भारतीय संस्कृतीत पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. कारण पृथ्वीप्रमाणे मानवी शरीरातदेखील सत्तर टक्के पाणी आहे. निसर्गाने केलेली ही व्यवस्था अगदी अदभूत आहे. जगातील कोणताही जीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. मानवी शरीरराला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिण्याची गरज असते तसेच सकाळी चालण्याचे फायदे ही आहेत. मात्र अनेकांना शरीरासाठी थंड पाणी योग्य की कोमट पाणी असा प्रश्न पडतो. वास्तविक कोमट पाणी पिणेदेखील शरीरासाठी लाभदायक असते. कारण कोमट पाणी पिण्याने तुमच्या अनेक आरोग्य समस्या कमी होऊ शकतात. यासाठीच जाणून घेऊया कोमट पाणी पिण्याचे शरीरावर काय चांगले फायदे होतात.
आरोग्य शास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यावे. कारण त्यामुळे तुमचा बद्धकोष्ठता आणि अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. वास्तविक कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. ज्यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या कमी होतात.
एजिंग म्हणजे वयाच्या आधी म्हातारपण येणं. आजकालचं वाढतं प्रदूषण आणि धावती जीवनशैली यामुळे अनेकजण वयाच्या आधीच वयस्कर दिसू लागतात. महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जर तुम्हाला चिरतरूण दिसायचं असेल तर सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि तरूण दिसेल.
कोमट पाणी पिल्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यासाठी दररोज एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून ते पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणार नाही आणि तुम्ही सुडौल दिसाल.
अनेकांना किडनी स्टोन अथवा मुतखड्याची समस्या असते. मुतखडा निघून जाण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. शिवाय जे लोक नियमित कोमट पाणी पितात त्यांना मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.
जर तुम्हाला अंगदुखी अथवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित होतो ज्यामुळे दुखणे कमी होऊ शकते.
मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
त्वचेच्या सौंदर्यासाठी कोमट पाणी अक्षरशः वरदान आहे. त्यामुळे जर तुम्हाला एखादी त्वचा समस्या असेल तर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या अशा समस्या कोमट पाणी पिण्याने कमी होऊ शकतात. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देखील येईल.
बऱ्याचदा वातावरणातील बदल अथवा इनफेक्शनमुळे वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवतो. तुम्हालाही असा त्रास असेल तर नियमित कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळे घसा आणि नाकातील कफ बाहेर पडण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. कोमट पाणी पिणे हा खोकला आणि सर्दीवर चांगला उपाय आहे.
नियमित कोमट पाणी पिण्याने केस गळणे, केस कोरडे आणि निस्तेज दिसणे, केसात कोंडा होणे अशा समस्या दूर होतात.
पाणि प्रतिष्ठा बद्दल देखील वाचा
मासिक पाळीच्या काळात अनेकींना पोट, कंबर अथवा पाठीत वेदना जाणवतात. मासिक पाळीतील क्रॅम्प कमी करण्यासाठी या काळात कोमट पाणी प्या. काहीवेळ यामुळे तु्म्हाला आराम मिळू शकतो.
जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम