मेथीची भाजी तशी तर आपल्याला वर्षभर बाजारात दिसते. पण थंडीमध्ये मेथी खाण्याची मजाच काही वेगळी आहे. मेथीच्या दाण्यांचा उपयोग वजन कमी करण्यासाठी केला जातोच. मेथीचाही उपयोग करता येतो. मेथीच्या पानापासून अनेक रेसिपी तयार करण्यात येतात. मेथीची भाजी, मेथीची भजी, मेथीचे मुठिया, मेथीची कढी अशा अनेक रेसिपी आपल्याला खायला मिळतात. पण साधारणतः सर्व घरांमध्ये मेथीची भाजी खाण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. मेथीची भाजी थोडीशी कडवट लागली तरीही चवीला खूपच मस्त लागते. तसंच ही भाजी बनवणेदेखील खूपच सोपे असते. इतकंच नाही तर ही बनविण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. मात्र मेथीची भाजी स्वच्छ करताना अर्थात ती निवडताना खूपच त्रास होतो असा अनेकांचा सूर दिसून येतो. मेथीची पाने स्वच्छ करण्यासाठी आणि कापण्यासाठी खूपच वेळ लागतो. तसंच मेथी स्वच्छ करताना हातही काळे होतात, त्यामुळे काही जणांना मेथी स्वच्छ करायला आवडतही नाही. इतकंच नाही तर मेथीची भाजी स्वच्छ करताना वेळ लागल्यामुळे भाजी बनवायलाही काही जणांना उशीर होतो. त्यामुळे मेथीची भाजी स्वच्छ करताना काय सोपी ट्रिक वापरली तर पटकन काम होऊ शकते याबाबत काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.
मेथीची भाजी कापण्याची, स्वच्छ करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया आपण स्टेप्सप्रमाणे –
स्टेप 1
सर्वात पहिले तुम्ही ताजा मेथीचा जुडा आपल्या हातात घ्या. जर तुम्हाला मेथीचा जुडा खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही सर्वात पहिले हा जुडा एका दोरीने बांधून घ्या. आता एका धारदार चाकूच्या मदतीने मेथीचे देठ कापून घ्या. यादरम्यान मेथीची काही पानेदेखील कदाचित निघू शकतात. ती तुम्ही तुम्हाला हवी तर काढून घ्या आणि नंतर निवडा. पण सर्वात आधी तुम्ही हे देठ कापणे गरजेचे आहे. कधी कधी याला मातीही लागलेली असते. त्यामुळे तुम्ही माती बघूनच हे कापून घ्या आणि नंतर व्यवस्थित धुवा.
स्टेप 2 –
यानंतर तुम्ही पुढचे पाऊल उचला आणि ते म्हणजे तुम्ही मेथीचा हा जुडगा उघडा आणि त्याचे लहान लहान जुडे बनवा. यामुळे तुम्हाला मेथीची भाजी कापणे अधिक सोपे होते. असे लहान जुडे बनविल्यानंतर तुम्ही मेथीची पाने सहजरित्या बारीक कापू शकता. तुम्हाला कापताना अडचण येणार नाही.
स्टेप 3 –
जेव्हा तुम्ही मेथीची पाने सर्व व्यवस्थित बारीक कापून घ्याल, तेव्हा सर्वात पहिले तुम्ही मोठ्या जुड्यातील पाने तुम्ही काढून घ्या. असं केल्याने तुम्हाला मेथीचा जुडा स्वच्छ करण्यासाठी वेळ लागणार नाही. पाने काढताना या गोष्टीचीही काळजी घ्या की, जर काही पाने पिवळी असतील तर त्या पानांचा वापर करू नका.
स्टेप 4 –
आता तुम्ही बारीक कापलेली मेथी स्वच्छ पाण्याने धुवा. मेथीच्या पानांमध्ये अधिक माती असते. त्यामुळे पाण्याने मेथी स्वच्छ करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही 2-3 वेळा मेथीची पाने स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि मीठ घालून तुम्ही उकळून घ्या. आता पाण्यामध्ये धुतलेली मेथीचे पाने केवळ 2 मिनिट्समध्ये ठेवा आणि मग पाणी काढून टाका. असं केल्यामुळे मेथीची पाने अगदी स्वच्छ होतात.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मेथीची भाजी करणार असाल आणि तुम्हाला मेथीची पाने व्यवस्थित कापून हवी असतील तर तुम्ही एक एक मेथीची पाने काढू नका. तर या ट्रिक्सचा तुम्ही वापर करा. तुमची मेथीची भाजी पटकन कापून होईल आणि ही भाजी बनवायला वेळही लागणार नाही. तसंच तुम्ही मेथी कापताना तुमच्या हातामध्ये ग्लव्ह्जचा वापर करावा. जेणेकरून तुमचे हात काळे होणार नाहीत. केवळ मेथीच नाही तर मेथीचे दाणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. मेथीच्या दाण्याच्या उपयोग करून मधुमेहदेखील आटोक्यात आणता येतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक