ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
fruits-that-will-revitalize-and-energize-your-skin

तुमच्या त्वचेला अधिक तजेलदार बनवतात ही फळं, खायलाच हवीत

फळे ही फक्त खायलाच रूचकर असतात असे नाही तर तुमच्या त्वचेसाठीही याचा अत्यंत चांगला फायदा होतो. फळांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात, ज्यामध्ये शक्तीशाली अँटिऑक्सिडंट असतात, जे त्वचेला जळजळ आणि अन्य प्रदूषणापासून दूर राखण्यासाठी मदत करतात. फळांमध्ये नैसर्गिक गोष्टी अधिक प्रमाणात असल्यामुळे आपल्या त्वचेला आतून दुरूस्त करण्याचे आणि नैसर्गिकरित्या अधिक तजेलदार ठेवण्याचे काम फळं करतात. यामुळे चेहऱ्यावर वयाच्या आत सुरकुत्या येणे, म्हातारपण दिसून येणे अथवा त्वचेवर भेगा पडणे यासारख्या समस्या दूर राहण्यास मदत मिळते. त्वचा अधिक तरूण आणि तजेलदार राहण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात काही ठराविक फळांचा तर वापर करून घ्यायलाच हवा. आम्ही इथे अशा काही फळांची माहिती देत आहोत, जी तुम्हाला तुमची त्वचा अधिक चांगली राखण्यासाठी मदत करतात.  याबाबत ‘झामा ऑर्गेनिक्स’ च्या श्रिया नाहेता वाधवा यांनी सांगितले की, ‘आपल्या त्वचा आणि केसांसाठी तसंच शरीराला आतून अधिक चांगले राखण्यासाठी आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य खाणे शरीरात जाणे अत्यंत आवश्यक आहे. फळे आणि त्याहीपेक्षा हंगामी फळे ही आपल्या शरीरासाठी अधिक पोषक ठरतात. त्यामुळे त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते. 

केळी (Bananas)

Zama Organics

केळी हे सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. प्रत्येक घरात केळं हे फळ खाण्यात येतेच. केळीच नाही तर अगदी केळ्याची सालही त्वचेसाठी फायदेशीर ठरते. केळ्याच्या सालीमध्ये त्वचेला तजेलदारपणा देणारे अनेक गुणधर्म आढळतात. केळीची साल फक्त त्वचेवर चोळली तर सुरकुत्या कमी होऊन त्वचा अधिक हायड्रेट होते आणि त्वचा उजळण्यास मदत मिळते. याशिवाय चेहऱ्यावरील मुरूमं, मस्से आणि सोरायसिससारख्या समस्यांवर केळीची साल लावणे हा उत्तम उपाय ठरतो. 

पिंक पॅशन फ्रूट (Passion Fruit) 

Zama Organics

लहान आकार असणारे हे असे पॅशन फ्रूट म्हणजे विटामिन ए आणि विटामिन सी चा खजिना. पौष्टिक आहारामध्ये या फळाचा समावेश करून घ्यायला हवा. त्वचेसाठी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. हे फळ अँटिऑक्सिडंटने समृद्ध असून शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि त्वचेचे संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो. एका संशोधनानुसार, पॅशन फ्रूटचा अर्क सेवन केल्याने 4-8 आठवड्यातच त्वचेचे हायड्रेशन हे लक्षणीयरित्या सुधारले आहे. तसंच थकवा येत असेल तर त्यासाठीदेखील या फळाचा उपयोग होतो. 

रासबेरीज (Raspberries)

Zama Organics

या रसाळ लाल आणि काळ्या बेरींमध्ये अल्फा हायड्रॉक्सिल असिड असून संवेदनशील असणाऱ्या त्वचेसाठी हे फळ उत्तम आहे. त्वचेवर जळजळ होत असल्यास अथवा हातावर पुरळ येत असल्यास, या फळाचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करून घ्या. त्वचेच्या समस्येवर रासबेरी उत्तम असून त्वचेवरील काळे डाग काढण्याचे आणि सुरकुत्या हटविण्याचे कामही यामुळे चांगले होते. तसंच वृद्धात्वाची लक्षणे त्वचेवर दिसत असतील तर तुम्ही रासबेरी खायला हवे. त्वचा चमकदार आणि निरोगी दिसण्यासाठी तसंच UV किरणांपासून संरक्षण करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

पपई (Papaya)

Zama Organics

पपई त्वचेसाठी उत्तम फळ आहे हे अनेकांनी सांगितलेले आहे. पपईमध्ये एंजाईम असते जे त्वचेसाठी अत्यंत उत्तम असते. पपई हा अँटिएजिंग फेसमास्कसाठी उत्तम आहे. यामुळे त्वचेची लवचिकता वाढते आणि हायड्रेशन उत्तम राखण्यास मदत मिळते. पपईमधील त्वचेच्या संरक्षणासाठी असणारे गुणधर्म आणि अँटिऑक्सिजन हे चेहऱ्यावरील मुरूमं काढून टाकणे, जळजळ कमी करणे आणि टॅन काढून टाकण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. तसंच कोरड्या त्वचेसाठी पपई ही अत्यंत उपयुक्त ठरते. 

अव्होकाडो (Avocado)

Zama Organics

अव्होकाडो या फळामध्ये विटामिन सी आणि ई हे भरपूर प्रमाणात आढळते. याचा त्वचेसाठी चांगला उपयोग करून घेता येतो. फळांमधील आरोग्यदायी स्निग्धांश हे एक्झिमा आणि मुरूमांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.  ज्या व्यक्तींना त्वचेवर ब्रेकआऊट होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी हे फळ अधिक उपयुक्त ठरते. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास अधिक मदत होते. तसंच त्वचेचे हायड्रेशन आणि लवचिकताही चांगली होते. 

डाळिंब (Pomegranate)

Zama Organics

डाळिंबामध्ये विटामिन सी असून हे एक उत्तम अँटिऑक्सिटंड आहे. डाळिंबाचा वापर हा त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही करू शकता. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे काम डाळिंब करते. तसंच चेहऱ्यावर जळजळ होत असल्यास, डाळिंब हे फायदेशीर ठरते. डाळिंबाची बी ही अतिशय उपयुक्त एक्सपोलिएटिंग एजंट आहेत. त्यामुळे त्वचा अधिक तरूण दिसण्यास आणि तजेलदार दिसण्यास याची मदत मिळते. 

दिवसातून तुम्ही नियमित एक ते दोन फळांचे सेवन करायला हवे. आहाराबरोबरच तुमच्या नियमित खाण्यामध्ये फळांचा समावेश करून घ्या. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा हंगामी फळे नक्की खा. त्वचेसाठी या फळांचा समावेशही नक्की करून घ्या. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT