ADVERTISEMENT
home / Periods
पीसीओएस केवळ एकाच प्रकारचा नसतो. जाणून घ्या पीसीओएसचे प्रकार

पीसीओएस केवळ एकाच प्रकारचा नसतो. जाणून घ्या पीसीओएसचे प्रकार

पीसीओडीमुळे वजन वाढते आणि जिम मध्ये कितीही तास घाम गाळला तरी स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल स्रवल्यामुळे वजन कमी होत नाही म्हणून पीसीओडी वाढत जातो असे हे दुष्टचक्र आहे. आहारात  बदल, स्लो वेटेड वर्कआउट्स, चालणे, पळणे किंवा पोहणे असा व्यायाम, मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करणे असे केल्यास आपण पीसीओडी आटोक्यात ठेवू शकतो. गर्भनिरोधक गोळ्या, मेटफोर्मीन वगैरे औषधे डॉक्टर देतात परंतु त्याचे खूप साईड इफेक्टस होतात. काही तज्ज्ञ Ovasitol चा पर्याय देखील सुचवतात.पण ते आपापल्या डॉक्टरांच्याच सल्ल्यानेच घ्यावे. कारण पीसीओएस केवळ एकाच प्रकारचा नसतो. पीसीओएसचे काही प्रकार आहेत. 

जगातील जवळपास 10% महिला पीसीओडीने ग्रस्त आहेत. PCOD च्या तुलनेत PCOS असलेल्या महिलांच्या शरीरात मेल हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात.  या हॉर्मोनल असंतुलनामुळे स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते व गरोदर राहण्यात अनंत अडचणी येतात. यामुळे हॉर्मोनल असंतुलन तर होतेच पण मधुमेह,वंध्यत्व, ऍक्ने, भयंकर केसगळती होऊन टक्कल पडणे तसेच शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे हे त्रास देखील सुरु होतात. स्त्रियांना पीसीओडी किंवा पीसीओएस असणे हे हल्ली सामान्य झाले आहे पण यावर अजून तरी अचूक उपचार उपलब्ध नाहीत. तुम्हालाही जर हा त्रास असेल तर तुमचा पीसीओएस नेमक्या कुठल्या प्रकारात मोडतो ते जाणून घ्या. 

पीसीओडीचे चार प्रकार आहेत

इंसुलिन रेझिस्टन्स पीसीओएस

तज्ञांच्या मते पीसीओएसने ग्रस्त 70 टक्के स्त्रियांमध्ये या प्रकारचा पीसीओएस आढळतो. हॉर्मोनल असंतुलनाचा शरीरातील पेशींवर परिणाम झाल्याने इन्सुलिनोमा नावाची स्थिती उद्भवते ज्यामुळे या प्रकारचा PCOS होतो. शरीरातील पेशींवर इन्सुलिनचा परिणाम होत नाही. यामुळे पोटाचे घेर वाढणे, गोड खाण्याची तीव्र इच्छा आणि थकवा ही या पीसीओएसची लक्षणे आहेत. यावर उपचार करण्यासाठी नियमित व्यायाम उपयुक्त ठरतो. जास्त साखर असलेले अन्न टाळावे आणि संतुलित आहार घ्यावा. इन्सुलिनची लेव्हल योग्य ठेवण्यासाठी शारीरिक व मानसिक  तणाव कमी करा आणि चांगली झोप घ्या.  मॅग्नेशियम, क्रोमियम, एनएसी (N-acetyl cysteine) आणि इनॉसिटॉल हे डॉक्टरांच्या घेतले तर चांगला फरक पडतो.

अधिक वाचा लॉकडाऊन कालावधीत पीसीओएसच्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ

ADVERTISEMENT

एड्रेनल पीसीओएस

तुम्हीे जर खूप गंभीर तणावाला सामोरे जात असल्यास या प्रकारच्या पीसीओएसचा त्रास होण्याची शक्यता आहे. रक्तात स्ट्रेस हॉर्मोन  कोर्टिसोल आणि DHEA (dehydroepiandrosterone sulfate) ची वाढलेली पातळी दिसल्यास या प्रकारच्या पीसीओएसचे निदान केले जाते. योग, ध्यान, चांगली झोप व संतुलित आहार याद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्यास या प्रकारचा पीसीओएस आपण मॅनेज करू  शकतो. तणाव कमी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास उत्तम! तसेच जास्त तीव्रतेचा व्यायाम करणे टाळा. आहारात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 5 आणि व्हिटॅमिन सी घेतल्यास चांगला फरक दिसून येतो.  

अधिक वाचा पीसीओएस या आजारावर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान

इंफ्लेमेटरी पीसीओएस  

असंतुलित आहार आणि खराब जीवनशैलीमुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे या प्रकारचा PCOS  होतो. जास्त प्रमाणात असलेले सी रीऍक्टिव प्रोटीन,  डोकेदुखी,  थकवा, एक्जिमा सारख्या त्वचेच्या समस्या ही याची लक्षणे आहेत.संतुलित पौष्टिक आहार घेऊन पोटाचे आरोग्य चांगले ठेवणे तसेच  हळद, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् आणि NAC सारख्या अँटिऑक्सिडंट्स सारख्या गोष्टी आहार ठेवणे या पीसीओएससाठी उपयुक्त ठरते.

पोस्ट-पिल पीसीओएस

या प्रकारचा पीसीओएस गर्भनिरोधक गोळ्या घेणे थांबवल्यानंतर होतो. कृत्रिम प्रोजेस्टेरॉनमुळे ओव्हरीजचे कार्य बिनसते आणि यामुळे पीसीओएस होऊ शकतो. गोळ्या घेतल्याने लक्षणे तात्पुरती थांबू शकतात परंतु एकदा गोळ्या बंद केल्यानंतर पुन्हा त्रास उद्भवू शकतो.चांगली झोप आणि तणावाचे व्यवस्थापन तसेच मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 सारखे पोषक घटक उपयोगी ठरतात.  

ADVERTISEMENT

पीसीओडीचा (PCOD) त्रास असेल तर या गोष्टी माहीत असायलाच हव्यातच

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

08 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT