home / DIY सौंदर्य
तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा ‘हे’ फेसपॅक

तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा ‘हे’ फेसपॅक

आपल्याला नेहमीच आपली त्वचा चमकदार राहावी असं वाटत असतं. पण त्यासाठी सतत पार्लरच्या फेऱ्या नक्कीच आपल्या खिशाला परवडणाऱ्या नसतात. मग अशावेळी नक्की काय करायचं? घरच्याघरी आपल्याला काही उपाय मिळू शकतात का? तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. तुम्हाला तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये चमकदार करण्यासाठी काही घरगुती फेसपॅक आहेत. त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमची त्वचा अधिक चमकदार करू शकता. तसंच यामध्ये कोणतंही केमिकल नसल्यामुळे तुमची त्वचा अधिक सुरक्षितदेखील राहाते. इतकंच नाही या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि त्याशिवाय चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होऊन उजळ त्वचा मिळवणं अधिक सोपं होतं. 

1. पुदीना आणि लिंबाचा फेसपॅक

Shutterstock

हे नक्कीच थोडं वेगळं कॉम्बिनेशन आहे. नेहमी याचा वापर चटणी करण्यासाठी आपण करतो. पण तुमच्या चेहऱ्यासाठीही याचा वापर तुम्हाला करता येऊ शकतो. लिंबामध्ये विटामिन सी असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यासाठी लिंबू हे अत्यंत उपयुक्त आहे. त्याला पुदीन्याची साथ मिळाल्यास, तुमच्या चेहऱ्यामध्ये चमक येण्यास अधिक मदत मिळते. 

कसा तयार कराल फेसपॅक 

 • पुदीना स्वच्छ करून त्याचा रस काढून घ्या
 • 2 चमचे पुदीन्याच्या रसामध्ये 1 चमचा लिंबाचा रस व्यवस्थित मिसळून घ्या
 • हे मिश्रण तुम्ही तुमच्या चेहरा आणि मानेवर लाऊन साधारण 10 मिनिट्स तसंच ठेवा
 • त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा

त्वचेसाठी फायदेशीर आहे मुलतानी माती

2. मध आणि बदाम पावडर

Shutterstock

मध हा तर चेहऱ्यासाठी नेहमीच अत्यंत उपयुक्त असतो याची सर्वांनाच कल्पना आहे. चेहऱ्यावरील टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. पण याचा एक वेगळा फेसपॅक तुम्हाला बदामाची पावडर मिक्स करून चेहरा चमकदार करण्यासाठी उपयोग करू शकता.

कसा तयार कराल फेसपॅक 

 • 1 चमचा मधामध्ये दुप्पट अर्थात 2 चमचे बदाम पावडर घाला 
 • त्यामध्ये 2-3 थेंब लिंबाचा रस मिक्स करा
 • हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि 10 मिनिट्स तसंच ठेवा
 • त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा

3. बेसन आणि दूध

Shutterstock

बेसन हे नेहमीच आपल्या चेहऱ्यावरील प्रदूषण, धूळ आणि टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कॉम्बिनेशनमुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास आणि टॅनिंग दूर होण्यास मदत होते. 

कसा तयार कराल फेसपॅक 

 • बेसनामध्ये दूध आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळून फेसपॅक तयार करा
 • हा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुकू द्या
 • 10 मिनिट्सनंतर तुम्ही हा फेसपॅक धुवा आणि चेहऱ्यावरील फरक पाहा

घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर

4. मेथीची पानं

Shutterstock

मेथी ही खरं तर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. मेथीमध्ये चेहऱ्याला लागणारी पोषक तत्व असतात. मेथी ही तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त मानली जाते. मुळात तुमच्या त्वचेवर असणारे पिंपल्स घालवण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. 

कसा तयार कराल फेसपॅक 

 • मेथीची पानं मिक्सरमधून थोडं पाणी घालून वाटून घ्या
 • ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावून किमान 10 मिनिट्स ठेवा
 • त्यानंतर चेहरा धुवा 

5. मुळ्याची भाजी

Shutterstock

मुळ्याची भाजी ही आपल्याला खाण्यासाठी असते हे नक्कीच माहीत आहे. पण किसलेल्या मुळ्याचा उपयोग तुम्ही तुमचा चेहरा अधिक चमकदार करण्यासाठी नक्कीच करू शकता. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण तुम्हाला याचा नित्यनियमाने उपयोग करून घेता येतो. 

कसा तयार कराल फेसपॅक 

 • मुळा किसून घ्या
 • यामध्ये अधिक काहीच करण्याची गरज नाही. किसलेला मुळा तुमच्या चेहऱ्यावर लावा
 • लागलेलं पाणी तुम्ही सुकू द्या आणि दहा मिनिट्सने चेहरा व्यवस्थित धुऊन घ्या

You Might Like These:

घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

यासाठी घरीच तयार करा हे फेस पॅक (Homemade Face Pack In Marathi)

कमी वेळात चमकदार त्वचेसाठी बदामाचं तेल (Benefits Of Almond Oil In Marathi)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

09 Oct 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text