जीवन म्हणजे सतत सुरू असलेला एक प्रवास आहे. मग या प्रवासात काही प्रवासी आयुष्यभर सोबत असतात तर काहींना मध्येच त्यांच्या मुक्कामी उतरावं लागतं. अगदी लहानपणापासून एकत्र असलेले जीवलग मित्रमैत्रिणीदेखील शालेय जीवनात दहावीनंतर आपला निरोप घेतात. म्हणजेच आयुष्यात आपल्याला अनेक निरोप समारंभाना सामोरं जावं लागतं. मग ती शाळा असो, कॉलेज असो वा एखाद्या नवीन ठिकाणी झालेलं स्थलांतर असो. अशा भावनिक क्षणी आपल्या जीवलगांना निरोप देण्यासाठी शब्दांची गुंफण करणंही कधी कधी कठीण जातं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत निरोप समारंभ शुभेच्छा संदेश (Farewell Quotes In Marathi)
Table of Contents
- Heart Touching Farewell Quotes In Marathi | निरोप समारंभासाठी मन हेलावून टाकणारे शुभेच्छा संदेश
- Farewell Messages In Marathi | निरोप समारंभासाठी संदेश
- Farewell Wishes In Marathi | निरोप समारंभासाठी शुभेच्छा
- Farewell Poem in Marathi | निरोप समारंभासाठी कविता
- Farewell Quotes In Marathi For Friend | जीवलग मित्रांसाठी निरोप संदेश
- Farewell Wishes In Marathi For Teachers | गुरूजनांसाठी निरोप शुभेच्छा संदेश
- Farewell Message In Marathi For Boss | ऑफिसमधल्या बॉससाठी निरोप शुभेच्छा संदेश
या निरोप समारंभ शुभेच्छासोबतच तुम्ही काही निरोप समारंभ शायरी देखील तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करू शकता.
Heart Touching Farewell Quotes In Marathi | निरोप समारंभासाठी मन हेलावून टाकणारे शुभेच्छा संदेश
काही निरोप असे असतात जे देताना मनाला अतीव वेदना होतात…अशा जीवाभावाच्या लोकांना निरोप देण्यासाठी काही भावनिक संदेश आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
१. फेअरवेल म्हणजे आयुष्याचा शेवट नक्कीच नाही, एखाद्या शिवाय जगायला शिकवणारी ती जगण्याची पहिली स्टेप आहे.
२. काही जीवलग मित्र नेहमीच तुमच्या ह्रदयाच्या कोपऱ्यात राहतात, मग त्यांना अशी कोणतीही फेअरवेल पार्टी वेगळं नाही करू शकत.
३. तुला थांबवू शकत नाही पण तुला विसरूदेखील शकत नाही, तु परत येशील ही खात्री आहे म्हणून फक्त वाट पाहत राहीन.
४. तुझा सहवास माझ्यासाठी ऑक्सिजन आहे आता तुझ्या जाण्याने खरंतर मी गुदमरून जाईन, पण तु जा कारण तुझं यश तुझी वाट पाहतंय, या एकाच आशेवर मी जगण्याचा प्रयत्न करेन, आणि आयुष्यभर तुझी वाट पाहीन.
५. आयुष्याच्या प्रवासात चांगली माणसं भेटतात आणि चांगल्या आठवणी देऊन जातात, तुमच्यासोबत घालवलेल्या गोड आठवणी कायम माझ्या ह्रदयात राहतील.
६. निरोपाच्या क्षणी डोळ्यात हासु आणि आसु, आता मात्र माझे मन खोल आठवणीत लागले आहे रुसू
७. कधा कधी निरोप घेणं ही फार महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळेच पुन्हा भेटण्याची ओढ निर्माण होते.
८. पुन्हा पुन्हा मिळण्याची संधी मिळू दे, सोबतीने घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता येऊ दे, जेव्हा पण माझ्या आठवणीने डोळे बंद करशील तू, स्वप्नात तुझी माझी भेट घडू दे.
९. विचार असे करा ज्यामुळे कधी दुःख होणार नाही आणि तुमच्या ह्रदयात इतकी जागा ठेवा की मी नसतानाही तुम्हाला माझी आठवण सतावणार नाही.
१०. तुम्हाला निरोप देताना मन आले भरून, ईश्वराकडे एकच प्रार्थना तुम्हाला यश मिळू दे भरभरून.
Farewell Messages In Marathi | निरोप समारंभासाठी संदेश
प्रियजनांना निरोप देण्यासाठी शब्दसुमनांमध्ये बांधलेले हे काही संदेश… जे संदेश वाचून तुमच्या जवळची ही मंडळी नक्कीच भावूक होतील. शिवाय हे संदेश तुम्ही त्यांना दिलेल्या गिफ्ट कार्डवरही लिहू शकता.
१. मला आठवतात ते सारे क्षण जे आपण सोबतीने घालवले.. पुन्हा ते क्षण नक्कीच येतील. तुला तुझ्या उज्जल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
२. नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित हास्य सदा तुमच्या चेहऱ्यावर असू दे, तुम्हाला हवे ते सर्व काही मिळू दे
३. मला प्रत्येकक्षणी तू मदत केलीस, आता जेव्हा मला तुझी जास्त गरज आहे तेव्हाच तुला जायचं आहे… जा मी तुला अडवणार नाही… तुला तुझ्या यशस्वी जीवनासाठी खूप शुभेच्छा
४. रोज नाही काढलीस आठवण तरी चालेल पण विसरून मात्र जाऊ नकोस. एकदा जीव लावला आहेस तर फोन करायला तरी विसरू नकोस
५. उद्या आपण एकत्र नसू, आठवणी मात्र कायम स्मरू, हा क्षण कधीच विसरता येणार नाही, आजच सारे आयुष्य जगू
६. उगाचच होत नाही भेट दोन जीवांची , त्यामागे असतं काहीतरी कारण, आजचा क्षण असेल विरहाचा, पण उद्या होईल भेट अचानक
७. आपल्या सहवासाचा प्रवास आता इथेच थांबेल, पण त्यातून काहीतरी चांगलेच घडेल, उद्या तुझ्या यशाच्या बातमीने, माझ्या अंतःकरणात नक्कीच आनंद स्फुरेल
८. निरोप देताना डोळे आलेत भरून, पण मनातून मात्र मी खूप खुश आहे, कारण माझा मित्र आता मोठा झालाय, माझ्याशिवाय त्याने नवा प्रवास सुरू केलाय
९. सोबतीचा जमा खर्च करता करता, रात्र अशी भर भर सरली, मी इथे झुरत राहिली आणि…तुझी तिकडे नवी पहाट झाली
१०. बॅक बेंचर मी आणि कॉलेजची टॉपर तू, म्हणूनच सगळे जळतात तुझी माझी मैत्री पाहून, तुला भविष्यात कमावायचं आहे नाव आणि मला हवीस तू, तु सोडून जाणार या विचारानेच डोळे आले भरून
जागतिक मैत्री दिनासाठी शुभेच्छा संदेश
Farewell Wishes In Marathi | निरोप समारंभासाठी शुभेच्छा
निरोपच द्यायचा तर जड अंतःकरणाने का शुभेच्छांनी देऊया… कारण जरी तुमचे प्रियजन तुमच्यापासून दूर जात असले तरी त्यांच्या जीवनाची ही नवी सुरुवात आहे आणि ती तुमच्या शुभेच्छांनी अधिक सुंदर होऊ शकते.
१. फुलांच्या बागेत तुझे घर असावे
चांदण्यांचा प्रकाशात अंगण चमकावे
यश तुझ्या हातात असावे
मनात मात्र माझेच नाव असावे
भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा
२. उगवणाऱ्या सुर्याकडून प्रकाश मिळू दे
फुलणाऱ्या फुलाकडून सुगंध मिळू दे
तुम्ही जात आहात ज्या ठिकाणी
तिथे तुम्हाला भरपूर आनंद मिळू दे
३. चंद्रतारे आणि सुर्यमंडळ सारे काही कमी पडेल
इतका तुझ्या आयुष्यात यशाचा प्रकाश पडू दे
नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
४. मन आणि विचार दोघांची सांगड काही घालता येत नाही
एवढ्या लवकर दूर जावं लागेल हे मनाला काही केल्या पटत नाही
पण एवढं खरं की मनात सदैव तुझ्यासाठी शुभेच्छाच असतील
५. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छा सण आहे
पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे
६. निरोप म्हणजे नेमकं काय एका नात्याचा शेवट की नवी सुरूवात…आपण नवी सुरुवात झाल्याचा आनंद व्यक्त करू या… तुझ्या नवीन सुरुवातीसाठी खूप खूप शुभेच्छा
७. तु गेल्यावर खरंतर माझे मन कशातच लागणार नाही, पण तुझ्या यशाचा आनंद मी सतत व्यक्त करेन, शक्य असेल तर पुन्हा भेटायला नक्की ये.. तुझ्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा
८. सर्व म्हणतात तुझी माझी जोडी म्हणजे राम लखन, पण आता लखनला एकटं सोडून राम चालला आहे… वनवासाला नाही तर अयोध्येची स्थापना करायला. तुझ्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
९. बघता बघता शाळेचे दिवस संपून गेले, आता कॉलेजमध्ये जायची वेळ झाली,यापुढे तुझा माझा प्रवास वेगळा असेल, पण बालपण मात्र कायम तुझ्या मनात असेल. तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
१०. निरोप देणं कधीच सोपं नसतं, आवडीच्या लोकांना तर मुळीच नाही… म्हणून फक्त शुभेच्छाच पाठवत आहे. तुला भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा
Farewell Poem in Marathi | निरोप समारंभासाठी कविता
निरोप समारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी फक्त संदेशच नाही तर निरोप समारंभ शायरी अथवा निरोप समारंभ कविता देखील तुम्ही प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करू शकता. यासाठी या काही कविता नक्की वाचा.
१. स्वेच्छा निवृत्ती
निवृत्ती ही निवृत्तीच असते
तुमची आमची सेमच असते
कोणाच्या नशिबी ती पूर्ण असते
तर कोणाला निवृत्तीच नसते
स्वेच्छा निवृत्ती मात्र निराळी
घ्या वेळी अथवा अवेळी
वृत्तीची ही तऱ्हा मात्र बावळी
न ही सफेगी न ही सावळी
अलिप्त तेचे महत्त्व आगळे
अन्यथा न समजेल जग हे सगळे
बदल हवेत सतत वेगवेगळे
तरच कळतील हंस आणि बगळे
नव्हेच हितावह गुंतून राहणे
अलिप्ततेने असावे पाहणे
दुराव्याची व्यथा ही सहन न करणे
जिंकता जिंकता खुशीने हरणे
जनमत असो काही आपण असावे ठाम
शुद्ध हेतूच्या जोडीला असावे उज्ज्वल काम
दक्षतेने जमवावे समाधानाचे दाम
तरच राहील या जीवनी खरा राम
– विनायक दी. पत्की
२. निवृत्ती
घटका गेली पळे गेली अखेर आली निवृत्ती
आता थोडी चैन करू या , बदला आपली वृत्ती
लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या
बेड टीची लज्जत न्यारी एकदा चाखून घ्या
चवीचवीने वाचा पेपर, वरवर फिरवून दृष्टी
मापे काढा ओबामांची, अन बुशची खटरपट्टी
टीव्ही पाहत चाखा नाश्ता, रोज नवीन रतीब
खिल्ली उडवा भल्याभल्यांची, सैल सोडून जीभ
ऑफिसची ना घाई आता, रोजरोजची सुटी
निवांत अंघोळ, निवांत पूजा, करील मनाची तुष्टी
सावकाशीने करा भोजन, मारा आडवा हात
पुरणपोळी कधी बिर्याणी वा कधी साखरभात
तांबूल सेवन नित्य असावे, कधी मसाला पट्टी
वामकुक्षीला नका अंतरू, करा तिच्याशी गट्टी
३. निरोप तुझा घेताना
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मन लोचनी
निरोप तुझा घेताना बघते मागे वळुनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरूनी
निरोप तुझा घेताना मिटते मी पापणी
अंधार ही येई तेव्हा चेहेरा तुझाच घेऊनी
निरोप तुझा घेताना पाऊस गातो गाणे
चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाते
४. दिवसामागून दिवस सरले
दिवसामागून दिवस सरले
अनेक वर्षे सहज सरले
दिवस उजाडला निरोपाचा
आता सारे काही आठवणीत उरले
बांधून घेऊ जगलेले
क्षण सारे गोड मनाशी
गाठू सारे उत्तुंग यश शिखरे
झेप घेऊनी आकाशी
– विवेक र. उरकडे
५. निरोप नकोसा वाटतो
उडतील थवे पाखरांचे भूर भूर
झेप घेण्या मोकळ्या आकाशात दूर दूर
सोडून घरटे जाता जीव कासावीस होतो
दाटून कंठ येतो डोळ्यात स्वर्ग साठतो
निरोप हा नकोसा वाटतो… नकोसा वाटतो..
जयंत रेवडेकर
Farewell Quotes In Marathi For Friend | जीवलग मित्रांसाठी निरोप संदेश
मित्रमैत्रिणींना आपल्या जीवनात एक अढळ स्थान असतं. मात्र दहावीच्या वर्गातून बाहेर पडल्यापासून अनेक वेळा आपल्याला अशा जीवलगांना निरोप द्यावा लागतो. त्यासाठी काही भावनिक शुभेच्छा संदेश (Farewell Message In Marathi)
१. आता कुणाला बोलू हॅलो आणि कुणाला बोलू हाय
माझ्या प्रत्येक टेंशनवर उपाय होती तुझ्यासोबत घेतलेली चाय
आता जातोयस पण पुन्हा लवकरच आपण भेटणार हाय
म्हणूनच टपरीवरची चाय घेत करतो तुला बाय बाय
२. सहकारी नाही तर मित्र म्हणून पाठीशी उभा राहिलास
आता तुझ्या आयुष्याची नवी पहाट होतो आहे…
नवीन प्रवासासाठी खूप मनापासून शुभेच्छा
३. कधी कधी कोण जाणे
वेळ देखील फितूर होते
नव्याने वसणारे गाव
डोळ्यांसमोर वाहत जाते
४. तुझी माझी दोस्ती
फक्त चार दिसाची नक्कीच नाही
आता तु जा पण तुला मी कधीच सोडणार नाही
नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा
५. शाळेत जेव्हा पहिल्यांदा भेटलास
तेव्हा वाटलं तुझं माझं जमणार नाही
पण आता शाळा सोडून चालला आहेस
तर असं वाटतंय तुझ्याशिवाय जगणं जमणार नाही
६.निरोप तुला देताना
डोळ्यात जीव आला
असं का झाले
ते मलादेखील नाही उमजले
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!
७. सगळ्या गोष्टी मला
सोप्या वाटतात
फक्त निरोप घेणंच
खूप कठीण जातं.
८. माहीत नाही का पण आज मला खूप रडायचं होतं
तु गेल्यावर आठवण तुझी सतत येईल हे बहुतेक सांगायचं होतं
९. मैत्रीचे धागे इतके कच्चे नक्कीच नाहीत की एका फेअरवेलने तुटून जातील
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
१०. तुला भेटून फेअरवेल करणं कदाचित मला जमणार नाही… तुला बघताच भावनांचा बांध कोसळेल. म्हणून न भेटताच बाय बोलत आहे. पण पुन्हा नक्की भेटू.. तु परत आल्यावर
Farewell Wishes In Marathi For Teachers | गुरूजनांसाठी निरोप शुभेच्छा संदेश
शाळा सोडताना आपल्याला आपल्या गुरूजनांना निरोप द्यावा लागतो. कधी कधी त्यांच्या सेवानिवृत्ती मुळे ते आपला निरोप घेतात. अशा वेळी गुरूजनांना द्या हे शुभेच्छा संदेश
१. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा
२. शालेय जीवनाचा काळ कसा भुर्रकन निघून गेला ते कळलंच नाही… पण तुम्ही दिलेल्या ज्ञानाची शिदोरी कायम जवळ राहील
३. उद्या तुम्ही आमच्यासोबत नसाल याची खंत आहे
आदराने लक्षात ठेवावे असं तुम्ही मनातलं गाव आहे
तुमच्या सेवानिवृत्तीसाठी मनपूर्वक शुभेच्छा!
४. तुमच्या रिटायर्डमेंटचा अर्थ असा होतो की जीवनाच्या व्यासपीठावर शिक्षक म्हणून आता मोठं प्रमोशन मिळालं आहे
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा !
५. आपल्याला मिळणाऱ्या नव्या स्वातंत्र्यासाठी आणि भविष्य आनंदाने घालवण्यासाठी आम्हा सर्वांकडून आमच्या लाडक्या सरांना खूप खूप शुभेच्छा
६. रिटायर्ड होणे म्हणजे आपण कामासाठी जगणे थांबवतो आणि जगण्यासाठी काम सुरू करतो..अशा तुमच्या नवीन जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम
७. ध्येयावर लक्ष ठेवून चालणारी व्यक्ती नेहमीच यशस्वी होते… तुमच्या पुढील सर्व ध्येयांसाठी मनापासून शुभेच्छा
८. शाळा म्हणजे मंदीर आणि तुम्ही तिचे पुजारी
उद्यापासून कोण भरणार आमच्या ज्ञानाची शिदोरी
९.आज जरी तुम्ही निवृत्त होत असलात
तरी तुमची शिकवण आणि उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
१०. प्रिय बाई, तुम्ही शिकवलेल्या प्रत्येक शिकवणीसाठी आणि संस्कारासाठी आम्ही तुमचे सदैव कृतज्ञ राहू… तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Farewell Message In Marathi For Boss | ऑफिसमधल्या बॉससाठी निरोप शुभेच्छा संदेश
ऑफिसमधील बॉस अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांची तुमच्या प्रगतीमध्ये नक्कीच मोलाची मदत झालेली असते. अशा सहकार्याने वागणाऱ्या बॉसला निरोप देणं नक्कीच सोपं नाही. मात्र तुम्ही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नक्कीच देऊ शकता.
१. काम करायचं आहे तुमच्यासारखं
निघून इथून जाताना
गहिरावे सारे जग
निरोपदेखील घेताना
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा !
२.आपण निरोप घेताय, सेवानिवृत्त होताय
हे अगदी खरं आहे
मात्र तुमचं आमचं नातं सदैव अबाधित राहील
तुमच्या सहवासात घालवलेले क्षण
आजही आमच्या मनात रुंजी घातल आहेत
तुमचा स्वभाव, तुमचं वागणं
आम्हाला सतत आठवत राहील
तुमचं पुढील आयुष्य असंच सुखसमाधानाचं जावो… हिच शुभेच्छा !
३.प्रवासाचे प्लॅन तुम्ही आधीच आखुन ठेवले असतील
मस्त जीवनाचा आनंद लुटत सेवानिवृत्तीची मजा घ्या
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा !
४.मस्त मजेचे आयुष्य
गाडी थांबली वळणावर
विश्रांती घ्यायची आहे तुम्ही
सेवानिवृत्त झाल्यावर
सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!
५.तुम्ही होता म्हणून सगळे प्रश्न सहज सुटत होते
सगळी कामे नियोजितपणे होत होती
आता तुम्ही सेवानिवृत्त होताय… पण आम्हाला तुमची सोबत कायम स्मरणात राहील
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा !
६.सेवानिवृत्ती छे छे ! ही तर आहे क्षणभर विश्रांती !!
मनाप्रमाणे जगण्याची घ्या आता अनुभूती…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
७.जीवनातला वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा
सवे घेऊन प्रियजनांना आठवणीने भरला घडा
सेवानिवृत्तीच्या मनापासून शुभेच्छा!
८.उशीर झाला, गाडी जाईल. डबा आता नसणार
या सर्वांना बगल देत नवे आयुष्य फुलणार
सेवानिवृत्तीसाठी हार्दिक शुभेच्छा!
९. सहकाऱ्यांची साथ आणि शब्दरूपी भावना
आरोग्य आणि धनसंपदा तुम्हाला लाभो हिच मनापासून शुभकामना !
१०.सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही
आपल्या लोकांमध्ये जाणार आहात
वाईट वाटुन घेऊन नका आठवणी
आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
पुढे वाचा –