुम्हाला माहित आहे का? मुबलक प्रमाणात पाणी पिणं हा देखील शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमच्या किडनीचे कार्य सुरळीत चालते. भरपूर प्रमाणात पाणी पिण्याने तुमचं रक्त आणि युरीन शुद्ध होते. म्हणूनच पाणी हे जीवन आहे असं म्हणतात.

ADVERTISEMENT

पाण्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते (Makes Your Skin Healthy)

डिहायड्रेशन झाल्यास तुमची त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते. निरोगी त्वचेसाठी स्वतःला डायड्रेट ठेवा. डिडायड्रेशनचा थेट प्रभाव तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीराला देखील भोगावे लागतात. एका संशोधनानूसार, तुमच्या शरीराला पुरेसा पाण्याचा पुरवठा झाल्यावरच तुमच्या त्वचेसाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा त्वचेला केला जातो. यासाठी जर तुम्हाला नितळ व चमकदार त्वचा हवी असेल तर पुरेसं पाणी प्या.

तुमची पचनसंस्था सुधारते (Helps Your Digestive System)

पाण्यामुळे तुमच्या शरीरातील पाचकरस सौम्य होतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी गरम पाणी पिणं नक्कीच फायदेशीर आहे. दररोज जेवल्यानंतर गरम पाणी प्या. गरम पाण्याने मलविसर्जन चांगलं होतं आणि बद्धकोष्टतादेखील होत नाही.

रोगप्रतिकारशक्ती सुधारते (Boosts Your Immunity System)

शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी मानवी शरीराला साठ टक्के पाणी गरज असते. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया उत्तम चालतात. पाण्यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. तुमची  रोगप्रतिकार शक्ती सुधारते

डोकेदुखीपासून मुक्ती मिळते (Prevents Headaches)

डिहायड्रेशमुळे बऱ्याचदा मायग्रेनचा त्रास सुरू होतो. जर तुम्हाला  देखील मायग्रेनचा त्रास असेल तर सतत पाणी प्या. ज्यांना सतत डोकेदुखी होत असेल तर अशा लोकांनी देखील नियमित पाणी पिण्याची सवय स्वतःला लावायला हवी.

ADVERTISEMENT

पायामध्ये क्रॅम्प येत नाहीत (Prevents Leg Cramps)

झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास तुमच्या पायांमध्ये गोळे येत नाहीत. पायामध्ये गोळे अथवा क्रॅम्प येण्याचे प्रमुख कारण डिहायड्रेशन असू शकते. यासाठी मद्यपान, कॉफी घेणे टाळा. ज्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होणार आणि तुम्हाला डोकेदुखी, पायात कॅम्प येणे यापासून मुक्ती मिळेल.

पाठदुखी कमी होते (Prevents Backaches)

पाठदुखी ही बैठी कामे करण्याऱ्या लोकांची एक कॉमन समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या तुमचं शरीर लवचिक राहील. पाण्यामुळे पाठीचा मणक्यातील द्रव्यपदार्थ संतुलित राहतात. पाठीचा कणा लवचिक राहतो. कंबरेत चमक भरण्याची  समस्या असल्यास पाणी प्या. कारण पाण्यामुळे तुमच्या शरीरातील लॅक्टीक एसिड विकसित होऊन दाह कमी होतो. सतत पाणी प्यायल्याने तुम्हाला वारंवार वॉशरुमला जावं लागतं पण यासाठी मुळीच लाजू नका किंवा पाणी पिण्याचा कंटाळादेखील करु नका. लक्षात ठेवा लघवीवाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जात असतात.

तुमच्या शरीराचे संतुलन राखले जाते (Restores Your Body Temperature)

मानवी शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. पेशीकार्य, टीश्यूंचे कार्य व निरनिराळ्या इंद्रियांची कार्य अशी शरीराचे दैनंदिन कार्य सुरळीत चालण्यासाठी पाणी गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीराचे कार्य तर उत्तम चालतंच शिवाय शरीराचे तापमानदेखील संतुलित राहतं. घाम येणे, पचन करणे, हायड्रेशन या क्रियांमुळे वाढलेलं शरीराचे तापमान पाणी पिण्याने नॉर्मल होते.

तोंडाला दुर्गंध येत नाही (Prevents Bad Breath)

तोंड सुकल्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येऊ लागतो. तोंडाला दुर्गंध येण्यापासून वाचण्यासाठी स्वतःला हाडड्रेट ठेवा. पाणी पिण्याने तुमच्या तोंडात जेवणानंतर अडकलेलं अन्नकण अथवा जंतूदेखील निघून जातात.

ADVERTISEMENT

हॅगओव्हर उतरविण्यासाठी मदत होते (Helps With Your Hangover)

मद्यपानामुळे शरीर डिहायड्रेट होते. मद्यपान केल्यास सकाळी ‘हॅगओव्हर’चा त्रास जाणवू लागतो. मद्यपान केल्यास रात्री झोपण्यापूर्वी भरपूर पाणी प्या किंवा सकाळी उठल्यावर तरी भरपूर पाणी प्या.

जाणून घ्या झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे काही महत्वाचे फायदे

जर तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल तर झोपण्यापूर्वी पाणी पिणं त्रासदायक ठरू शकतं. यासाठी झोपण्याआधी तीस मिनीटे पाणी प्या. ज्यामुळे तुम्हाला मध्यरात्री युरीनसाठी उठावं लागणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याच्या अनेक फायद्यांकडे तुम्हाला दुर्लक्ष करुन चालणार नाही. लक्षात ठेवा शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी रात्रभर शरीर हायड्रेट असणं फारच महत्वाचे आहे.

FAQs

मी रिकाम्या पोटी पाणी पिऊ शकते का?

खरंतर सकाळी उठल्याबरोबर अनोशी पोटी पाणी पिणं ही एक जपानी पद्धत आहे. ज्याचा खूप चांगला परिणाम होतो. ब्रश न करता रोज चार ग्लास पाणी पिण्याने तुमचे मेटाबॉलिझम चांगले होते, तुमची त्वचा निरोगी दिसू लागते व तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत चालते. जपानी लोक यानंतर जवळजवळ 45 मिनीटे काहीही न खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे शरीरातील पोषकमुल्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात.  साधारणपणे ज्या महिलांना मासिक पाळीच्या समस्या असतात, तसेच डोळ्यांच्या समस्या आणि चयापचयाच्या समस्या असतात त्यांना ‘या’ पद्धतीने पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. शिवाय शरीर निरोगी राखण्याचादेखील हा एक सर्वात सोपा मार्ग आहे.

माझ्या शरीरासाठी गरम की थंड पाणी  पिणं योग्य आहे?

यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पाणी गरम असो किंवा थंड दोघांचेही चांगले परिणाम शरीरावर होतात. तरिही तुमच्या गरजेनूसार तुम्ही गरम अथवा थंड पाण्याची निवड करू शकता. उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याने  शरीराचे तापमान संतुलित राहते. पण जर तुम्हाला जेवण्यापूर्वी अथवा जेवल्यानंतर तहान लागत असेल तर तुम्हाला थोडं गरम पाणी पिण्याची गरज आहे ज्यामुळे शरीरातील अन्नाचं व्यवस्थित पचन होऊ शकेल.

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याचे काय फायदे होतात?

पाणी पिण्याने विशेषतः बर्फाचं पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात. एका संशोधनानूसार, तुमच्या रोजच्या सवयीपेक्षा एक लिटर पाणी अधिक पिण्याने काही महिन्यातच तुमचे वजन कमी होते. पाणी पिण्याने तुमचे चयापचयाचे कार्य वाढते, टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात व शरीर निरोगी राहते.

रात्री तहान लागणे हे मधूमेह असण्याचे लक्षण आहे का?

मधूमेहामुळे लघवीचे प्रमाण वाढते त्यामुळे सतत तहान लागू शकते.मधूमेहाच्या लक्षणांमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता देखील वाढते ज्यामुळे सतत तहान लागते. मात्र सतत तहान लागणं हे केवळ मधूमेहाचंच लक्षण आहे असंं मुळीच नाही. म्हणून जर तुम्हाला सारखी तहान लागत असेल तर आधी याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दिवसभरात किती पाणी पिणं गरजेचं आहे?

साधारणपणे तुमच्या शरीराला कमीतकमी दोन लीटर पाणी पाण्याची गरज असते. पण आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे संशोधनानूसार, तुम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. जर दिवसभर दोन लीटर पाणी पिऊन देखील तुम्हाला सतत तहान लागत असेल तर तुमच्या शरीराला अधिक पाण्याची गरज असू शकते.

तसंच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर चयापचय व पचनक्रिया चांगली होण्यासाठी अजून एक लीटर पाणी प्या.

ADVERTISEMENT

GIFs – Giphy

देखील वाचा – 

जागतिक जल दिवसानिमित्त ’50’ पाणी वाचवा घोषवाक्य

20 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT