आजकाल अनेक महिलांना (Hormonal Imbalance In Marathi) हॉर्मोन्स असंतुलनची समस्या दिसून येते. निरोगी आरोग्यासाठी होर्मोन्स नियंत्रित राहणे फार गरजेचे आहे. हॉर्मोन्सचे असंतुलन ही एक सायलेंट किलर समस्या आहे. कारण याचे परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर जाणवू लागतात. महिलांमध्ये या समस्येची अनेक लक्षणे दिसून येतात. मूड स्विंग, चिडचिडा स्वभाव, चेहऱ्यावर केस येणं, पिंपल्स येणं, अंग दुखणं, काम करण्याचा कंटाळा येणं, आळस येणं, दिवसभर निराश वाटणं, सेक्सची इच्छा नसणं ही या समस्येची लक्षणे असू शकता. वास्तविक महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्यांना हॉर्मोन्समधील बदलांना सामोरं जावंच लागतं. पौगंडावस्था, मासिक पाळी, गर्भधारणा, मॅनोपॉज अशा अनेक अवस्था महिलांच्या आयुष्यात येत असतात. या अवस्था पार पडल्यावर हॉर्मोन्स पुन्हा नैसर्गिकरित्या नियंत्रित होत असतात. मात्र सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक महिलांना हॉर्मोनल इमबॅलेंस या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. कामाचा ताण, चुकीची जीवनशैली, काही विशिष्ठ आजार ही यामागची कारणे असू शकतात.
यासाठी याबाबत काही गोष्टी स्त्री आणि पुरूष दोघांनाही माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण योग्य उपचार आणि जोडीदाराची साथ असेल तर कोणतीही आरोग्य समस्या सोडवणं महिलांना सोपं जावू शकतं.
हॉर्मोन्सचे असंतुलन म्हणजे काय
हॉर्मोन्स असंतुलन होण्याची कारणे
जीवनशैलीमध्ये हे थोडेसे बदल करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता
हॉर्मोन्स म्हणजे शरीरात स्त्रवणारे अंतःस्त्राव. आपल्या शरीरात अनेक हॉर्मोन्स निर्माण होत असतात ज्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत सुरू असते. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ हॉर्मोन्समुळे नीट चालत असते. सेक्स हॉर्मोन्सचा आपल्या जननेद्रिंयावर परिणाम होत असतो. जेव्हा हॉर्मोन्सचे कार्य अनियंत्रित होते तेव्हा निरनिराळ्या आरोग्य समस्या निर्माण होतात. हॉर्मोन्सचे कार्य बिघडण्यालाच हॉर्मोनल इमबॅलेंस असं म्हणतात.
पु्ण्यातील General Practitioner And Yoga Consultant डॉ. विद्या जोशी (MBBS) यांच्यामते महिलांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर हॉर्मोन्स संतुलित असणे गरजेचे आहे. मात्र काही कारणांमुळे जेव्हा हे हॉर्मोन्स असतुंलित होतात तेव्हा महिलांना PCOS, PMS, अर्ली मॅनोपॉज अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. एस्ट्रोजन (estrogen) च्या कमतरतेमुळे त्यांना थकवा, चिडचिड, नैराश्य अशा समस्या निर्माण होऊ शकतात. जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल आणि योग्य आहार घेऊन तुम्ही तुमचे जीवन निरोगी करू शकता. थोडक्यात महिला दिनानिमित्त Balance Your Hormones & Balance Your Life असा आरोग्य मंत्र त्यांनी सर्व महिलांना दिला आहे.
महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होण्याची अनेक कारणे आहेत. शिवाय वयाच्या प्रत्येक टप्पावर ही कारणे वेगळी असू शकतात. जर तुम्हाला वेळेआधीच दहा ते पंधरा दिवस मासिक पाळी येत असेल, उशीरा मासिक पाळी येत असेल तर तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल झाले असण्याची शक्यता आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
काही महिलांच्या चेहऱ्यावर दाट केस येतात. हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तुमच्या अंगावर केस येण्याची शक्यता आहे. काही वेळा यामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी अधिक सक्रीय होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. अशी लक्षणे जाणवल्यास तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
हॉर्मोनल बदलांमुळे तुम्हाला सतत आळसवाणं आणि कंटाळवाणं वाटू शकतं. जर तुम्हाला शरीर जड झाल्यासारखं आणि काम करण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्या डॉक्टरांना याबाबत त्वरीत सांगा. प्रोजेस्टेरॉन आणि थायरॉईड ग्रंथीच्या अकार्यक्षमेतेमुळे तुमच्या शरीरात हे बदल जाणवत असतात.
शरीरातील हॉर्मोन्सच्या बदलांमुळे तुमच्या स्वभावात बदल होतो. यामुळे तुमचा मूड सतत बदलत राहण्याची शक्यता असते. चीडचीड वाढल्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात.
वजन वाढणं ही आजकाल प्रत्येकाची समस्या झाली आहे. पण जर तुमचं वजन अचानक वाढलं असेल तर त्यामागे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सचे असतुंलन हे देखील एक कारण असू शकतं.
हॉर्मोनल बदलांमुळे तुमच्या भुकेवर विपरित परिणाम होत असतो. हॉर्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे कधी कधी अती भुक लागणे तर कधी कधी खाण्याची इच्छा न होणे ही दोन्ही लक्षणे दिसू शकतात.
शरीरात झालेल्या हॉर्मोन्सच्या बदलांमुळे तुमचा लिबीडो कमी होण्याची शक्यता असते. यामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते. ज्याचा विपरित परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर पडू शकतो.
हॉर्मोनल बदलांमुळे महिलांना वेळेआधीच रजोनिवृत्ती येऊ शकते. रजोनिवृत्ती अथवा मॅनोपॉज म्हणजे नैसर्गिकरित्या मासिक पाळी बंद होणे. सामान्यत: महिलांना चाळीस ते पन्नास या वयात मॅनोपॉजला सामोरं जावं लागतं. मात्र आजकाल बदलती जीवनशैली आणि हॉर्मोन्समध्ये होणारे असतुंलन यामुळे अर्ली मॅनोपॉज ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे कमी वयात रजोनिवृत्ती येण्याची समस्या सध्या महिलांना भेडसावत आहे.
हॉर्मोनल बदलांमुळे तुमच्या प्रजनन शक्तीवर विपरित परिणाम होतो. अनेक महिलांना हॉर्मोनल बदलांमुळे वंधत्वाला सामोरं जावं लागू शकतं.
आजकाल जीवनशैली वेगाने बदलत आहे. कामाचा ताण – तणाव, कौटुंबिक समस्या, दैनंदिन जीवनात येणारी आव्हानं यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
कामाचा ताण आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे संपूर्ण जीवनशैलीत बदल झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत काम करणं, सतत कंप्युटरवर काम करणं यामुळे तुम्ही पुरेशी झोप घेत नाही. निरोगी आरोग्यासाठी कमीतकमी रात्री आठ तास झोप घेणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर त्याचा विपरित परिणाम तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीवर होतो. सहाजिकच त्यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये असतुंलन निर्माण होते.
संतुलित आहार हा निरोगी जीवनाचा मुलमंत्र आहे. मात्र आजकाल जगाच्या वेगाने धावतान योग्य आहाराकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. सतत जंक फूड आणि पॅक्ड फूड खाण्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो. तसंच पाळी लवकर येण्यासाठी उपाय केले जातात. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल होतो.
नैराश्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चुकीचा परिणाम होत असतो. कारण तुमच्या मनःस्थितीचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर त्वरीत परिणा्म दिसू लागतो. निराशाग्रस्त असल्यास तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सची निर्मिती कमी होते. ज्यामुळे तुम्हाला हॉर्मोनल इंमबॅलेंसला सामोरं जावं लागू शकतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणे आढळल्यास तुमच्या डॉक्टरांचा त्वरीत सल्ला घ्या. काही वैद्यकीय टेस्ट करून तुम्हाला या हॉर्मोलन बदलांची कारणे कळू शकतील. डॉक्टर तुम्हाला शरीरातील हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत करण्यासाठी आवश्यक औषधे अथवा हॉर्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी घेण्याचा सल्ला देतील. जीवनशैलीमध्ये बदल, नॅचरल थेरपी, योगासने, ध्यानधारणा करूनही तुम्ही हॉर्मोन्स संतुलित करू शकता.
शरीरात हॉर्मोन्समध्ये झालेले बदल सुधारण्यासाठी हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देण्यात येते. महिलांमध्ये मॅनोपॉजमध्ये होणारे बदल अथवा इतर आरोग्य समस्यांमुळे कधीकधी महिलांचे अंडाशय काढून टाकावे लागते. अशा वेळी त्यांच्या शरीरात एस्ट्रोजन (estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (progesterone) हे हॉर्मोन्स पुरेश्या प्रमाणात निर्माण होत नाहीत. एस्ट्रोजन (estrogen) प्रमाण वाढल्यास त्यांना डिप्रेशन, चिंता, झोप न येणं या समस्या निर्माण होतात. थायरॉईड ग्रंथीचे कार्य बिघडल्यामुळे महिलांना सतत आळसवाणं वाटत राहतं. शिवाय साखरेचे पदार्थ खाण्याची ईच्छा वाढते आणि वजन वाढू लागते. अशा महिलांना हॉर्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी घेण्याची गरज असते.
नियमित व्यायाम आणि योगासने करा ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहील. व्यायामामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत चालते.
हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुम्ही योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे. यासाठी सेंद्रिय धान्य, फळे, ताज्या भाज्या यांचा आहारात समावेश करा. आहारातून मीठ आणि साखर कमी करा. जेवणात वरून मीठ टाकल्यामुळे अथवा चिप्स अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ अतीप्रमाणात खाल्यामुळे शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो. आहारात व्हिटॅमिन Ca,B12, D3 या सप्लीमेंटचे प्रमाण वाढवा.
दिवसभरात कमीतकमी आठ तास झोप घ्या ज्यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटेल. अपुऱ्या झोपेमुळे तुमचे आरोग्य बिघडते. शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी दररोज वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठा.
जीवनशैलीत थोडे बदल करून आपलं आरोग्य नक्कीच सुधारता येऊ शकतं. यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा आणि निरोगी राहण्यासाठी आम्ही सांगितलेले बदल करा. व्यायाम, सतुंलित आहार, सकारात्मक विचारशैली, पुरेशी झोप, ताण-तणावापासून दूर राहून तुम्ही तुमचं जीवन आनंदात जगू शकता. लक्षात ठेवा जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे त्यामुळे निरोगी रहा आणि जगण्यातील खरा आनंद घ्या.