मेकअप प्रॉडक्ट अथवा मेकअप विषयी वाचताना तुम्ही नेहमी बनाना पावडर हे नाव ऐकलं असेल. मात्र काहींना त्याबाबत माहीत नसल्यामुळे बनाना पावडर म्हणजे नेमकं काय असा प्रश्न नक्कीच पडला असेल. खरंतर बनाना पावडरचा वापर फक्त प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टच करतात. बनाना पावडर ही एक मेकअप सेट करणारी पावडर असून याममुळे तुमच्या फाईन लाईन्स, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल झाकल्या जातात. आणि तुमचा चेहरा एकसमान स्कीन टोनप्रमाणे दिसू लागतो. बनाना पावडर ही पिवळसर, सोनेरी रंगाची असून ती सर्व प्रकारच्या स्कीन टोनसाठी उपयुक्त ठरते. मेकअप आर्टिस्टसाठी हे त्यांचं एक ब्युटी सिक्रेट असू शकतं ज्यामुळे त्यांचा मेकअप सर्वात बेस्ट दिसतो. मात्र सध्या बाजारात विविध प्रकारच्या बनाना पावडर उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हीही एखाद्या प्रोफेशनल लुकसाठी बनाना पावडरचा वापर नक्कीच करू शकता.
बनाना पावडर वापर करणं आहे अगदी सोपं –
बनाना पावडरचा वापर मेकअपसाठी करणं अतिशय सोपी गोष्ट आहे. कारण लूज पावडर स्वरूपात असलेली बनाना पावडर अतिशय मऊ आणि रेशमासारखी असते. तुम्ही तुमचे फाऊंडेशन आणि कन्सिलर लावून झाल्यावर चेहऱ्यावर बनाना पावडरचा वापर करू शकता.
बनाना पावडरचा वापर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स –
- बनाना पावडर चेहऱ्यावर लावण्यासाठी एका मोठ्या पावडर मेकअप ब्रशचा वापर करा. या ब्रशने बनाना पावडर तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर डस्ट करा.
- तुमचा मेकअप सेट करण्यासाठी थोडीशी बनाना पावडर तुम्ही मेकअप स्पंज अथवा पफच्या मदतीने तुमच्या अंडर आय म्हणजेच डोळ्यांच्या खालील भागावर लावू शकता. त्यानंतर पाच मिनीटे तुमचा मेकअप सेट करण्यासाठी तसाच राहू द्या. तुमच्या शरीरातील उष्णतेमुळे तुमचे कन्सिलर या पद्धतीने व्यवस्थित सेट होईल.
- सर्वात शेवटी तुमच्या चेहऱ्यावरील जास्त झालेली पावडर ब्रशच्या मदतीने काढून टाका.
यामुळे तुमचा संपूर्ण मेकअप व्यवस्थित सेट होईल. तुमच्या फाईन लाईन्स झाकल्या जातील आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही निघून जाईल. ज्यामुळे चेहऱ्याला एक छान ग्लो आणि एकसमान टोन मिळेल. बनाना पावडरमुळे तुमचा मेकअप दिवसभर टिकेल. तुमचे फाऊंडेशन अथवा कन्सिलर टिकण्यासाठी बनाना पावडर वापरणं तुमच्या फायद्याचं ठरेल किंवा चांगला कॉम्पॅक्ट पावडर.
बनाना पावडर कधी वापरावी –
बनाना पावडरचा वापर स्कीन कलर करेक्टरसाठी केला जातो. ज्यामुळे त्वचेला एक नैसर्गिक ग्लो येतो, अतिरिक्त शाईन, तेल निघून जाते. आणि तुमचा मेकअप जास्त काळ टिकतो. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फाईनलाईन्सही दिसत नाहीत. बनाना पावडर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते त्यामुळे तुम्हाला एक छान सेट लुक मिळतो. शिवाय तुम्ही याचा वापर तुमच्या संपू्र्ण चेहऱ्यावर करू शकता. किंवा तुम्ही ती फक्त डोळ्यांच्या खाली, नाक, हनुवटीवर लावू शकता. ज्यामुळे चेहरा ब्राईट दिसू लागेल.
बनाना पावडर आणि सर्व लूज पावडर सारख्या असतात का ?
नाही, बऱ्याचदा अनेक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्टमुळे थोडे कन्फुजन होण्याची शक्यता असते. मात्र लक्षात ठेवा साध्या लूज पावडर आणि बनाना पावडर ही एकसारखी नाही. लूज पावडर अथवा साध्या पावडर तुम्ही चेहऱ्यावरील पिंगमेट लपवण्यासाठी वापरली जाते. मात्र बनाना पावडर तुमचा मेकअप सेट करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल मेकअप करता अथवा तुम्हाला फोटोशूट करायचे असते तेव्हा मेकअपसाठी बनाना पावडर वापरणं फायद्याचं ठरतं. कारण तेव्हा तुम्ही हाय कव्हरेज देणारं फाऊंडेशन चेहऱ्यावर लावलेलं असतं. अशा मेकअपमध्ये चेहरा पुन्हा नॅचरल दिसण्यासाठी बनाना पावडरने मेकअप सेट करणं आवश्यक असतं.
मेकअप सेट करण्यासाठी अवश्य वापरा Myglamm ची ही बनाना पावडर
फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का