खूप जणांना व्यायाम करायचा असतो. पण त्यांना व्यायाम करायचाही असतो. शरीराला कष्ट न देता अशांनाही व्यायाम हवा असतो. कारण त्यांना बारीक व्हायचे असते. तुम्ही ही असेच आळशी प्रकारातील असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. मस्त बेडवर झोपून तुम्हाला हे व्यायाम प्रकार करता येतील. त्यामुळे तुमच्या मांड्या, पोटऱ्या, पोट आणि शरीराच्या भागात साचलेली चरबी कमी होण्यास मदत मिळेल. हा आता वजन कमी होण्याची गती यामध्ये नक्कीच कमी असते. पण तुमच्या शरीरात यामुळे नक्कीच फरक पडलेला जाणवेल.
पायाचा पंखा
पायाचा पंखा हा व्यायाम खूप सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला पाठीवर झोपायचे आहे. पाय गुडघ्यात दुमडायचे आहेत. आता डावा पाय डाव्या दिशेला खाली न्यायचा आहे आणि उजवा पाय उजव्या बाजूला. असे तुम्हाला सतत करत राहायचे आहे. पायाला पंखा करत तुम्हाला हा व्यायाम करत राहायचे आहे. त्यामुळे तुमचा पाय दुखेल. पण मांड्यांसाठी हा व्यायाम खूपच चांगला आहे. हा व्यायाम करताना तुम्ही हातात फोन घेऊन काही इतर कामेही करु शकता. पायाचा पंखा हा व्यायाम तुम्हाला जेव्हा पडावेसे वाटेल तेव्हा करायला काहीच हरकत नाही.
बेबी पोझ
आता बेबी पोझ हा लोव्हर ॲब्जसाठी उत्तम असा व्यायाम आहे यामध्ये तुम्हाला पाठीवर झोपायचे आहे. दोन्ही पाय पोटाजवळ घ्यायचे आहे. दोन्ही पाय एकत्र करुन लांब न्यायचा आहे आणि परत पोटाजवळ आणायचा आहे. ही क्रिया तुम्हाला सतत करत राहायची आहे. त्यामुळे तुमच्या पोटाचा व्यायाम चांगला होता. बेबी पोझमध्ये ताण तुमच्या पोटावर येतो.पण तो तुमच्या पोटासाठी चांगला असा व्यायाम आहे. बेबी पोझ हा व्यायाम करतानाही तुम्हाला फोनचा वापर करता येईल.
पोटऱ्या आणि बट्स किक
खूप जणांच्या पोटऱ्या देखील लठ्ठ असतात. अशा लठ्ठ पोटऱ्या अजिबात चांगल्या दिसत नाही. तुमच्याही मांड्या, पोटऱ्या आणि बट्सचा व्यायाम करायचा असेल तर तुम्ही पोटावर झोपा. तुम्ही जसे झोपता तसे झोपायचे आहे किंवा तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही झोपू शकता. आता तुम्हाला पाय गुडघ्यात दुमडायचे आहे. पाय सोडून पुन्हा दुमडायचा आहे. असे तुम्हाला करत राहायचे आहे. त्यामुळे तुमच्या पोटऱ्यांचा चांगला व्यायाम होतो. हा व्यायामही तुम्हाला चांगला शेप देण्यासाठी फारच फायद्याचे आहे.
वजन कमी करण्यासाठी असे करा कॉफीचे सेवन आणि बघा फरक
साईड्स
पाठीवर झोपून करण्यासारखा हा व्यायामप्रकार आहे. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पाठीवर झोपायचे आहे. इतकेच नाही तर तुम्हाला दोन्ही पाय एकदा डाव्या बाजूला आणि दुसऱ्या वेळी उजव्या बाजूला असा फिरवायचा आहे. असे केल्यामुळे तुमच्या साईड् फॅट्सना कमी होण्यासाठी फायदा मिळतो. तुम्ही हमखास हा व्यायाम करायला हवा. त्यामुळे तुमच्या कंबरेला चांगला आकार मिळण्यास मदत मिळेल.
आता व्यायामाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अगदी हमखास बेडवर झोपून असा व्यायाम करायला हवा. जो तुम्हाला नक्कीच व्यायाम करण्याची प्रेरणा देऊ शकेल
आरोग्यदायी गुळाचा चहा पिण्याचे फायदे (Gulacha Chaha Che Fayde)