ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
डोळ्याखालील सुरकुत्या करा घरगुती उपायांनी कमी, परिणाम होईल त्वरीत

डोळ्याखालील सुरकुत्या करा घरगुती उपायांनी कमी, परिणाम होईल त्वरीत

सुरकुत्या या केवळ मानेवर अथवा चेहऱ्यावरच येत नाहीत तर डोळ्यांच्या आसपास सुरकुत्या सर्वात आधी दिसायला लागतात. एकदा डोळ्यांखाली सुरकुत्या यायला सुरूवात झाली की तुम्ही वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागता. तसंच तुमचं सौंदर्य कमी होतं आणि तुम्हाला कितीही काही केलं तरीही मनाचं समाधान नक्कीच मिळत नाही. बऱ्याचदा डोळ्यांखालील सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला बाजारातील अनेक केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण तुम्हाला घरगुती टिप्स वापरून तुमच्या डोळ्याखालील सुरकुत्या कमी करता येतात हे तुम्हाला माहीत आहे का? आपण लेखातून डोळ्याखाली सुरकुत्या घरगुती उपाय करून कशा घालवायच्या हे जाणून घेऊया.

डोळ्यांखाली सुरकुत्या का येतात

डोळ्यांखाली सुरकुत्या का येतात

Freepik.com

वाढत्या वयासह डोळ्यांच्या  खाली सुरकुत्या पडू लागतात. आसपासच्या  मांसपेशी या अत्यंत नाजूक असतात आणि त्या जास्त आखडल्याने अथवा पसरल्याने तुटतात आणि मग सुरकुत्या पडू लागतात. साधारण वयाच्या पस्तिशीनंतर तुम्हाला डोळ्यांखाली सुरकुत्या येणे जाणवू लागते. तर ज्या व्यक्तींचे डोळे हसताना बंद होतात त्यांना इतरांच्या तुलनेत लवकर डोळ्याखाली सुरकुत्या येतात.  कारण डोळे जास्त आखडले जातात आणि त्याचा परिणाम मांसपेशीवर होतो. डोळ्याखाली होणाऱ्या सुरकुत्या  या साधारण दोन स्वरूपाच्या असतात. एक ज्या नेहमी दिसून येतात आणि एक ज्या केवळ हसल्यावर दिसतात. याची नक्की कारणे काय जाणून घेऊया – 

ADVERTISEMENT

उन्हात जास्त काळ असणे – सूर्याची किरणे ही त्वचेला खूपच हानी पोहचवतात.  वास्तविक डोळ्यांना सूर्याचे किरण सहन होत नाहीत. जास्त काळ उन्हात राहिल्याने  सुरकुत्या लवकर पडतात.

धुम्रपान आणि डोळे मिचकावून हसणे – डोळे लहान होत असतील हसताना तर मांसपेशीवर त्याचा जोर येतो आणि त्यामुळे कमजोर होऊन सुरकुत्या पडतात.  तसंच ज्या व्यक्तींना धुम्रपान करण्याची सवय आहे. त्यांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. यामध्ये विषारी तत्व असतात जे सुरकुत्या होण्यास कारणीभूत ठरतात. 

नैसर्गिकरित्या मिळवा सुरकुत्यांपासून सुटका, सोपे घरगुती उपाय

डोळ्याखालील सुरकुत्या घालविण्याचे घरगुती उपाय

डोळ्याखालील सुरकुत्या घालविण्याचे घरगुती उपाय

ADVERTISEMENT

Freepik.com

डोळ्याखालील सुरकुत्या घालविण्यासाठी केवळ बाजारातील क्रिमच नाही तर तुम्हाला घरच्या घरीही उपाय करता येतात. कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया.

अननस

Shutterstock

ADVERTISEMENT

अननसामध्ये ब्रोमलेन एंजाईम घटक असतो जो सुरकुत्या कमी करण्यसाठी परिणामकारक ठरतो. अननसाचे ज्युस तुम्ही नियमितपणे सुरकुत्यांवर लावले तर तुम्हाला याचा फायदा मिळतो. साधारण 15 मिनिट्स तुम्ही अननसाचा ज्युस लावा आणि मग चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुम्हाला अतिशय ताजेतवाने वाटेल आणि लवकरच सुरकुत्यांवर याचा परिणाम दिसून येईल. 

लहान वयात सुरकुत्या आल्या असतील तर करा सोपे उपाय

काकडी

Shutterstock

ADVERTISEMENT

काकडी ही त्वचेला उत्तम मॉईस्चराईज करते. त्यामुळे सुरकुत्या जाण्यासाठीही याची मदत होते. याशिवाय काकडी डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि डाग काढण्यासाठीही परिणामकारक आहे. दिवसभरात कधीही तुम्ही काकडीचे तुकडे डोळ्यांवर किमान दहा मिनिट्स ठेवा आणि मग त्याचा परिणाम पाहा.  काकडी हे डोळ्यांसाठी उत्तम उपाय आहे. 

सुरकुत्या घालविण्यासाठी असा करा चेहऱ्याला मसाज

ऑलिव्ह ऑईल

Shutterstock

ADVERTISEMENT

डोळ्यांच्या आसपास तुम्ही ऑलिव्ह ऑईलने मसाज करा.  यामुळे डोळ्यांजवळील सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.  ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्याने त्वचा अधिक चांगली होते आणि बराच काळ मॉईस्चराईज राहते. त्यामुळे चेहऱ्यावरील फाईन लाईन्स कमी होण्यासाठीही याचा उपयोग होतो.   

अंडे

Shutterstock

अंड्याचा पांढरा भाग त्वचा टाईट करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसंच यासह चेहऱ्यावरील आणि डोळ्याखाली आलेल्या सुरकुत्या कमी होण्यासही याचा फायदा मिळतो. अंड्याचा हा पांढरा भाग फेटून डोळ्याखाली लावा आणि 15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.  तुम्हाला आठवडाभरातच याचा परिणाम दिसून  येईल. 

ADVERTISEMENT

दही

Shutterstock

दह्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि 15 मिनिट्स तसंच डोळ्याखाली लाऊन ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यानंतर मॉईस्चराईजर लावा. दह्याचा वापर केल्याने डेड स्किन निघून जाते. त्यासह डोळ्यांखालील मांसपेशी मजबूत होण्यासाठी हे फायदेशीर आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

  • तुम्ही जेव्हा घरातून बाहेर जाता तेव्हा उन्हात तुम्ही गॉगलचा वापर करावा. घरातून निघताना सनस्क्रिन  लावल्याशिवाय बाहेर निघू नये
  • आपल्या रोजच्या डाएटमध्ये फळं,  भाज्या, अंडे,  मासे, कडधान्य, गहू, तांदूळ आणि सुक्या मेव्याचा समावेश नक्की करून घ्यावा
  • धुम्रपान आणि दारू पिण्याची सवय असेल तर वेळीच सोडवा 
  • जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी नक्की प्या 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT