ADVERTISEMENT
home / आरोग्य
food not to eat with tea in marathi

चहासोबत खाऊ नका या गोष्टी, आरोग्यासाठी आहेत हानिकारक

चहा म्हणजे अमृततुल्य पेय… चहा पिण्यामुळे फ्रेश वाटतं म्हणून चहाप्रेमी चहासाठी कधीही तयार असतात. दिवसांची सुरूवातच अनेकजण चहाने करतात, याशिवाय पाऊस पडतो आहे म्हणून, खूप वेळ काम केल्याचा कंटाळा घालवण्यासाठी, तरीतरीत वाटावं म्हणून असा कोणत्याही कारणासाठी चहा हवाच असतो. मात्र काही जणांना चहासोबत काही गोष्टी खाण्याची सवय असते. काही जण चहासोबत बिस्किट खातात तर काहींना मस्त कांदा भजीचा बेत हवा असतो. यासाठीच जाणून घ्या चहासोबत कोणते पदार्थ खाणं आरोग्यासाठी हिताचं नाही. जाणून घ्या चहा पिण्याचे फायदे | Tea Benefits In Marathi, आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, आरोग्यदायी गुळाचा चहा पिण्याचे फायदे | Gulacha Chaha Che Fayde

थंड पेय

चहा घेतल्यावर लगेच जर तुम्ही थंड पेय प्यायला तर तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी चहावर अगदी पाणीदेखील पिऊ नये असं मोठी माणसं नेहमी सांगतात. कारण गरम पेयावर लगेच थंड पेय प्यायल्यामुळे पचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते. असं केल्याने तुम्हाला उलटी, अपचनाचा त्रास होऊ शकतो. यासाठी चहा घेतल्यावर कमीत कमी अर्धा तास पाणी अथवा थंड पेय पिऊ नका. 

बेसनाचे पदार्थ

चहा आणि भजी एक भन्नाट कॉंबिनेशन आहे. भारतात पावसाळ्यात घरोघरी कांदा भजी आणि चहाचा बेत ठरलेला असतो. मात्र आरोग्यतज्ञ्जांनुसार बेसनाच्या कोणत्याही पदार्थासोबत चहाचे सेवन करू नये. कारण यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. असं झालं तर तुमचं शरीर पोषक मुल्ये शोषून घेण्यास असक्षम ठरतात. यासाठी चहा आणि भजीचा बेत करताय तर वेळीच सावध व्हा.

चहा आणि मैद्याचे पदार्थ

चहासोबत घरोघरी बिस्किट, खारी असे पदार्थ खाल्ले जातात. बिस्किटांमध्ये मैदा भरपूर प्रमाणात असतो. मैद्याचे पदार्थ चहासोबत खाल्ले तर तुमची पचनसंस्था मंदावते. मैदा मुळातच पचण्यासाठी जड असतो. म्हणूनच मैदाचे पदार्थ चहासोबत खाऊ नये. 

ADVERTISEMENT

चहात लिंबू पिळणे

लेमन टी हा एक लोकप्रिय चहाचा प्रकार आहे. बऱ्याच लोकांना कोऱ्या चहात लिंबू पिळून पिण्याची सवय असते. असं केल्याने वजन कमी होतं असा समज आहे. मात्र चहामध्ये लिंबू पिळण्यामुळे त्यातून अम्लीय पदार्थ तयार होतात. असे पदार्थ शरीरात गेल्यामुळे शरीरावर सूज येणे अथवा त्वचेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 

सुकामेवा

घरी पाहुणे मंडळी आली की चहासोबत सुकामेवा त्यांच्या पुढ्यात ठेवला जातो. पाहुण्यांना सुकामेवा देणे हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे. मात्र यासाठी चहासोबत सुकामेवा खाऊ नये. कारण दुधाच्या चहासोबत जर तुम्ही लोह असलेले सुकामेव्याचे पदार्थ खाल्ले तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT