ADVERTISEMENT
home / Eye Make Up
परफेक्ट लुकसाठी असा करा स्टेप बाय स्टेप आयब्रो मेकअप

परफेक्ट लुकसाठी असा करा स्टेप बाय स्टेप आयब्रो मेकअप

मेकअप करताना नॅचरल लुक हवा असेल तर इतर मेकअपपेक्षा आयब्रो मेकअपवर जास्त भर द्या. कारण फक्त आयब्रो सेट करूनही तुम्ही आकर्षक दिसू शकता. जर तुमच्या आयब्रोज खूप पातळ आणि विरळ असतील तर आयब्रो मेकअप केल्यावर तुमच्या लुकमध्ये चांगलाच बदल दिसून येईल. यासाठी तुम्हाला लागेल फक्त आयशॅडो, कन्सिलर, फाऊंडेशन, आयब्रो ब्रश आणि स्पूली ब्रश… मग लागा कामाला आम्ही दिलेल्या स्टेप बाय स्टेप टिप्स फॉलो करा आणि करा तुमचा परफेक्ट आयब्रो मेकअप

आयब्रो मेकअप करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत (Eyebrow Makeup Tutorial Step By Btep)

मेकअप करताना आयब्रो सेट करण्यासाठी तुम्ही आजवर अनेक उपाय केले असतील. पण तरिही प्रत्येकवेळी तुम्हाला हवा तसा परिणाम मिळाला असेलच असं नाही. कारण अशा उपायांमुळे कधी भुवया जास्त डार्क दिसतात तर कधी त्यांचा शेपच खराब होतो. यासाठीच आम्ही तुम्हाला आयब्रो मेकअप करण्याची योग्य पद्धत स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहोत. ज्यामुळे तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसेल.

स्टेप १ – सर्वात आधी संपूर्ण चेहऱ्यावर फेस प्रायमर लावून घ्या. जर तुम्ही पुर्ण चेहऱ्यावर मेकअप करणार नसाल तर फक्त आयब्रोजवर प्रायमर लावा. ज्यामुळे तुमचा आयब्रो मेकअप जास्त काळ टिकेल.

स्टेप २ – जर तुमच्या डोळ्यांवर डार्क सर्कल्स असतील तर कन्सिलर वापरून ते झाकायला हवेत. कारण कन्सिलर लावण्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या खालील त्वचा एकसमान दिसेल आणि भुवया उठून दिसतील.

ADVERTISEMENT

स्टेप ३ – कंन्सिलर लावल्यानंतर स्पूल ब्रशने भुवया स्वच्छ करा आणि सेट करा.

स्टेप ४- आयशॅडो पॅलेटमधील ब्राऊन, काळ्या अथवा राखाडी अशा तुमच्या भुवयांच्या रंगाप्रमाणे स्ट्रोक द्या. जर तुम्हाला तुमचे आयब्रोज कोरीव दिसावे असं वाटत असेल तर आधी एक आऊटलाईन ड्रा करा आणि त्यामध्ये पावडर भरा. यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही बाजारात मिळणारी स्पेशल ब्रो पावडरही वापरू शकता. पावडरमुळे आयब्रोज मऊ राहतात आणि  नॅचलर दिसतात. या स्टेप फॉलो करून तुम्ही कधीही तुम्हाला हव्या तशा भुवया सेट करू शकता. ज्यामुळे तुम्हाला मिळेल घनदाट आणि जाड भुवया. यासाठी तुम्ही MyGlamm ची (STAY DEFINED LIQUID EYELINER BROW POWDER) ही आयब्रो पावडर वापरू शकता. ही आयब्रो पावडर आर्गेनिक आहेच शिवाय तुमच्या भुवया यामुळे नॅचरल दिसतील. या पावडरची खासियत ही आहे की यामुळे तुम्हाला आयलायनरचा फायदाही मिळेल. कारण  हे एक ड्युअल कॉंम्बो आहे. एका बाजून ब्रो पावडर आणि दुसऱ्या बाजून ब्रॅक मॅट फिनिश आयलायनर 

 

स्टेप ५ – ब्रो पावडर फिल केल्यावर त्याला फिनिशिंग देण्यास विसरू नका. जर तुम्हाला पावडर वापरल्यावर ती जास्त वाटत असेल तर तुम्ही ब्रशने ती कमी करू शकता.

ADVERTISEMENT

स्टेप ६ – भुवया फिल केल्यावर फाऊंडेशन अथवा कन्सिलर ब्रशने भुवयांच्या खाली एक पातळ थर द्या. ज्यामुळे तुमच्या भुवया उठून दिसतील. 

स्टेप ७-  वरच्या बाजून ही स्टेप फॉलो करायची नसेल तर फक्त हायलायटरचा वापर करा. 

स्टेप ८- काजळ, आय लानयर, मस्कारा लावा आणि आय मेकअपसह तयार व्हा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

कलरफुल आयलायनर लावताना लक्षात ठेवा या गोष्टी

काजळ पसरल्यामुळे लुक खराब होत असेल तर वापरा सोपी पद्धत

सोशल मीडियावरील नवा ब्युटी ट्रेंड, ब्रो सोपने करा भुवया सेट

25 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT